Homeकोंकण - ठाणेलोकसंख्या वाढ सकारात्मक घेतल्यास देशाचा विकास घडवून आणता येईल‌.- प्रा. डॉ.वृषाली हेरेकर.🟥कलेक्टर...

लोकसंख्या वाढ सकारात्मक घेतल्यास देशाचा विकास घडवून आणता येईल‌.- प्रा. डॉ.वृषाली हेरेकर.🟥कलेक्टर हाजीर हो!…..परंतु आता या शब्दांचा आवाज थेट कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचला आहे.🟥विधान परिषद सभापतीपदाचा महायुतीत तिढा!तिन्ही पक्षाचा पदावर दावा!! – चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी बातमी.- 🎾🏏पाकिस्तानात जाण्यास भारताचा नकार?ICCकडे विशेष विनंती.

🛑लोकसंख्या वाढ सकारात्मक घेतल्यास देशाचा विकास घडवून आणता येईल‌.- प्रा. डॉ.वृषाली हेरेकर.
🟥कलेक्टर हाजीर हो!…..परंतु आता या शब्दांचा आवाज थेट कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचला आहे.
🟥विधान परिषद सभापतीपदाचा महायुतीत तिढा!
तिन्ही पक्षाचा पदावर दावा!!

आजरा.- प्रतिनिधी.

लोकसंख्या वाढ सकारात्मक घेतल्यास देशाचा विकास घडवून आणता येईल या विषयी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त दि. ११ रोजी आजरा महाविद्यालय, आजरामध्ये भूगोल व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने लोकसंख्या विस्फोट एक आवाहन या विषयावर प्रा. डॉ. वृषाली हेरेकर, शिवराज कॉलेज, गडहिंग्लज यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना वृषाली हेरेकर म्हणाल्या की, वाढती लोकसंख्या सकारात्मक दृष्टिकोनातून हाताळली तर या कार्यकारी लोकसंख्येचा वापर देशातील साधनसंपत्तीच्या विकासासाठी करता येतो. तसेच देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करता येते. या माध्यमातून निर्माण झालेल्या वस्तू व सेवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोचवून अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणता येतो. त्यापुढे म्हणाल्या की, देशातील मृत्यूदर कमालीचा घटत असल्याने लोकसंख्या विस्फोट होत आहे. वाढत्या लोकसंख्येने आरोग्य, बेकारी, साधनसंपत्तीचा तुटवडा, पर्यावरण प्रदूषण व ऱ्हास होत आहे. या करिता लोकसंख्येचे वाढ कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाविद्यालयामध्ये लोकसंख्याविषयक शिक्षण देण्याची गरज आहे. याशिवाय जनजागृतीची आवश्यकता आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एन.सादळे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये विकासाचा व वाढत्या लोकसंख्येचा परिणाम नैसर्गिक साधनसंपत्तीच्या ऱ्हासामध्ये होत आहे. असे प्रतिपादन केले. पर्यावरण संवर्धनासाठी शाश्वत विकासाची आवश्यकता आहे. असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य श्री. दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक, श्री. योगेश पाटील, डॉ. सलमा मणेर, प्रा. शेखर शिऊडकर, डॉ. आप्पासो बुडके, डॉ. धनंजय पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. संजय चव्हाण, प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.अनिल निर्मळे, आभार डॉ. महेंद्र जाधव व सूत्रसंचालन आणि आयोजन डॉ. रणजीत पवार यांनी केले.

🟥कलेक्टर हाजीर हो!…..परंतु आता या शब्दांचा आवाज थेट कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचला आहे.

बुलढाणा :- प्रतिनिधी.

हाजीर हो!’असा शब्द प्रत्येकांनी ऐकलेला आहे. परंतु आता या शब्दांचा आवाज थेट कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनाच लोकायुक्तांनी निर्देश दिले आहेत.
🟥एका अवैध रेती वाहतूक प्रकरणी जिल्हाधिकारी पाटील यांना समन्स आला आहे.प्रकरण असे आहे की,जिल्हाधिकारी किरण पाटील यांना मानवी आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स पाठविला आहे.23 जुलैला 11.00 वाजता व्यक्तिगत बोलविण्यात आले आहे.
🔴संतोष भुतेकर यांनी अवैध रेती वाहतूक होत आहे म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु जिल्हाधिकारी यांनी दालना मध्ये आलेल्या तक्रारदारांचे समाधान न करता त्यांना असभ्य वर्तणूक करून हाकलून लावले. अगदी खुर्चीवरून उठून त्यांच्या अंगावर धावून आले. त्यामुळे वैतागलेल्या तक्रारदारांनी वरिष्ठांची पत्रव्यवहार केला. त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत.परिणामी तक्रारीवरून लोकनियुक्तांनी याची दखल घेतली आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना याचा जाब विचारण्यासाठी समन्स जारी केला आहे.

