Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआंबेओहळ मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकरी जलसमाधी आंदोलनाला येणार यश.( पालकमंत्री यांच्या आश्वासनानंतर...

आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकरी जलसमाधी आंदोलनाला येणार यश.( पालकमंत्री यांच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे.)🛑पाणी व पर्यावरणाचे संवर्धन करून ग्रामीण जीवन उंचविण्याची गरज : डॉ. दिवाकर मलिग्रे येथे पर्यावरण संवर्धन विषयावर शिबीर संपन्न.

🛑आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकरी जलसमाधी आंदोलनाला येणार यश.( पालकमंत्री यांच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे.)
🛑पाणी व पर्यावरणाचे संवर्धन करून ग्रामीण जीवन उंचविण्याची गरज : डॉ. दिवाकर मलिग्रे येथे पर्यावरण संवर्धन विषयावर शिबीर संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकरी जलसमाधी आंदोलन आज दि. १० रोजी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या नेतृत्वाखाली झाले. याबाबत प्रशासनाकडे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असल्याने विविध मागण्या करण्यात आले याबाबत यापूर्वी होते दिलेल्या निवेदन म्हटले होते.
आंबेओहोळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आहोत या प्रकल्पात एकूण ८२२ खातेदार आहेत या पैकी ३५५ शेतक-यांना त्यांची कोणतीही मागणी नसताना निवाडयातील सर्व रक्कम उचला व तुम्हाला भरघोस स्वेच्छा पुनर्वसन देवू असे अमिष दाखवून तत्कालीन भूसंपादन अधिकारी यांनी तूटपुंज्या रकमेवर शेतक-यांची जमिन संपादन केली आहे व बेकायदेशीर स्वेच्छा निवाडे करुन प्रकल्पग्रस्तांना एकरी एक लाख सात हजार इतके तुटपुंजे स्वेच्छा अनुदान मंजूर केले आहे. परंतु काही सुशिक्षित शेतक-यांनी तत्कालीन अधिका-यांना न जुमानता निवाडयातील रकमेपैकी ६५ टक्के रक्कम भरुन पर्यायी जमिन किंवा विशेष आर्थिक पॅकेज एकरी १४ लाख ४० हजार इतके भरघोस अनुदान मिळालेले आहे. प्रकल्प एक निवाडा एक जमिनीही एकच मग स्वेच्छा पुर्नवसन व आर्थिक पॅकेज याच्यात एवढा फरक का असा प्रश्न शेतक-यांना पडल्यानंतर यातील जवळ जवळ २०० लोकांनी याबाबत उच्चन्यायालय मुंबई येथे अनेक दावे दाखल केले होते यावर मुंबई उच्चन्यालयाने ते प्रकल्पग्रस्त आहेत का हे तपासा व असतील तर त्यांचे ६५ टक्के रक्कम भरुन घ्या असा आदेश असताना सुध्दा तत्कालीन जिल्हा पुर्नवसन अधिकारी तुषार ठोंबरे यांनी यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेकडे बैठका घेवून आम्हा प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासन याबाबत कोणताच निर्णय घेण्यास तयार अथवा जबाबादारी घेत नाही. म्हणून आम्ही ३५५ प्राकाल्पग्रस्त खातेदार दि.१० जुलै २०२४ रोजी आंबेओहळ प्रकल्पात सविनय पध्दतीने जलसमाधी घेणार असल्याचे यापूर्वीच निवेदन देण्यात आले होते. याबाबत आज आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. यावेळी संजय येजरे, विश्वनाथ करंबळी, दीपक देसाई, संभाजी तांबेकर, तालुक्यातील पदाधिकारी सह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

चौकट

💥सत्तेतील नेत्यांचे प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी जलसमाधी आंदोलन. – जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या आंदोलनाची दखल घेऊन आंबेओहळ धरणातील प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी अखेर सत्तेतील नेत्यांनी आंदोलनात उतरण्याची तयारी दर्शविली. ?

🛑पाणी व पर्यावरणाचे संवर्धन करून ग्रामीण जीवन उंचविण्याची गरज : डॉ. दिवाकर मलिग्रे येथे पर्यावरण संवर्धन विषयावर शिबीर

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_0

ग्रामीण भागातील खेडयापाड्यांचा विकास करण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक अंगाने गावपातळीवर लोकसहभाग आवश्यक असून गावे विकसित करण्यासाठी सुक्ष्म नियोजन व मूल्यमापन करण्यासाठी गावातील पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व पर्यावरणाचे संवर्धन करूत आमीण जीवन उचविण्याची गरज असल्याचे मत आप. आय. टी. पवई, मुंबई पेथील प्रमुख डॉ. यतिन दिवाकर यांनी व्यक्त केले मलिये येथे आयोजित शिबीरामध्ये बोलत होते येथील मलिकार्जुन मंदिर येथे मेळाचा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाव्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या प्रमुख पाहुर्ग म्हणून आजरा साखर कारखान्याचे संचालक अशोक तईकर होते. स्वागत करून लर्डेकर यांनी मंत्क्तिो गावाबरोबर आजरा तालुक्यातील गावामधील
भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी आय. जाय. टी. संस्थेच्या माध्यमातून या भागातीत नात्यांना ताम या संस्थेने धावा असा मनोदय व्यक्त केला. तसेच येत्या १२ ऑगस्टत्ता डॉ भारत पाटणकर यांच्यासोबत मत्तिग्री येथे शेतीला हक्काचे बारमाही पाणी या भागाला मिळाचे यासाठी नियोजन केले असल्याचे सांगितले. प्रस्ताविक अशोक शिंदे यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. दिगाकर म्हणाले, ग्रामीण भागात रस्ते, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, शेतीला लागणारे पाणी उसे उस्नेक प्रश्न असून गावपातळीवर लोकसहभागातून व जाराकीय योजनाचा त्ताम घेण्यासाठी काही हप्पे समजावून घेणे आवश्यक आहे. ते कृतीत आणण्यासाठी कागदोपत्री व्यवहार करावा त्याच्या नोंदी घेऊन जन्तुरावा करीत राहिल्यास गावचा सर्वांगिण पिकास होऊ शकतो. येथील शेतकरी युवकांना शेती संवर्धनाबरोबर उद्योजिके ज्ञान मिडाल्यास गागचा विकास होतो. त्यातून शाळा कॉलेज आरोग्य सेवा व वाचनालय समृद्ध होतात, यासाठी गायचे मुल्यमापन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात सरपंच गुरव यांनी गावच्या विकासासाती अंत्यत चांगली माहिती दिली असून या महितीचा गावच्या विकासासाठी उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच सुरेखा तर्डेकर, माजी सरपंच समीर पारडे, गजानन देशपांडे, विष्णु जाख्य, शिवाजी कागिनकर, केशव चुगडे, मारूती इल्के, परभाराम बुगडे, श्री. केंगारे, शिवाजी भमुत्रे यांच्यासह ग्रामस्त्य उपस्थित होते. सूत्रसंचलन संजय घाटगे यानी केले तर विश्वास बुगडे यानी आभार मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.