🟥शाळांचे संच मान्यता निकष रद्द न केल्यास बऱ्याच शाळा शिक्षकांअभावी बंद पडण्याची भीती.
( माजी आमदार राजन तेली यांनी वेधले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष..)
मुंबई :- प्रतिनिधी.
शाळांच्या संच मान्यतेसाठी शासनाने १५ मार्च २०२४ रोजी नवीन शासन आदेश काढलेला आहे.या शासन आदेशा नुसार संच मान्यतेता झाल्यास ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगड,कोल्हापूर,ठाणे,पालघर, सातारा,सांगली या जिल्ह्यातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना जाचक अटीमुळे मान्यता न मिळाल्यास शिक्षक पद कमी होऊन अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.काही शाळाही बंद होऊ शकतात.त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित शकतात.या शासन निर्णयात १५० विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक अशी अट ठेवल्याने बऱ्याच शाळांना मुख्याध्यापक मिळणार नाही.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२५ शाळा मुख्याध्यापकविना राहतील.
🟥इयता पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थी पटसंख्या प्रत्येक वर्गात २० असल्यास एकच शिक्षकाला मान्यता मिळेल.तर इयत्ता नववी व दहावीसाठी ४० ते १०० पटसंख्या असली तरच ३ शिक्षकांना मान्यता मिळेल पूर्वी या दोन्ही वर्गांसाठी कमीतकमी ३ शिक्षक होते त्यामुळे नवीन शासन निकषानुसार कमी विद्यार्थी असल्यास दोनच शिक्षक पदांना मान्यता मिळेल.त्यामुळे दी १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासन निर्णय सरकारने रद्द करावा अशी मागणी करणारे निवेदन भाजप नेते व माजी आमदार राजन तेली यांनी निवेदनादवारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याचे तेली यांनी सांगितले.