सर्वांच्या सहकार्याने व सर्वांना सोबत घेऊन विकासकामे दर्जेदार करणार.- लोकनियुक्त सरपंच बापू निऊगरे
( मडिलगे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी पांडुरंग जाधव यांची निवड.)
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील ग्रामपंचायत उप. सरपंच पदी पांडुरंग जाधव यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच बापू निऊगरे होते. निवड अधिकारी म्हणून ग्रामसेवक राहुल सुतार यांनी काम केले. प्रास्ताविक माजी सरपंच शिवाजी गुरव यांनी केले.
यावेळी बोलताना सरपंच श्री. निऊगरे म्हणाले सर्वांच्या सहकार्याने व सर्वांना सोबत घेऊन विकासकामे करत आहोत. गावातील रामलिंग स्थळ हे “क” वर्ग दर्जाचे पर्यटन स्थळाला मंजुरी मिळाली आहे. याचा पाठपुरावा देखील ग्रामपंचायत ने केला होता. त्या कामाला यश आले आहे. गावचा विकास होण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध राहील. यापेक्षा अधिक विकास व्हावा. यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने आपल्या गावाचा विकास होत आहे. यासाठी नेहमीच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे यापुढेही सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे व गावचा विकास करून घ्यावा. आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. असे बोलताना श्री निऊगरे म्हणाले. प्रास्ताविक करताना श्री गुरव म्हणाले. मागील उत्कृष्ट केलेल्या कामाचा आढावा घेतांना म्हणाले भावेश्वरी समूहाचे अध्यक्ष माजी सभापती भिकाजी गुरव यांच्या माध्यमातून या गावचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून बराच प्रयत्न झाला. त्यातून आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून गावचा विकास झाला आहे. यापुढे रामलिंग “क” वर्ग पर्यटन स्थळाची नोंद झाली आहे. या ठिकाणचाही देखील विकास व्हावा. व गावात एक तलाव व्हावा यासाठी ग्रामपंचायत व मंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य घ्यावे. व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने सदर तलाव व्हावा. व गावचा विकास व्हावा. अशी मागणी उपसरपंच निवडीच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना श्री गुरव यांनी केली.

यावेळी आजरा कारखान्याचे संचालक माजी उप. सभापती दिपक देसाई म्हणाले मडिलगे ग्रामपंचायत माध्यमातून विकास हा केंद्रबिंदू मानून सातत्याने काम केले आहे. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे व शासनाचा निधी योग्य पद्धतीने काम करून दर्जेदार काम करणे हे ग्रामपंचायतचे परम कर्तव्य आहे त्या पद्धतीने गावचा विकास जोराने चालू आहे. यापेक्षा अधिक विकास करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न चालू राहतील. यासाठी गावातील नागरिकांचे नेहमीच सहकार्याची भूमिका असते. त्यामुळे विकास कामे आणताना किंवा करताना अधिक उत्साह निर्माण होतो. असं सर्वांनी एकजुटीने काम करून गावचा विकास करूया असे बोलताना श्री देसाई म्हणाले. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नुतन उप. सरपंच पांडुरंग जाधव यांचा ग्रामसेवक व सरपंच यांनी निवड पत्र देऊन सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामसेवक श्री सुतार यांनी स्वागत केले तर आभार ग्रामपंचायत सदस्या मनीषा काणेकर यांनी आभार मानले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य. ज्ञानेश्वरी मुरुकटे, कविता घंटे, शांताबाई सुतार, शामल कातकर सह ग्रामपंचायचे आठ सदस्य तसेच भावेश्वरी संस्था समूहाचे, महिला संस्थेचे, चेअरमन व्हा. चेअरमन संचालक मंडळ सभासद, जाधव परिवाराचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.