Homeकोंकण - ठाणेमुंबईत येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता.रेड अलर्ट' जारी.- मुंबईकरांनी आवश्यकता नसल्यास...

मुंबईत येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता.रेड अलर्ट’ जारी.- मुंबईकरांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन.

🟥मुंबईत येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता.
रेड अलर्ट’ जारी.- मुंबईकरांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन.

मुंबई :- प्रतिनिधी.

काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचल्याची परिस्थिती आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
🟥भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईकर नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी आणि अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात येत आहे.

चौकट.

🟥भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, ☔🌨️☔मुसळधार पाऊस आणि संभाव्य पुराचा इशारा दिला आहे.
तर ९,१० व ११ तारखेला महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.