Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमडिलगेत पंतप्रधान पिक विमा योजननेची कॅप होणार शुक्रवार रोजी( खातेदारांनी लाभ घ्यावा.)/आजरा...

मडिलगेत पंतप्रधान पिक विमा योजननेची कॅप होणार शुक्रवार रोजी( खातेदारांनी लाभ घ्यावा.)/आजरा येथील महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील इयत्ता दहावी परीक्षेत उज्वल सुयश

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील इयत्ता दहावी परीक्षेत उज्वल सुयश संपादन केलेल्या गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ व विविध परीक्षा, सामाजिक व शैक्षणिक कार्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या प्रतिभावान शिक्षकांचाही गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यामध्ये प्रशालेतील पहिले पाच विद्यार्थी कु.खवरे कादंबरी जयदीप. ९८.६०%(आजरा तालुक्यात प्रथम), नवार राखी राजू ९७.४०% (आजरा तालुक्यात द्वितीय), पाटील आदित्यराज दीपक ९५.८०% (आजरा केंद्रात तृतीय),कु येरूडकर मेघा श्रीधर.९५.६०%, कु. शिवणे समृद्धी सुरेश ९३.९०%. या पाच विद्यार्थ्यांना व विषयवार प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनाही दात्यांकडून ठेवलेले बक्षीस व ट्रॉफी प्रदान करण्यात आली त्याचप्रमाणे आजरा केंद्रात इंग्रजी विषयात प्रथम कु.भोसले सई संजय. ९५% गुण (आजरा हायस्कूल आजरा), यादव श्रेयस किशोर ९५% (रोझरी इंग्लिश स्कूल आजरा), गणित विषयात प्रथम.. पाटील धीरज गिरीश ९९% गुण , इंजल सोहम सचिन ९९ % गुण (आजरा हायस्कूल आजरा) तसेच आजरा महाल शिक्षण मंडळ अंतर्गत हिंदी विषयात प्रथम आलेली कु.पाटील रुणाली बाबू ९५% गुण (भादवण हायस्कूल भादवण), देवर्डे हायस्कूल मुलीत प्रथम कु.दिवेकर दुर्वा महादेव ९४.४०% गुण .. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष जयवंत शिंपी , संचालक मंडळ तसेच दाते मंडळी यांची हस्ते करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच गुणवंत व यशवंत शिक्षकांचाही सत्कार सोहळा संपन्न झाला. यामध्ये आजरा माध्यमिक पतसंस्थेत बिनविरोध चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सुभाष सावंत (मुख्याध्यापक देवर्डे हायस्कूल) आर जी कुंभार (प्राचार्य व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा) ,तसेच एम.ए. पाटील, व सौ भादवणकर मॅडम यांचीही संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक संघाच्या अभ्यासक्रम समितीवर व्यंकटराव प्रशालेतील चार शिक्षकांची निवड झाली कृष्णा दावणे, प्रशांत गुरव, संजय भोये व सौ. एस.डी.इलगे यांचाही शाल श्रीफळ देऊन अध्यक्ष श्री. शिंपी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ए वाय चौगुले, सौ पाटील ए डी, गुरव पी एस ,व्ही ए चौगुले, श्रीव्ही.एच गवारी ,सौ गुरव ए एस ,श्री पाटील पी व्ही, खोत के बी , यांचा स्कॉलरशिप व एन एम एम एस मार्गदर्शक शिक्षक म्हणून गौरव झाला.श्री एस वाय भोये, आर पी पाटील ,सौ एम व्ही बिल्ले, एन.ए मोरे , पाटील आर एन, सौ इलगे एस डी, गिलबिले एस एस, पाटील एम एस, के.ए.दावणे. एस एम पाटील, पाटील एस बी .यांचा दहावी विषय शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला.
प्राचार्य आर.जी कुंभार यांनी प्रास्ताविकामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३/२४ मधील शाळेतील राबविलेल्या विविध उपक्रमातील, परीक्षेतील प्रशालेने मिळवलेले यश आणि या यशामध्ये सहभागी शिक्षक विद्यार्थी यांची यशोगाथा कथन केली. स्कॉलरशिप, एन एम एम एस, एम टी एस, एन टी एस, एन सी सी विभाग, क्रीडा विभागातील यश, शासकीय चित्रकला परीक्षेतील विद्यार्थ्यांचे यश, शाळासिद्धि मधील शिक्षक वृंदांचे योगदान व यश, इ. दहावी व वरील सर्व परीक्षांसाठी शिक्षकांनी घेतलेल्या जादा तासातील मेहनतीचे कौतुक केले. तसेच शिक्षकांना मिळालेले विविध पुरस्कार, मान सन्मान यांचाही उल्लेख केला. त्यानंतर पर्यवेक्षिका सौ व्ही.जे.शेलार यांनी एसएससी परीक्षा 2024 मधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणांसहित असलेल्या लिखित वहीचे वाचन केले. सौ ए. एस. गुरव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक रक्कम व स्मृतिचिन्ह देणाऱ्या दात्यांचा नामोल्लेख आपल्या मनोगतामध्ये केला यामध्ये मिलिंद भादवणकर व रवींद्र आपटे. (माजी अध्यक्ष गोकुळ दूध संघ कोल्हापूर) यांच्या भरीव दातृत्वाबरोबरच इतर सर्व दात्यांचे आभार मानले. शिक्षक मनोगतामध्ये सौ.ए.डी.पुंडपळ, पालक मनोगतामध्ये श्री संजय भोसले सर यांनी आपले विचार मांडताना व्यंकटराव प्रशाला म्हणजे आजरा तालुक्याची शान आहे. आजरा तालुक्यातून आजपर्यंत शेकडो कर्तृत्ववान व्यक्ती घडवण्याचे काम या संस्थानकालीन प्रशालेने केलेले आहे. या प्रशालेची उत्तरोत्तर होणारी प्रगती यामध्ये अध्यक्ष, संचालक मंडळ ,प्राचार्य, शिक्षक , विद्यार्थी व पालकांचा महत्त्वाचा वाटा आहे. इयत्ता दहावी बारावीनंतरच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे वर्ग ही या प्रशालेत सुरू व्हावेत ही तालुकावाशीयांची मनोमन इच्छा असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात श्री शिंपी यांनी सांगितले की, आजरा तालुक्यातील बहुजन समाजातील, खेडोपाड्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला- मुलींना शिक्षणाची व अभ्यासाची गोडी लावून शिक्षण देणाऱ्या या आमच्या व्यंकटराव प्रशालेतील शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे. म्हणूनच आज सामान्य कुटुंबातील मुलीही आजच्या या पारितोषिक वितरण समारंभात आजरा तालुक्यात प्रथम, द्वितीय येण्याचा मान मिळवताना दिसत आहेत. यामध्ये त्यांची अभ्यासातील जिद्द पालकांची व शिक्षकांची मेहनतीला फळ आल्याचे दिसत आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीमधील येणाऱ्या प्रत्येक अडचणी आपण आपल्या परीने सोडवणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्थेचे सचिव एस पी कांबळे, संचालक श्री पांडुरंग जाधव, माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई, सचिन शिंपी, श्री अभिषेक शिंपी, दाते श्री ए के पावले सर, संभाजी इंजल सर, श्रीमती माध्याळकर, तसेच भादवण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजयकुमार पाटील, देवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सुभाष सावंत सर, उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभाचे संपूर्ण नियोजन पर्यवेक्षिका, सौ.व्ही.जे.शेलार व सौ.एस.डी.इलगे यांनी केले. सूत्रसंचा विलास गवारी व संजय भोये यांनी आभार मानले.

