श्री.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जिर्णोध्दारसाठी झालेल्या जमा खर्च द्यावा.- आजरा अन्याय निवारण समिती
आजरा.- प्रतिनिधी.
छत्रपती शिवाजी महाराज आजरा पुतळा जिर्णोध्दारसाठी झालेल्या जमा खर्च देणेबाबत आजरा येथील अन्याय निवारण समितीने अध्यक्ष व सदस्य, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जिर्णोध्दार समिती, आजरा यांना अन्याय निवारण समिती आजरा यांनी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण व पुतळ्याच्या उभारणीसाठी अनेक संस्था व व्यक्तींनी आर्थिक योगदान दिलेले आहे.
सार्वजनिक वर्गणीतून हा उपक्रम राबवला जात असून या उपक्रमाकरिता देणगी देणाऱ्या देणगीदारांची नावे, संस्थांची नावे, मंडळांची नावे (देणगी रक्कमेसह) व या कामाकरीता आजतागायत किती रक्कम जमा झाली व किती रक्कम खर्च झाली आहे याची सविस्तर माहिती जिर्णोध्दार समितीकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात प्रसिध्द करावी.
जेणेकरुन यामधील पारदर्शकता वाढेल व आणखी कांही लोक मदत करतील व जिर्णोध्दाराचे काम पूर्ण करणेस सहकार्य होईल. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर. अध्यक्ष परशुराम बामणे, सुधीर कुंभार उपाध्यक्ष विजय थोरवत, पांडुरंग सावरतकर सचिव, सदस्य – दिनकर जाधव, गौरव देशपांडे, सुरेश गावडे, रविंद्र नेवरेकर, जोतिबा आजगेकर, दत्तात्रय मोहिते, संजय जोशी, बंडा चव्हाण सह सदस्यांच्या सह्या आहेत.
