🛑मडिलगेची लेक पिंपळगावाची सुन.- लेक – कु. शुभांगी हिच्या धड्याने झाली पशुधन पर्यवेक्षक.
( आजरा पं. स. समिती पशुवैद्यकीय विभागात नियुक्ती.)
🛑गोडसाखर’ला आठवडाभरात मिळणार ३०० कोटींचे कर्ज डॉ प्रकाश शहापूरकर : – ( जिल्हा बँकेच्या ५५ कोटी कर्जाचा मांडला विनियोग.)
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील लेक व पिंपळगाव ता. भुदरगडची सुन सौ. मिनाक्षी दिलिप सुतार नुकतीच आजरा पंचायत समिती पशुवैद्यकीय विभागात नियुक्ती झाली आहे. सौ. मीनाक्षी या जिल्हा परिषद कोल्हापूर पशुसंवर्धन विभागामध्ये पंचायत समिती आजरा पशुसंवर्धन विभागात पशुधन पर्यवेक्षक म्हणून नुकत्याच रुजू झाल्या. मडिलगे तालुका आजरा येथील माहेरवाशीन असलेल्या सौ मीनाक्षी २००५ मध्ये विवाह झाल्यानंतर पिंपळगाव येथे रहिवाशी झाल्या. विवाह नंतर पती प्राथमिक शिक्षक दिलीप सुतार यांच्या प्रोत्सानातून त्यांनी उत्तुर येथील अंबाई पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय उत्तूर येथे २००८ साली डिग्री पूर्ण केली. त्यांचे प्राथमिक शिक्षण श्री शंकर लिंग विद्या मंदिर मडिलगे येथे व ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण मडिलगे हायस्कूल मडिलगे तालुका आजरा येथे व ११ वी १२ वी आजरा महाविद्यालय आजरा येथे पूर्ण झाले.२०२३ मध्ये जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक म्हणून सरळ सेवा भरतीची जाहिरात निघाली. पण वयाच्या ४० व्या वर्षी आयबीपीएस पॅटर्न ची परीक्षा देणे त्यांना मान्य नव्हते. फॉर्म भरण्याची मुदत संपत आली. पण सौ मीनाक्षी भरती परीक्षेचा फॉर्म भरण्यास तयार नव्हत्या. शेवटी त्यांची कन्या कुमारी शुभांगी इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत आहे . शुभांगीने अभ्यासाची तयारी करून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आणि समजूत काढल्यानंतर त्या भरती परीक्षा फॉर्म भरण्यास तयार झाल्या. ऑक्टोबर २०२३ मध्ये पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी कोल्हापूर येथे आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे ऑनलाइन परीक्षा झाली. फेब्रुवारी २०२४ मध्ये निकाल आल्यानंतर त्यांचे नाव सिलेक्ट झाल्याची समजले. व त्यानंतर अगदी पारदर्शकपणे पार पडलेल्या या पशुधन पर्यवेक्षक पदासाठीच्या नेमणुका पूर्ण झाल्या. माजी पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य कै .ह भ प पंडित रामचंद्र सुतार यांच्या त्या सुनबाई आहेत .सामाजिक सेवेचा वारसा लाभलेल्या कुटुंबातील या सुनबाई सुद्धा ग्रामपंचायत सदस्य होत्या. सौ मीनाक्षी यांच्या आई शांताबाई लक्ष्मण सुतार. मडिलगे तालुका आजरा . या सुद्धा सद्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. सौ मीनाक्षी त्यांचा ग्रामस्थ व नातेवाईकांच्या वतीने सत्कार संपन्न झाला. या नियुक्तीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

🛑गोडसाखर’ला आठवडाभरात मिळणार ३०० कोटींचे कर्ज डॉ प्रकाश शहापूरकर : – ( जिल्हा बँकेच्या ५५ कोटी कर्जाचा मांडला विनियोग.)
गडहिंग्लज, ता. प्रतिनिधी.

गोडसाखर’ला आठवडाभरात मिळणार ३०० कोटींचे कर्ज व जिल्हा बँकेच्या ५५ कोटी कर्जाचा मांडला विनियोग डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी मांडला आहे.
‘अहमदाबादच्या स्वामी नारायण ट्रस्टबरोबर ३०० कोटी रुपये कर्जाचे मॉरगेज अॅग्रीमेंट जुलैच्या पहिल्या आठवड्यात केले जाणार आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून कर्जाची ही रक्कम एकाच टप्प्यात कारखान्याला मिळेल. आर्थिक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून कर्जाची ही रक्कम एकाच टप्प्यात कारखान्याला मिळेल. आर्थिक आणि तांत्रिक प्रश्न मिटलेले आहेत. त्यामुळे पुढील हंगामात कारखान्याला कोणतीही अडचण येणार नाही. असा विश्वास गडहिंग्लज साखर कारखान्याचे (गोडसाखर) अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा बँकेकडून मिळालेल्या ५५ कोटी रुपये कर्जाच्या विनियोगाचा तपशीलही त्यांनी यावेळी मांडला.
डॉ. शहापूरकर म्हणाले, ‘स्वामी नारायण ट्रस्टकडून आठ टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध होणार आहे. कर्जाचे हप्ते कसे द्यायचे हे संचालक मंडळ ठरवणार आहे. कर्जाच्या रक्कमेतील १५० कोटी एफआरपीसाठी, २० कोटी इथेनॉल प्रकल्पासाठी, पाच कोटी देणी भागविण्यासाठी, १५ कोटी कामगार पगारासाठी, ३५ कोटी जिल्हा बँकेचे कर्ज भरण्यासाठी, ४८ कोटी दोन वर्षांच्या व्याजापोटी तर उर्वरित रक्कम प्रशासकीय खर्चासाठी असे नियोजन केले आहे.’
ते पुढे म्हणाले, जिल्हा बँकेकडून ५५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तोडणी-वाहतूक (१२ कोटी ६५ लाख), यंत्रसामुग्री देखभाल दुरुस्ती (२८ कोटी ११ लाख), प्रशासकीय खर्च (३ कोटी ७० लाख), सिव्हिल वर्क (१ कोटी १९ लाख), कर्जावरील व्याज (२ कोटी ६७ लाख), डिस्टिलरी (६६ लाख), कामगार पगार (५ कोटी ५० लाख), संगणकीय खर्च (१९ लाख), कंत्राटदार (२८ लाख) या बाबींसाठी विनियोग केला आहे.’ या वेळी संचालक अरुण गवळी, काशिनाथ कांबळे, सोमनाथ पाटील, मंगल आरबोळे, भरमू जाधव आदी उपस्थित होते.
त्यांची चिंता नसावी…
संचालक मंडळात असलेल्या कुरबुरीबाबत छेडले असता डॉ. शहापूरकर म्हणाले, ‘कारखाना सहकारातील आहे. १८ संचालकांचे १८ विचार असणारच. बारीक सारिक तक्रारी आहेत. पण, पालकमंत्री हसन यांनी तुम्ही काळजी करू नका, त्यांच्या तक्रारी मी संपवून टाकतो, असे सांगितले आहे.’