Homeकोंकण - ठाणेविधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे राजकिय हालचालींना वेग.🟥महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा...

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे राजकिय हालचालींना वेग.🟥महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा गोरगरिबांसाठी काम करणारा पत्रकार संघ.( नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके)

🟥विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे राजकिय हालचालींना वेग.
🟥महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा गोरगरिबांसाठी काम करणारा पत्रकार संघ.
( नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके)

मुंबई :- प्रतिनिधी.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे राजकिय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत महायुतीकडून १ उमेदवार जास्त देण्यात आल्याने राजकीय चुरस वाढली आहे. पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे ८ उमेदवार या निवडणुकीत सहज जिंकून येऊ शकतात. पण महायुतीकडून ९ जणांना उमेदवारी देण्यात आल्याने या निवडणुकीतला सस्पेन्स वाढला आहे.
🟣विशेष म्हणजे सर्व ९ जागा जिंकून आणणारच असा निर्धार महायुतीच्या नेत्यांचा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी प्रत्येकी एक उमेदवार दिला आहे. या तीनही पक्षांच्या आमदारांची संख्या पाहता त्यांचे प्रत्येकी एक आमदार सहज निवडून येऊ शकतात. पण महायुतीने एक उमेदवार जास्त दिल्याने महाविकास आघाडीतही धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे सर्व ९ उमेदवार जिंकून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी रणनीती आखल्याची चर्चा आहे.
🅾️महायुतीमधील तीन प्रमुख पक्षांच्या अंतर्गत बैठका पार पडल्यानंतर सर्व मतदार आमदारांचे विजयी गणित मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक चाली रचल्या आहेत. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, महायुतीमधील पक्ष, घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांशी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपर्क ठेवून आहेत. महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचे निर्णायक मतं त्यानंतर दुसऱ्या आणि तीसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची याची सांख्यिकी रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवली आहे
.

🟥महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा गोरगरिबांसाठी काम करणारा पत्रकार संघ.
( नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके)

अकोले :- प्रतिनिधी.

समाजासाठी जगणाऱ्यांच्या आयुष्याचं सोनं होतं गोरगरिबांसाठी काम करणाऱ्यां महापुरुषांची जयंती साजरी होतात, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा गोरगरिबांसाठी काम करणारा पत्रकार संघ आहे असे मत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री निलेश लंके यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय वारकरी समाजभूषण पुरस्कार खासदार निलेश लंके यांना प्रदान करण्यात आला.
🅾️महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अकोले यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात लंके बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे होते यावेळी शिवव्याख्याते प्रा प्रदीप कदम, पी आय गुलाबराव पाटील, पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, सागर शिंदे, राष्ट्रसेवा दलाचे राज्य सरचिटणीस विनय सावंत, जिल्हाध्यक्ष ऊत्तर सोमनाथ काळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, अली सय्यद, आदि उपस्थित होते.
🔴सत्ता नसताना जर जनतेची कामे केली तर सत्ता गेल्यावर सुद्धा जनता डोक्यावर घेते परंतु राजकारणांत निवडून आल्यानंतर डोक्यात हवा जाते. राजकारणात मते मिळेपर्यंत नेते मंडळी पाया पडतात लोटांगण घालतात आणि सत्ता मिळवतात नागाचा फणा उभारतात अशांना सत्ता गेल्यावर जनता किंमत देत नाही.तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व डॉ. विश्वासराव आरोटे हे गरिबांसाठी काम करणारे आहेत.21 वर्ष गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा त्यांना वह्या दप्तर व शालेय उपयोगी साहित्य वाटप करतात दिवाळीत किराणा वाटप करतात हे गरिबांचे अश्रू पुसणारे व माणसात देव पाहणारी व्यक्ती आहे.असे मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.
🔴महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांनी बोलताना सांगितले की आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून शालेय साहित्य व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा साजरा केला जातो शिक्षकांनी आम्हाला घडवली त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी असे उपक्रम राज्यभर राबविले जातात.
🟣शिवव्याख्याते प्रा प्रदीप कदम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांवर विद्यार्थ्यांना फक्त सन्मानाबरोबरच आयुष्यात विचारांची सहली यावी म्हणून व्याख्यान आयोजित करण्याचा पत्रकार संघाचा उपक्रम स्तुत्य असून समाजातील कर्तुत्वान व्यक्तींची दखल घेण्याचे कार्य पत्रकार संघ करीत आहे.शिक्षक हा 24 तास शिक्षक असतो हा विचार नेहमी ठेवला पाहिजे. विचारांची मालिका विद्यार्थ्यांच्या डोक्यात कायम असते परंतु त्याची ठिणगी पेटवण्याचे काम शिक्षकांनी केलं पाहिजे असं मत व्यक्त केले.
🟥पत्रकार संघाचा राज्यस्तरीय समाजभूषण वारकरी पुरस्कार खासदार निलेश लंके यांना प्रदान करण्यात आला. विणा, संत तुकाराम महाराज मूर्ती, तुकाराम महाराज पगडी, मानपत्र, सन्मानचिन्ह बुक्का लावून पुरस्कार देण्यात आला. आदर्श शेतकरी पुरस्कार शिवाजी नाईकवाडी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाधव सर यांना प्रदान करण्यात आला.
🅾️कार्यक्रमात स्वागत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी तर प्रास्ताविक विभागीय सचिव अनिल रहाणे यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता जाधव तर आभार हरिभाऊ फापाळे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ आवारी, जगन्नाथ आहेर, वसंत सोनवणे, ललित मुतडक, अशोक शेळके, सहसचिव सचिन लगड, सरचिटणीस प्रविण धुमाळ, संघटक सुरेश देशमुख, सह संघटक दत्ता हासे, राजेंद्र मालुंजकर, निवड समिती प्रमुख गणेश रेवगडे, इले. मिडिया प्रमुख सचिन खरात, सोशल मिडिया सचिव शुभम फापाळे, प्रसिद्धी प्रमुख दत्तु जाधव, राजेंद्र राठोड, सुनिल आरोटे, संपर्क प्रमुख संजय गायकर, प्रकल्प प्रमुख निलेश वाकचौरे, खजिनदार भागवत खोल्लम, सोशल मिडिया प्रमुख सुनिल शेणकर, हल्ला विरोधी समिती शंकर संगारे, सो.मि.प्रसिद्धी प्रमुख ओंकार अस्वले, रजिस्टार निखिल भांगरे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते!

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.