Homeकोंकण - ठाणेमुसळधार पाऊस.- ब्रेकिंग…🔴गुहागर समुद्रात मच्छिमारी नौका बुडाली.- खलाशी सुखरूप🟥शिवसेना पक्षाचं नाव आणि...

मुसळधार पाऊस.- ब्रेकिंग…🔴गुहागर समुद्रात मच्छिमारी नौका बुडाली.- खलाशी सुखरूप🟥शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं याबाबतची सुनावणी पुढे ढकलली.- १४ आँगस्टला होणार सुनावणी.

🛑मुसळधार पाऊस.- ब्रेकिंग…
🔴गुहागर समुद्रात मच्छिमारी नौका बुडाली.- खलाशी सुखरूप
🟥शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं याबाबतची सुनावणी पुढे ढकलली.- १४ आँगस्टला होणार सुनावणी.

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू..- सिंधुदुर्ग जिल्हयात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली…
तर कोणीही पुराच्या पाण्यातून तसेच पुलावरून वाहतूक करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे..

🔴गुहागर समुद्रात मच्छिमारी नौका बुडाली.- खलाशी सुखरूप.

गुहागर :- प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. समुद्र खवळला आहे.गुहागर बाजारपेठेच्या समोरील खवळलेल्या समुद्रामध्ये मच्छीमारी नौका बुडाली.
🟣आज रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास असगोली येथील मच्छीमारी नौका बुडाल्याची घटना घडली आहे.तर या बोटीतील खलाशी सुखरूप किनाऱ्याला पोहोचले आहेत.

🟥शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं याबाबतची सुनावणी पुढे ढकलली.- १४ आँगस्टला होणार सुनावणी

नवी दिल्ली:- वृत्तसंस्था.

केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिदेंना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर १५ जुलै रोजी सुनावणी होणार होती. परंतु कोर्टाने ही सुनावणी आता पुढे ढकलली आहे.आता ही सुनावणी 14 ॲागस्टला होणार आहे.
🟥एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हा आमदार, खासदारांच्या बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला होता. यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आता 14 ॲागस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं भवितव्य एक महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात ठरणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर तारीखही अपडेट करण्यात आली आहे. या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
🔴तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांना पात्र ठरवले होते. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर 19 जुलैला सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी झाली तेव्हा विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीतील मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने मागवली होती. आता सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर येत्या 23 जुलैला सुनावणी होण्याची माहिती मिळत आहे. 23 जुलैला ही सुनावणी झाल्यास ही याचिका सर्वोच्च न्यायालयात ठेवावी की उच्च न्यायालयात पाठवावी, याबद्दलचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

🟥रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उदया सोमवार दि.१५ जुलै रोजी सुट्टी जाहीर

रत्नागिरी – प्रतिनिधी.

जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या सोमवार दि. १५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला.
🟥या आदेशात म्हटले आहे, प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरुन जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून प्रदान करण्यात आले आहेत. आपती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.
🔴हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात उद्या दिनांक १४ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे.
🅾️चिपळूण येथील वाशिष्ठी नदी, राजापूर येथील कोदवली नदी, लांजा येथील मुचकुंदी नदी यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या दिनांक १५ जुलै रोजी सुट्टी असणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.