अन्वी ठरली सर्वात वेगवान गिर्यारोहक.- सर्वोच्च शिखर कळसुबाई (समुद्र सपाटीपासुन १६४६ मीटर उंच)
कोल्हापूर.- प्रतिनिधी.

वयाची २ वर्षे ११ महिण्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई (समुद्र सपाटीपासुन १६४६ मीटर उंच) हे शिखर सर करुन जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेली कु अन्वी वेतन घाटगे हिने सलग तिस-यांदा कळसुबाई शिखराला गवसणी घालत कळसुबाई हे शिखर अवघ्या १ तास ४८ मिनीटात सर करुन नव्या विक्रमांची नोंद केली आहे.
अन्वी (वय ४ वर्षे ११ महिने) हिने आदल्या दिवशी रात्रभर कोल्हापुर ते नाशीक व तेथुन बारी, जि. अहमदनगर असा प्रवास करून दि. २ जुलै २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता तिचे वडील चेतन आई अनिता व गाईड दशरथ खाडे व इतर गिर्यारोहक यांचे सोबत ट्रेकला सुरुवात केली. मुसळधार पाऊस, जोराचा वारा, दाट धुके, पावसामुळे निसरड झालेली वाट अशा प्रतिकुल परिस्थीतीत फक्त शार्ट व हाफ टि शर्टवर न थांबता अवघ्या १ तास १८ मिनीटात म्हणजे ०२.१८ मिनीटानी अन्वी कळसुबाई शिखरावर पोहचली आणि कळसुबाई शिखर सर करणारी अन्वी हि महाराष्ट्रातील भारतातील नव्हे तर अशिया खंडातील सर्वात वेगवान व लहान गिर्यारोहक ठरली आहे.
अन्वी (वय ४ वर्षे ११ महिने) हिने १ जुलै २०२२ रोजी १ जुलै २०२३ रोजी व २ जुलै २०२४ रोजी कळसुबाई हे वयाचे पाच वर्षाच्या आत तिस-यादा कळसुबाई शिखर सर करणारी पहिली व सर्वात लहान गिर्यारोक ठरली आहे. त्याबाबत वारी व जहांगीरदार वाडी ग्रामपंचायतीच सरपंच, उपसरंपचं, ग्रामपंचायत सदस्य, कळसुबाई देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी अन्विचे कौतुक करून तिला अभिनंदन पत्र दिले आहे.
या आगोदर अन्वी हिने महाराष्ट्रातील सर्वोच्य शिखर कळसुबाई, कर्नाटकातील सर्वोच्या शिखर मुल्यणगीरी, केरळ राज्यातील व सहयाद्री पर्वत रांगेतील व्दितीय सर्वोच्या शिखर मिसीपुल्तीमला व निलगीर पर्वत रांगेतील व तमीळनाडु राज्यातील सर्वोच्या दोडाबेट्टा हे शिखर सर करणारी सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे.
अन्वी हिचे नावावर चार जागतीक विक्रम, पाच इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड, पाच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिचे नावाची नोंद असुन तिला आत्तापर्यंत १८० हुन अधिक संस्था व संघटनांनी राज्य, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.