आजरा – बहिरेवाडी च्या दोन इसमाना शिकार करताना घेतले वन विभागाने ताब्यात..
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा वनपरिक्षेत्रातील वनपाल गडहिंग्लज, वनरक्षक गडहिंग्लज हे वनक्षेत्रात गस्त घालत असताना नियतक्षेत्र गडहिंग्लज येथील चोथ्याची खोप ते धामणे गावाकडे रोडने जात असता उत्तूर फाटा येथे रविवार दि.०७/०७/२०२४ रोजी दोन इसम हातामध्ये दोन पिशव्या घेऊन सचिन अशोक नाईक व सुनील शामराव नाईक दोघे रा बहिरेवाडी तालुका आजरा हे दोन संशयीत दिसून आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचेकडे १ मृत ससा, २ जाळ्या, १ विळा, १२ काठ्या, २ मोबाईल, २ पिशव्या इ. साहित्य मिळून आलेने त्यांचेवर वनरक्षक गडहिंग्लज यांनी WL-०५/२०२४, दि.०७/०७/२०२४ ने गुन्हा नोंद करून सदरचे साहित्य जप्त करणेत आले आहे. सदरची कारवाई ही जी गुरूप्रसाद, उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर, आदिती भारव्दाज, उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर (अति.कार्यभार) एन.एस. कांबळे, सहाय्यक वनसंरक्षक (खा.कु.तो. व वन्यजीव) कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे मार्गदशनाखाली स्मिता.रा.डाके वनक्षेत्रपाल आजरा, बाळेश बा.न्हावी वनपाल गडहिंग्लज व जी.व्ही.केंद्रे, वनरक्षक गडहिंग्लज, वन्यजीव बचाव पथक यांनी केली.