Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रयाही वर्षी आंबेओहोळ धरण १००% भरले ; पुनर्वसन १००% कधी होणार ?...

याही वर्षी आंबेओहोळ धरण १००% भरले ; पुनर्वसन १००% कधी होणार ? -कॉ.शिवाजी गुरव.

याही वर्षी आंबेओहोळ धरण १००% भरले ; पुनर्वसन १००% कधी होणार ? -कॉ.शिवाजी गुरव.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील आंबेओहळ धरण सततधार पाऊस पडत आहे. पण आंबेओहोळ धरण कधी भरणार अशी उत्सुकता लोकांना होती. आज दि. २१ जुलै रोजी धरण १००% भरून सांडव्यातून पाणी पडू लागले आहे नागरिकांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. पण ज्या शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनी गेल्या त्यांना मात्र एका बाजूला धरण भरल्याचा आनंद आहे परंतु गेल्या २४ वर्षात वाट पाहून सुद्धा आमचे पुनर्वसन होत नाही याचे मात्र दुःख आहे. अशी पुनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांची भावना आहे. शिवाजी गुरव अध्यक्ष आंबेओहळ संग्राम संघटना यांच्याशी शेतकरी आपली भावना व्यक्त करत आहेत. धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या ते शेतकरी विकास सैनिक आहेत सरकारने विकास सैनिकांच्या त्यागाचा विचार करून पुनर्वसन लवकरात लवकर करावे असे आवाहन शिवाजी गुरव यांनी सरकारला व लोकप्रतिनिधींना केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.