राधानगरी तालुक्यातील शासनाच्या विविध/ वैयक्तिक लाभांच्या योजनांचे मंजुरी पत्रांचे वाटप.
राधानगरी.- प्रतिनिधी.
राधानगरी तालुक्यातील तहसील विभागामार्फत संजय गांधी निराधार योजनेच्या व पंचायत समिती विभागामार्फत रोजगार हमी योजनेच्या विविध वैयक्तिक लाभांच्या योजनांचे मंजुरी पत्रांचे वाटप आज अर्जुनवाडा, ता.राधानगरी येथे करण्यात आले.
शासनाच्या माध्यमातून ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या राधानगरी तालुक्यातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तहसील विभागाने व पंचायत समिती विभागाने जास्तीत-जास्त प्रयत्न करावेत अशा सुचना केल्या.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या 605 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरी 70, जनावरांचे गोठे 137, शोषखड्डे 251, शाळा संरक्षण भिंत 3, मातोश्री पानंद रस्ते 12 अशा विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचे मंजुरी पत्र लाभार्थ्यांना देण्यात आले.
यावेळी तहसीलदार अनिता देशमुख, संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष अरुण दादा जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख विजय बलुगडे, गटविकास अधिकारी संदीप भंडारे, बाजार समितीचे माजी संचालक विश्वनाथ पाटील, राज्य आत्मा कमिटीचे सदस्य अशोक फराकटे, माजी पंचायत समिती सभापती वनिता पाटील, शिवाजीराव चौगुले, सुभाष पाटील, विलास पाटील, प्रल्हाद पाटील, मानसिंग पाटील, ए.बी.पाटील सर, डी.पी.पाटील सर, बाळासाहेब बेलेकर, राजेंद्र चौगुले, अरविंद पाटील, रमेश घारे, दादासो पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.