Homeकोंकण - ठाणेज्ञानोबा हरी, 'तुकाराम' घरी.- गौतम अदानींमुळे तुकाराम मुंढेंची बदली?- विधिमंडळात विरोधक आक्रमक.

ज्ञानोबा हरी, ‘तुकाराम’ घरी.- गौतम अदानींमुळे तुकाराम मुंढेंची बदली?- विधिमंडळात विरोधक आक्रमक.

🟥ज्ञानोबा हरी, ‘तुकाराम’ घरी.- गौतम अदानींमुळे तुकाराम मुंढेंची बदली?- विधिमंडळात विरोधक आक्रमक.

मुंबई :- प्रतिनिधी.

डॅशिंग सनदी अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा मुद्या गुरूवारी पावसाळी अधिवेशनात गाजला. दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन तुकाराम मुंढे यांची नुकतीच बदली करण्यात आली.”दुग्धविकास विभागाचा भूखंड उद्योगपती गौतम अदानी यांना देण्याचा सरकारचा डाव होता, ही जागा देण्यास मुंढे यांनी विरोध केल्याने त्यांची बदली करण्यात आली,” असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. धारावी प्रकल्पावरुन सभागृहात विरोधक आक्रमक झाले.
🟥एकीकडे सरकार वारकऱ्यांसाठी योजना जाहीर करुन ज्ञानोबा-तुकोबांचा गजर करीत आहे. तर दुसरीकडे तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली. त्यावरुन “ज्ञानोबा हरी, ‘तुकाराम’ घरी” अशा खोचक शब्दात विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. २० हजार कोटींची जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे.तसेच धारावीची कोट्यवधींची जमीन अदानींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. मुंबईतील अनेक मोक्याच्या जागा या बांधकाम व्यावसायिकांनी विकण्याची प्रयत्न सरकारकडून होत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
🟥मुंबई राजरोसपणे लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडेआठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा. जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. “अदानी मुंबई साफ करीत आहेत. अदानींना राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत,” असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.
हस्तांतरणासंदर्भात तत्कालीन पशुसंवर्धन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काय शिफारशी केल्या होत्या. तुकाराम मुंढे यांनी दिलेला अहवाल अनुकूल नव्हता म्हणून त्यांची बदली करण्यात आली का असा सवात त्यांनी उपस्थित केला. सभागृहाला याबाबतची माहिती देण्याची त्यांनी मागणी केली.तर कुर्ला येथील दुग्ध शाळेची जमीन साडेआठ हेक्टर आहे. दहा जून २०२४ रोजी एकाच दिवशी ही जमीन पशुसंवर्धन विभाग ते महसूल विभाग ते अदानी यांना हस्तांतरीत केली गेली. हे हस्तांतरण एकाच दिवसात झाले. इतकी तप्तरता कशी, असा सवाल त्यांनी केला.तर या जमिनीचे मूल्यांकन किती आहे? जमिनीवरील एफएसआयचे मुल्याकंन किती होते ? किंमत वीस हजार कोटी रुपये होती, तरीही रेडी रेकनरच्या केवळ २५ टक्के दराने जमीन दिली गेली आहे. यावरही वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.