Homeनागपूर - विदर्भआजरा /भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चौकशी व्हावी.- ग्राहक पंचायतीचे शिवाजी गुरव🛑आजरा -...

आजरा /भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चौकशी व्हावी.- ग्राहक पंचायतीचे शिवाजी गुरव🛑आजरा – भारतनगर व आझाद कॉलनीमध्ये रुत्यावर मुरुम टाकणेबाबत. – मुख्याधिकारी यांना निवेदन.

🛑भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चौकशी व्हावी.- ग्राहक पंचायतीचे शिवाजी गुरव
🛑आजरा – भारतनगर व आझाद कॉलनीमध्ये रुत्यावर मुरुम टाकणेबाबत. – मुख्याधिकारी यांना निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चौकशी व्हावी.यासाठी आजरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन आज दि. ८ रोजी सुरू झाले आहे. चुकीच्या पद्धतीने मोजणी करून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या व वरिष्ठांचे काही न मानणाऱ्या मोजणी कर्मचारी योगेश पाटील यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ मनमानी कारभाराबाबत तालुक्यामध्ये अनेक गावच्या तक्रारी आहेत या संदर्भात यापूर्वी या कार्यालयातील एक कर्मचारी लाच घेताना जाळ्यात अडकला असताना सुद्धा कोणत्याही कर्मचाऱ्याला भीती राहिलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी मोजदाद करताना अन्याय केला जात आहे. उर्मट भाषा वापरली जात आहे तुम्हाला काय करायचे ते करा अशी भाषा वापरली जाते तरी सदर कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे व तालुक्यातील जनतेला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना ग्राहक पंचायतीचे शिवाजी गुरव यांनी यावेळी सांगितले आंदोलनाच्या स्थळी माजी सभापती निवृत्ती कांबळे ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी यांनी भेट देऊन विचारपूस केली अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या तक्रारीबाबत या ठिकाणी चर्चा केली भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार न सुधारल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल असे यावेळी निवृत्ती कांबळे यांनी सांगितले.

🛑आजरा – भारतनगर व आझाद कॉलनीमध्ये रुत्यावर मुरुम टाकणेबाबत. – मुख्याधिकारी यांना निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी..

Oplus_131072

भारतनगर व आझाद कॉलनीमध्ये रस्त्यावर फारच चिखल झालेला आहे. याबाबत अन्याय निवारण समितीने आजरा नगरपंचायत मुख्यअधिकारी यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या नियोजनात मध्ये आहे. भारत नगर व आझाद नगर या रस्त्याबाबत आपल्याकडे वारंवार मागणी करून सुध्दा रस्त्यावर मुरुम टाकलेला नाही. नागरिकांना रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे. या भागात सर्वत्र चिखल झालेला आहे. सदर भागामधील रुग्णांना दवाखान्यात जाताना सुध्दा याठिकाणी कोणती रिक्षा अगर वाहन जात नसलेने फारच त्रासाचे होत आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या मुलांना सुध्दा फार त्रास होत आहे. हे सर्व पाण्याच्या नवीन स्कीममुळे झालेले आहे.
भारतनगरमध्ये मुरुम टाकणे विषयी आमदारसाहेबांनी. सुध्दा मुरुम टाकणेची सूचना केली होती परंतु आपण याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. मंगळवार पर्यंत याठिकाणी मुरुम न टाकलेस सदर विकाणचा चिखल ट्रॉलीमध्ये भरून आपले कार्यालयाचे दारात आणून टाकला जाईल. कृपया याची नोंद घ्यावी व लवकरात लवक्र मुरुम टाकून अशी वेळ येणार नाही याची खबरदारी घ्यावी. या निवेदनावर परशुराम बामणे, विजय थोरवत, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरकर जावेद पठाण सह अन्याय निवारण समितीच्या सदस्यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.