Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमेढेवाडी ता. आजरा २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या.🛑शिष्यवृत्ती...

मेढेवाडी ता. आजरा २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या.🛑शिष्यवृत्ती परीक्षेत ‘व्यंकटराव हायस्कूल,आजराचे उत्तुंग यश.

🛑मेढेवाडी ता. आजरा २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या.
🛑शिष्यवृत्ती परीक्षेत ‘व्यंकटराव हायस्कूल,आजराचे उत्तुंग यश.

आजरा.- प्रतिनिधी.

मेढेवाडी ता. आजरा येथील आकाश चंद्रकांत वास्कर या २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की…
शेतकरी कुटुंबातील आकाश याचे आई- वडील घराबाहेर गेले असताना गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह राहत्या घरी दुपारी साडेचारच्या दरम्यान आढळून आला . आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
आकाश याच्या पश्चात विवाहित बहीण, आई-वडील असा परिवार आहे. शेतकरी कुटुंबातील आकाश याच्या मृत्यूने मेढेवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Oplus_0

🛑शिष्यवृत्ती परीक्षेत ‘व्यंकटराव हायस्कूल,आजराचे उत्तुंग यश.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल आजराचे उत्तुंग यश आले आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत व्यंकटराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामध्ये
इयत्ता आठवीचे राज्य शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी….
प्रणव भगवान पाटील [शहरी सर्व साधारण गुणवत्ता यादीत द्वितीय]
जुवेरिया समीर शेख [शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत दहावी ] माधवी जीवन आजगेकर [शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 69 वी] सृष्टी संजीव नाईक [शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 87 वी]
रिया अरविंद देशमुख [शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 120 वी ] संभाजी पांडुरंग पाटील [शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 171 वा] गुणवंत विद्यार्थी-
वेदिका शांताराम पाटील 208 गुण शलाका ओमकार गिरी 206 गुण या गुणवंत विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक व विभागप्रमुख श्री. प्रशांत गुरव, सौ. अस्मिता पाटील, श्री. विलास गवारी, श्री. विठ्ठल चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी….काव्या विनायक गावडे [शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 120 वी ] आयुष राजू नवार [शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 174 वा] मयुरेश महेश अर्दाळकर[ शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 196 वा] गौरी हरी कोंडुसकर [शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादी 209 वी] आदर्श अशोक गिलबिले [शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 220 वा]
गुणवंत विद्यार्थी-
स्वयम यशवंत दोरूगडे 228 गुण आर्या अशोक गिलबिले 224 गुण. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक अजित चौगुले व सौ रूपाली जावळे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे प्राचार्य आर.जी. कुंभार सर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार मॅडम यांचे प्रोत्साहन लाभले.
आजरा महाल शिक्षण मंडळ, आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व सर्व संचालक यांची प्रेरणा मिळाली.या यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.