Homeकोंकण - ठाणेमहायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं तर विधानसभेच्या जागाही सांगितल्या.(उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यात...

महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं तर विधानसभेच्या जागाही सांगितल्या.(उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यात फुंकलं विधानसभेचं रणशिंग.)

🟥महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं तर विधानसभेच्या जागाही सांगितल्या.(उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यात फुंकलं विधानसभेचं रणशिंग.)

मुंबई:- प्रतिनिधी.

लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.नुकतेच राज्य सरकारचं विधानसभा निवडणुकांपूर्वीचं शेवटचं अधिवेशन पार पडलं. त्यानंतर, आज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे भरवण्यात आला होता. या महायुतीच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना केल्या. एकसाथ, कदम मिलाकर चलना होना.. असे म्हणत महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांना कानिपचक्या दिल्या. यावेळी, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत, फेक नेरेटीव्ह पसरवणाऱ्यांच्या ट्रॅकमध्ये आपण अडकायचं नाही, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच,आगामी विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही त्यांनी दिली.
🟥लोकसभा निवडणुकीपेक्षा 25 लाख मतं आपल्याला मिळाली की आपण 200 जागा जिंकू एवढं पोटेंशियल आणि ताकद आपल्याकडे आहे. महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे. आपल्याला लक्षात आलंय, ते दररोज खोटं बोलत होते, पण आपण गाफिल राहिलो. आपली लढाई फेक नेरेटीव्ह या चौथ्या पक्षासोबत होती, खोट बोल पण रेटून बोल या त्यांच्या पद्धतीचा परिणाम झाला आणि आपला पराभव झाला. सत्य चिरकाल असतं, असत्याला फार काळ नसतो. असत्यावर एक निवडणूक जिंकता येते, पण सातत्याने खोटं चालत नसतं. हे घरी नवरा-बायकोला तरी खरं बोलतात की नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.
🔴गावोगावी ह्यांचेच लोकं फॉर्म घेऊन उभे आहेत, असे म्हणत विरोधकांच्या हुशारीवर देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला. या योजनेत आता कुठल्याही अटी-शर्ती नाहीत. तुमच्याकडे रेशनकार्ड नसेल तरीही तुम्हाला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केवळ, हमी पत्र लिहून तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केवळ अर्ज भरताना लाडक्या बहि‍णींनी एक गोष्ट काळजीपूर्वक लिहिली पाहिजे, ती म्हणजे बँक खात्याचा नंबर, बँक खात्याचा नंबर चुकला तर पैसे बँक खात्यात येणार नाहीत. त्यामुळे, सर्वच महिला भगिनींनी योजनेचा लाभ घ्यावा, कारण आम्ही ही योजना महिलांना बाहेरा टाकण्यासाठी नाही तर योजनेत घेण्यासाठीच राबवत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं.
🟥आपण महिला भगिनींसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. महिलांना एसटीमध्ये सवलत दिली, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत महिलांना मोफत गॅस वाटत करणार आहोत. तसेच, राज्यातील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णयही आपण घेतला आहे. त्यामुळे, पदवी व पदविका शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थींनींना मोफत उच्चशिक्षण मिळणार आहे. सर्वच जाती-धर्माच्या मुलींना या माध्यमातून मोफत शिक्षण मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, घरात जन्म घेणाऱ्या मुलींसाठीही आपण योजना आणली. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत मुलीच्या नावे 1 लाख रुपये मिळणार आहेत, हेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.