🛑आजरा तहसीलदार कार्यालय समोर- महामार्गाच्या नजीकचे दुकान गाळे हटवावे- आजरा समितीचे निवेदन.
( महानेट या संस्थेद्वारे आजरा शहरामध्ये वायफायचे जाळे )
🛑आंबेओहोळ धरणग्रस्तांची प्रांत कार्यालयात बैठक. – ( महिनाअखेरपर्यंत व्यापक बैठक घेण्याचे प्रांताधिकारी गडहिंग्लज यांनी दिले आश्वासन.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तहसील कार्यालयाच्या संरक्षक भिंत नजीक व संकेश्वर-बांदा महामार्गाच्यामध्ये असणाऱ्या रिकाम्या जागी काही नागरिकांनी दुकान गाळे टाकण्याचा प्रयत्न चालु आहे. याबाबत अन्याय निवारण समितीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कि राष्ट्रीय महामार्ग मुळातच या परिसरात महामार्ग अत्यंत अरुंद नाही. येथे दुचाकी अथवा चार चाकी पार्कंगची कोणतीही सोय नाही. त्यामुळे या अरुंद मार्गावरच दुतर्फा वाहने पार्किंग केली जातात. वास्तविक या रिकाम्या जागेत नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुचाकी व चार चाकी गाडी पार्कंगची व्यवस्था करुन त्याठिकाणी रस्त्यावर उभी केलेल्या वाहनांची सोय होईल व रस्ता वाहतुकीस सुटसुटीत होईल. मात्र सद्यस्थितीत मनमानी पध्दतीने विनापरवाना खोके घालण्याचा प्रयत्न सुरु असून या जागी जर बेकायदेशीररित्या असा प्रयत्न झाल्यास अन्याय निवारण समितीतर्फे आंदोलन छेदून वरिष्ठांकडे दाद मागण्यात येईल. तरी असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सदरची जागा ही पार्किंगसाठी राखीव असून या जागेत कोणीही अनाधिकृतरित्या अतिक्रमण केलेस, गाळे उभारलेस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे फलक नगरपंचायतीने तातडीने लावावेत. तसेच आजरा शहरामध्ये सद्यस्थितीत वायफायचे जाळे महानेट या संस्थेद्वारे उभारणेत येत आहे. केलेल्या मौखिक माहितीनुसार केंद्रशासनाच्या परवानगीने हे काम होत असून त्याबाबत सुस्पष्टता नाही. सुस्पष्टता येणेसाठी सदर कामाची वर्कऑर्डर देणेत यावी. तसेच नगरपंचायत आणि महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, आजरा यांनी त्यांना परवानगी दिली आहे का? दिली असल्यास त्याबाबतचे आदेश तसेच त्याबाबत रॉयल्टी नगरपंचायत यांना दिली जाणार आहे का? याची सविस्तर माहिती लेखी स्वरुपात देणेत यावी. कृपया आपण याठिकाणी चालु असलेला प्रकार त्वरित थांबवावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर परशुराम बामेणे अध्यक्ष, गौरव देशपांडे उपाध्यक्ष दिनकर जाधव सेक्रेटरी, पांडुरंग सावरतकर सचिव सदस्य
सुधीर देसाई, जावेद पठाण, जोतिबा आजगेकर, ज्योतिप्रसाद सावंत, वाय.वी.चव्हाण, संजय जोशी, हेमंत कदम. यांच्या सह्या आहेत.
🛑आंबेओहोळ धरणग्रस्तांची प्रांत कार्यालयात बैठक. – ( महिनाअखेरपर्यंत व्यापक बैठक घेण्याचे प्रांताधिकारी गडहिंग्लज यांनी दिले आश्वासन.)
आजरा.- प्रतिनिधी.

आंबेओहोळ धरणग्रस्तांचे बरेच प्रश्न अजून शिल्लक असून याबाबत तातडीने बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात यावेत अशी मागणी आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेने केली होती. या संदर्भात दि २ जुलै २०२४ पासून प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर दिनांक १ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता गडहिंग्लज प्रांताधिकारी यांनी आंबेऒहळ धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष व कांहीं प्रमुख आंदोलनकर्ते यांचे सोबत प्रांत कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी कॉम्रेड शिवाजी गुरव, बाबुराव नाईक, संजय येजरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित राहून चर्चा करण्यात आली. जे प्रश्न मार्गी लागण्यासारखे आहेत याबाबत प्रांताधिकारी यांनी प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला व या सर्व प्रश्नाबाबत येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये व्यापक बैठक घेऊन प्रश्न सर्व मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन यावेळी प्रांताधिकार्यांनी यांनी संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव याना दिले आहे. त्यामुळे दिनांक 2 जुलै रोजी प्रांत कार्यालय गडहिंग्लज येथील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. परंतु या बैठकीत दि.१० जूलै रोजी आंबेऒहळ धरणस्थळावर जलसमाधी आंदोलन होणार असून सदर आंदोलनाबाबत चर्चा व निर्णय वरीष्ठ पातळीवर होणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यामुळे सदरच्या दि.१० जुलै रोजी होणार्या आंदोलनावर ठाम असल्याचे व आंदोलन होणार असल्याचे संजय येजरे यांनी सांगितले.