मडिलगेत पंतप्रधान पिक विमा योजननेची कॅप होणार शुक्रवारी
( खातेदारांनी लाभ घ्यावा.)

आजरा .- प्रतिनिधी.

Oplus_0

आजरा मडिलगेत ग्रामपंचायत येथे शुक्रवार दि.१९ रोजी पंतप्रधान पिक विमा योजननेची कॅप होणार होणार आहे. या कॅप मध्ये पूर, दुष्काळ, पावसातील खंड, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ यांसारख्या टाळता न येणा-या जोखमीमुळे पीकाच्या उत्पादन घट होणे, नुकसान होणे यासाठी पीकाला संरक्षण मिळावे, म्हणून पीक विमा योजना भरली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व खातेदारांनी मडिलगे तालुका आजरा येथे होणाऱ्या पिक विमा नोंद कॅम्पचा लाभ घेऊन आपली पीक नोंद करावी असे आवाहन ग्रामपंचायत व कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यासाठी
लागणारे कागदपत्रे.
१ .आधार कार्ड
२ .बॅंक पासबुक (केडीसी,बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया)
३ . ८ अ
४ .आधारकार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर ( येताना मोबाईल घेऊन येणे.) याबाबत ग्रामपंचायत मडिलगे सरपंच बापू निऊगरे तसेच, मनीषा पाटील. (कृषी सहाय्यक विभाग ,मडीलगे ), नंदन गवस (पीक विमा अधिकारी कृषी विभाग आजरा), मारुती -हाटवळ (पीक विमा योजना सहाय्यक मडीलगे), ओंकार कांबळे ( पीक विमा योजना सहाय्यक आजरा.) तरी गावातील खातेदाराने या योजनेचा लाभ घ्यावा आवाहन केले आहे.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.