वजन काट्यामध्ये तफावत. – ग्राहकांची होते लुट – कृषी उत्पन्न बाजार समिती गडहिंग्लज कडे
(आजरा मनसेचे निवेदन. )
आजरा.- प्रतिनिधी.
महाराष्ट्र नव निर्माण सेना आजरा तालूका वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती गडहिंग्लज यांना आजरा मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा शहरामध्ये अनेक व्यापारी वर्ग व्यापाराच्या उद्देशाने विविध भागातून येत आहेत. सदरचे व्यापारी हे त्यांच्याकडील वजनमापनाव्दारे शेतकरी वर्गाकडील शेतमाल खरेदी विक्री करत असतात. सदरचे वजन काटे हे वैध मापणशास्त्र या शासनाच्या स्वतंत्र विभागातर्फे वजन काट्यांवर नियंत्रण ठेवले जाते. कोणत्याही वस्तूचे वजन करण्यासाठी ग्राहकांना अचूक वजनामध्ये वस्तु दिली जावी याउद्देशाने व्यापरी वजन वापरत आहेत. सदरचे वजन काटे अचूक पध्दतीने वापरण्यात यावे याकरीता वजनकाटे निरीक्षक यांची नियुक्त्त्या करणेत आलेल्या आहेत. परंतु सदर वजनकाटे निरीक्षक हे व्यापारी यांचेकडे दुर्लक्ष करीत असलेबाबत दिसून येते. आम्ही महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने उत्तुर याविकाणी व्यापरी एस.बी. मुरगुडे रा. उत्तुर यांनी वजन काट्यामध्ये तफावत ठेवून उत्तुरजवळील शेतकरी यांचे वजन कमी करून त्यांचे नुकसान केलेले आहे. अशा अनेक ठिकाणी घटना घडत असलेबाबत समजते.
सदर व्यापरी यांचेकडून वजन काटा निरीक्षक हे विशिष्ट रक्कम घेवून वजन काटयाचे रिपासींग करून देत असलेबाबत व्यापरी यांचेकडूनच सांगणेत आले. याबाबत ग्रामपंचात कार्यालय यांनासुध्दा याबाबतची कल्पना देणेत आलेली आहे.
सबब, सदर उत्तुर तसेच आजरा तालुक्यातील संपूर्ण वजना काटा वापरणेत येणारे सर्व व्यापारी व दुकानदार यांचे सर्व वजन काटे आपलेमार्फत तपासणी करून ज्यांचे वजन काटयामध्ये तफावत आहे अशा सर्व वजनकाटे व्यापारी यांचेवर दंडात्मक कारवाई करणेत यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर मनसे ता. अध्यक्ष आनंदा घंटे, सरचिटणीस सुधीर सुपल, महिला आघाडीच्या सरिता सावंत, तेजस्विनी देसाई अॅ. सुशांत पोवार, सुनिल पाटील, अंकुश लोहार सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.