Homeकोंकण - ठाणेपंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला.- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसला भीषण अपघात.-...

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला.- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसला भीषण अपघात.- ५ जणांचा मृत्यू.🛑कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

🛑पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला.- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसला भीषण अपघात.- ५ जणांचा मृत्यू.
🛑कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

पनवेल :- प्रतिनिधी.

राज्यात उद्या आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री १ च्या सुमारास वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. डोंबिवली येथून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची ट्रॅव्हलबस ट्रॅक्टरला जोरदार धडकली असून या भीषण अपघात पाच जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहेत. जखमींना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहेत.
🟥मिळालेल्या माहितीनुसार आषाढी वारी निमित्त डोंबिवली येथून काही वारकरी हे एका ट्रॅव्हल बसने पंढरपूरला निघाले होते. या बसमध्ये ५४ प्रवासी होते. गाडीत विठ्ठलाच्या नामघोषात प्रवास सुरू होता. मात्र, अचानक एक ट्रॅक्टर वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल बसला धडकला. हा अपघात ऐवढा भीषण होता की यात पाच जण जागीच ठार झाले तर २० ते २५ जण जखमी झले आहेत. यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे. डोंबिबली येथून एका वारकऱ्यांच्या समूह हा पंढरपूरला ट्रॅव्हल्सने जात होते. गाडीत ५४ वारकरी प्रवास करत होते. रात्री सर्व जण निघाले होते.
🔴रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांची ट्रॅव्हल्स ही मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन पंढरपूरला जात होती. यावेळी ट्रॅव्हल्ससमोर एक ट्रॅक्टर भरधाव वेगात जात होता. या ट्रॅव्हल्स वरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने ट्रॅव्हल्स ही ट्रॅक्टरला जाऊन धडकली. व रस्त्याखाली थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात ५ जण ठार झाले तर २० ते २५ जण जखमी झले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने बचावकार्य राबावत जखमी नागरिकांना जवळील एमजीएम रूग्णालय तसेच पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

🛑कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

पुणे :- प्रतिनिधी.

राज्यात कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पुरसदृश्य स्थिती आहे. कोकणात आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवारी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगली, सोलापूर वगळता उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
🟥आज समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात ते उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे आज देखील कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात रायगड येथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडला रेड तर मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
🔴किनारपट्टीवरील उर्वरित जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पश्चिम घाटाच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अन्य भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर व साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाचा काही सरी पडण्याची शक्यता आहे व घाट विभागात काही ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे घाट विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.