Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रडेंगू बाबत आजरा - आरोग्य विभागाने घेतली आहे खबरदारी.

डेंगू बाबत आजरा – आरोग्य विभागाने घेतली आहे खबरदारी.

डेंगू बाबत आजरा – आरोग्य विभागाने घेतली आहे खबरदारी.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यात व शहरात आजरा पंचायत समिती व आजरा नगरपंचायत आरोग्य विभागाच्या वतीने डेंगू बाबत खबरदारी म्हणून डॉ. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रवींद्र गुरव. वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्लयानुसार आजरा शहरात अतुल पाथरवट आरोग्य निरिक्षकव गिरीश अजगेकर, समर्थ पाटील आरोग्य सेवक, सर्व आशा व युनुस सय्यद वरीष्ठ आरोग्य सेवक यांनी जून, जुलै या महिन्यात घरोघरी फिरून डास अळी सर्वे केला आहे. व दूषित पाण्याचे साठे रिकामे करण्यास लोकांना प्रवृत्त केले आहे. व काही ठिकाणी अळी नाशक टेमी फॉस टाकण्यात आले आहे. धूर फवारणी साठी आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुर्वे यांनी नगर पंचायत मधून फवारणी मशीन व कर्मचारी दिलेले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कडून डेंग्यू बाबत आजरा शहरात ज्या उपाययोजना केल्या आहेत. त्यांना अवगत करणे सदर काम गेले महिना सव्वा महिना सुरु आहे, तसेच डेंग्यू n s 1 या मूळ डेंग्यू कन्फर्म नसलेल्या टेस्ट काहीं वेळा पॉझिटिव्ह येतात यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये. याबाबतच्या उपाययोजना व खबरदारी म्हणून आरोग्य विभाग काम करत असल्याचे समजते.

Oplus_0

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.