Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रबेकायदेशीर विक्री; तरुणींच्या जीवाला धोका!- वसई विरार शहरात गर्भपात गोळ्यांचा काळाबाजार!!🟥लाडक्या बहिणीला...

बेकायदेशीर विक्री; तरुणींच्या जीवाला धोका!- वसई विरार शहरात गर्भपात गोळ्यांचा काळाबाजार!!🟥लाडक्या बहिणीला रक्षाबंधनपूर्वी मिळणार लाभ.- पालकमंत्री हसन मुश्रीफ.

🟥बेकायदेशीर विक्री; तरुणींच्या जीवाला धोका!- वसई विरार शहरात गर्भपात गोळ्यांचा काळाबाजार!!
🟥लाडक्या बहिणीला रक्षाबंधनपूर्वी मिळणार लाभ.- पालकमंत्री हसन मुश्रीफ.

विरार – प्रतिनिधी.

मुलींना गर्भपातासाठी बेकायदेशीररिच्या गर्भपाताच्या गोळ्या (एमटीपी किट) काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचे प्रकऱण समोर आले आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला असून गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या रॅकेट मध्ये डॉक्टर, औषध विक्रेते यांचा देखील सहभाग असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
🟥शहरातील खासगी डॉक्टर तसेच औषध विक्रेते (मेडिकल स्टोअर्स) मध्ये बेकायदेशीररित्या गर्भपाताच्या गोळ्यांची (एमटीपी किट) विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या संचात (किट) मध्ये ५ गोळ्या असतात. या गोळ्यांची किंमत अवघी ६० रुपये असते. मात्र काळ्या बाजारात या गोळ्या ५ ते १० हजार रुपयांना दिल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. वालील पोलिसांनी या प्रकरणी नालासोपाराच्या शिर्डी नगर येथे सापळा लावून अजित पांडे (४२) याला ताब्यात घेतले. औषध विक्रीचा कुठलाही परवाना त्याच्याकडे नव्हता. तरी या गोळ्या तो औषध विक्रेते आणि खासगी डॉक्टरांना विकत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्याविरोधात औषध निरीक्षक किशोर रांजणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार औषध व सौंदर्य प्रसाधन कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपीकडून अशा गोळ्यांचे ३०० संच जप्त कऱण्यात आले आहे. त्याची किंमत १ लाख ३० हजार एवढी आहे.

🅾️या गोळ्या बनविणारी कंपनी पुण्यात आहे. तेथून त्या उत्तरप्रदेशात वितिरत केल्या जात होत्या. आरोपी पांडे हा तेथून गोळ्या आणून विक्री करत होता, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांनी दिली. काही खासगी दवाखान्याती डॉक्टर्स वाटेल त्या किंमतीला गोळ्या विकत होते. या संचावर बारकोड असल्याने कुठे वितिरत केल्या गेल्या, कुणी विकल्या त्याची पाळेमुळे शोधून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती राणे यांनी दिली.

🔴डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घातक.

शस्त्रक्रियेविना गर्भपात करण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या (एमटीपी किट) स्त्री रोग तज्ञांकडून दिल्या जातात. त्यासाठी आधी संबंधित महिलांची शारिरिक तपासणी केली जाते त्यानुसार या गोळ्यांची किती मात्रा (डोस) द्यायचा ते ठरवले जाते. डॉक्टरांच्या चिठ्ठी (प्रिस्किप्रशन) शिवाय या गोळ्यांची विक्री करणे बेकायदेशीर आहे. अशा गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्या तर जीवावर बेतू शकते, असे पालिक्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी सांगितले. शहरातील डॉक्टर्स अशा गोळ्यांची विक्री करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही डॉ चौधरी यांनी सांगितले.

🟥गर्भपात गोळ्यांची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती मिळल्यानंतर आम्ही सापळा लावून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयराज रणावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव.

🔴बदनामी होऊ नये म्हणून मुली बेकायदेशीर मार्गाने मिळालेल्या गर्भपाताच्या गोळ्या घेतात. परंतु हे धोकादायक आहे. मुलींनी स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून गोळ्या घ्याव्यात. डॉक्टरांकडे रुग्णांची गोपनियता राखली जाते.*
➖डॉ भक्ती चौधरी, मुख्य आरोग्य अधिकारी, वसई विरार महापालिका

🟥लाडक्या बहिणीला रक्षाबंधनपूर्वी मिळणार लाभ.- पालकमंत्री हसन मुश्रीफ.
( कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता 2 लाख 58 हजार अर्ज प्राप्त.)
( 1 लाख 30 हजार अर्जांची ऑनलाईन नोंदणी.)

कोल्हापूर :- प्रतिनिधी.

राज्यात नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अध‍िवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वकांक्षी योजनेची घोषणा केली. या योजनेतील पात्र बहिणांना येत्या रक्षाबंधनपूर्वी योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी सांगितले. त्यांनी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील योजनेबाबत झालेल्या कामकाजाची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांना दिली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महिला व बाल विकास अधिकारी सुहास वायंगडे, शिल्पा पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
🔴पालकमंत्री पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 40 लक्ष लोकसंख्येपैकी किमान 9 लक्ष महिलांना या योजनेतून लाभ मिळण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्हा या योजनेत अर्ज नोंदणी करण्यात राज्यात अग्रेसर असून आत्तापर्यंत योजनेकरिता 2 लाख 58 हजार अर्ज प्राप्त आहेत, त्यापैकी 1 लाख 30 हजार अर्जांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. याव्यतिरिक्त कित्येक महिलांनी घरातूनच ऑनलाईन नोंदणी केली आहे. ही संख्याही मोठी असून चांगल्या प्रकारे जिल्ह्यात या योजनेसाठी नोंदणी सुरू आहे. 15ऑगस्ट रोजी देशाचा स्वातंत्र्य दिन आहे तसेच 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनही आहे. रक्षाबंधन पूर्वी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचे नियोजन शासनाचे आहे. तरी या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व महिलांनी चांगल्या प्रकारे घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पालकमंत्री तथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी यावेळी ग्रामीण तसेच शहरी भागातील अर्ज नोंदणी प्रक्रिये बाबतचा तपशीलवार आढावा घेतला.बँकेत पुर्वीचे खाते असल्यास पून्हा नवीन बँक खाते काढण्याची आवश्यकता नाही.
🟥मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता कित्येक महिला बँकेत पुर्वीचे खाते असले तरी नवीन खाते उघडण्यास येत असल्याचे बँक अध‍िकाऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी याबाबत योजनेतील लाभार्थींना आवाहन केले आहे की नवीन खाते न उघडता आपण पुर्वीच्याच असलेल्या बँक खात्याला आधार नंबर जोडून त्या खात्याचे तपशील अर्ज नोंदणी करताना सादर करावेत. जर तुमच्याकडे बँक खाते नसेल तरच नवीन बँक खाते उघडा. लाभार्थीचे खाते शासकीय, खाजगी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., पोस्टल पेमेंट बँक, ग्रामीण बँक अशा आधार लिंक होत असलेल्या बँक यापैकी कोणत्याही एका बँकेत खाते असने गरजेचे आहे. लाभार्थीचे संयुक्त खाते असल्यास संबंधित महिलेचे पहिले नाव असणे आवशक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.