Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रघोडागाडी शर्यतीच्या वादातून इंचलकरंजी आसरानगरात.- तरुणाचा धारधार शस्त्राने निर्घृण खून.

घोडागाडी शर्यतीच्या वादातून इंचलकरंजी आसरानगरात.- तरुणाचा धारधार शस्त्राने निर्घृण खून.

घोडागाडी शर्यतीच्या वादातून इंचलकरंजी आसरानगरात.- तरुणाचा धारधार शस्त्राने निर्घृण खून.

इचलकरंजी.- सचिन खोंद्रे.

Oplus_0

घोडागाडी शर्यतीच्या वादातून तरुणाचा धारधार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सुशांत दिपक कांबळे (वय १८ रा. आसरानगर) असे खून झालेल्या तरुणाचे नांव आहे. याप्रकरणाचा शहापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेन गतीने तपास करत खून प्रकरणी अतिश दत्तात्रय नेटके (वय १९ रा. सहकारनगर), आर्यन सरदार चव्हाण (वय २१ रा. गणेशनगर) आणि प्रदिप पारद यादव (वय २०, रा. जेकेनगर) या तीन संशयितांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील शहापूर भागातील सरोजनी नायडू विद्यालय क्र. ४३ या महानगरपालिकेच्या शाळेच्या पिछाडीस सकाळी मॉर्निंग वॉक व व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा मृतदेह निदर्शनास आला. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना दिली. तात्काळ पोलीस उपअधिक्षक समिरसिंह साळवे, शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या तोंडावर, छातीवर, पाठीत धारधार शस्त्राने गंभीर वार करून खून करण्यात आल्या स्पष्ट झाले. मृतदेहाच्या जवळपास काही हत्यार अथवा मृतदेहाची ओळख पटण्यासाठी पोलीस शोध घेत असताना संरक्षक भिंतीलगत मोबाईल मिळून आला. तो सुरू केला असता त्या फोनवर मृत तरुणाच्या भावाचा फोन आल्याने मृत तरुणाची ओळख पटली. घटनास्थळी आणि मृतदेह विच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, शहापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने दोन पथके रवाना करण्यात आली. संयुक्तपणे तपास सुरू असताना मोबाईल लोकेशनवरून कोल्हापूर येथून अतिश नेटके, आर्यन चव्हाण आणि प्रदिप यादव या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत महिन्याभरापूर्वी झालेल्या घोडागाडी शर्यतीच्या वादातून सुशांतचा खून करण्यात आल्याचे कारण समोर आले आहे. शहर आणि परिसरात पुन्हा घरफोड्या, नशिल्या पदार्थांची विक्री, हाणामारी, खून असे प्रकार वाढू लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.