🟥विधान परिषद सभापतीपदाचा महायुतीत तिढा!
तिन्ही पक्षाचा पदावर दावा!!

मुंबई – प्रतिनिधी.

गेली दोन वर्षे रिक्त असलेल्या विधान परिषद सभापतीपदाची निवडणूक घेण्याची योजना असली तरी भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाने या पदावर दावा केल्याने सत्ताधारी महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट २०२२ मध्ये संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. विधानसभा निवडणुकीर्पू्वी ही निवडणूक घेण्याची योजना आहे. पण हे पद कोणत्या पक्षाकडे द्यायचे यावर अद्याप सहमती होऊ शकलेली नाही.
🔴सभापतीपदावर भाजपचा डोळा आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्याकडे सभापतीपद सोपवून धनगर समाजात चांगला संदेश देण्याची भाजपची योजना आहे. शिवसेना ठाकरे गट सोडून शिंदे गटात सहभागी झालेल्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे सभापतीपद सोपविण्यात यावे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. शिंदे गटात प्रवेश करताना गोऱ्हे यांना सभापतीपदाचे आश्वासन देण्यात आले होते. महायुती सरकारमध्ये सहभागी होताना सभापतीपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होेते, असा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा दावा आहे. परिणामी तिन्ही पक्षांमध्ये सभापतीपदावरून एकमत होऊ शकलेले नाही. सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख ही राज्यपालांकडून निश्चित केली जाते. त्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती करणारे पत्र राज्यपालांना पाठवावे लागते. तसेच सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या तारखेच्या आधल्या दिवशी मध्यान्हापूर्वी उमेदवाराच्या नावाची शिफारस करावी लागते. अधिवेशन शुक्रवारी संपत असल्याने ही सारी प्रक्रिया आजच पूर्ण करावी लागणार आहे.

🟥चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी बातमी.- 🎾🏏पाकिस्तानात जाण्यास भारताचा नकार?ICCकडे विशेष विनंती.

पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. मात्र भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबत सुरुवातीपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशातच आता याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता धूसर झाल्याचे समजते.सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
🔴एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही. आमचे सामने दुबई किंवा श्रीलंका या ठिकाणी आयोजित करा, अशी विनंती लवकरच बीसीसीआयकडून आयसीसीकडे केली जाणार असल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
🟥पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या १५ सामन्यांचे वेळापत्रक पाठवले आहे. पीसीबीने दिलेल्या वेळापत्रकानुसार भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये होतील. येथे कडक सुरक्षा व्यवस्था असेल अशी हमी पीसीबीने दिली होती. लाहोर, रावळपिंडी आणि कराची या तीन ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होतील, असंही या वेळापत्रकातून स्पष्ट करण्यात आलं होतं.
🟥चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत खेळवली जाईल. १० मार्च हा राखीव दिवस असेल. ९ तारखेला होणाऱ्या अंतिम सामन्यात पावसामुळे अथवा अन्य कोणत्या कारणाने व्यत्यय आल्यास राखीव दिवशी हा सामना पार पडेल. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तयारी सुरू केली आहे.

🔴याआधीही भारताने घेतली आहे कठोर भूमिका

सुरक्षेच्या कारणास्तव अनेकदा भारताने आपला संघ शेजारील देशात पाठवण्यास विरोध दर्शवला. आशिया चषक २०२३ चे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र, बीसीसीआयने भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा आग्रह धरला. त्यानुसार भारतीय संघाने श्रीलंकेच्या धरतीवर सामने खेळून जेतेपद पटकावले. भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकही द्विपक्षीय मालिका झाली नाही. २०१२ पासून हे कट्टर प्रतिस्पर्धी केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्ये आमनेसामने असतात. २००७ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा कसोटी सामना झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.