कापशी येथील बोटे इंग्लिश स्कूलची बस पलटी ; सुदैवाने कोणतीही जिवित हांणी नाही.
कापशी.- प्रतिनिधी.
कापशी येथील बोटे इंग्लिश स्कूलची बस शुक्रवार दिनांक 6 जून रोजी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दलदलीमुळे आचाणक रस्ता आरल्याने पलटी झाली.या घटनेबाबत कापशी पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. यामध्ये सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. गेल्या 14 वर्षापासून कापशी येथे बोटे इंग्लिश स्कूल सुरू आहे. या बोटे इंग्लिश स्कूलकडे जाणारा रस्ता निसरट व दलदलीचा असल्यामुळे त्या रस्त्याबाबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा वाद आहे. हा वाद महसुल विभागखकडू प्रलंबित आहे. तरी संबंधित शाळेला जाणाऱ्या रस्त्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीने या वादग्रस्त रस्त्याला मंजूरी दिली की नाही हा प्रश्न सुध्न नागरीकांना पडला आहे. घटनास्थळी मंडल अधिकारी यांनी या रस्त्याची पाहणी केली आहे. तरी मंडल अधिकाऱ्यांनी या रस्त्याचा योग्य तो अहवाल तयार करून वरिष्ठाना पाठववा अशी मागणी ही नागरिक व शेतकऱ्यांच्यातून मोठ्या प्रमाणात होत आहे. सदर शाळेची बस पलटी झाल्यानंतर शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थेंचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.