🛑लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये पुण्यातील पाचजण बुडाले. (दोघांचे मृतदेह मिळाले.- तिघांचा शोध सुरू.)
🟥विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मालामाल;*
( बीसीसीआयकडून तब्बल १२५ कोटींचे बक्षीस जाहीर.)
🔴राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मिळाला बहुमान.
🛑लढण्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्यांच्या पातळीवरचा लढा शांततेच्या मार्गाने आणून पाडणार – डॉ.भारत पाटणकर.👇
पुणे:- प्रतिनिधी.

लोणावळा येथील भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला असून या धरणात वर्षा पर्यटनासाठी आलेले पुण्यातील पाचजण बुडाले असल्याची माहिती आहे. यातील दोन तरुणांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
🟥पुण्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोणावळ्यातील घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवार आणि रविवार जोरदार पाऊस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती. येथील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धारणांच्या पायऱ्यावर हजारो पर्यटकांनी धरणाच्या पाण्यात आनंद लुटला. पुण्यातील सय्यद नगर येथील काही तरुण लोणावळ्यातील भुशी डॅम येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. या परिसरात मोठा पाऊस सुरू आहे. हे तरुण पोहण्यासाठी धरण परिसरात उतरले होते. यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे तरुण धारण्याच्या बॅक वॉटरच्या पाण्यात बुडाले. धरणात तरुण बुडल्याची माहिती मिळताच पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी पाण्यात शोध मोहीम राहून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. तर तिघांचा शोध अद्याप सुरू आहे. बुडालेल्या पाच जणांची नावे समजू शकलेली नाही. लोणावळा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. भुशी डॅम सह या परिसरातील अनेक धबधबे वाहू लागले आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी येथे जात असतांना काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
🟥विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मालामाल.-
( बीसीसीआयकडून तब्बल १२५ कोटींचे बक्षीस जाहीर.)
नवी दिल्ली:- वृत्तसंस्था.
टी 20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं इतिहास रचला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) भारतीय संघाबाबत मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रविवारी विजेत्या संघासाठी १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. भारताच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये योगदान दिल्याबद्दल खेळाडू आणि सर्व कोचिंग स्टाफचे अभिनंदन केले.
🔴बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले कि, भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत अपवादात्मक प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन! जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि इतर खेळाडूंच्या मदतीने त्यांनी १.४ अब्ज भारतीयांची स्वप्ने आणि अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.’ संघाने आपल्या सातत्यपूर्ण चमकदार कामगिरीने आपल्या टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. संघाचा प्रवास एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही आणि आज ते दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाले आहेत.
🟥सुजाता सौनिक यांनी स्विकारला राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार..- राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मिळाला बहुमान.
ठाणे :-प्रतिनिधी.

राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून स्विकारली आहेत. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सुजाता सौनिक यांना मिळाला आहे.
🔴मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महानगर पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव अनूप कुमार, अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभाग प्रधान सचिव जयश्री भोज, प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह इतर विभागाचे प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
🟥राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या, राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये शेतकरी, महिला, बालके, युवक तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. या योजना आणि धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. शासनाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा सांभाळतांना सर्व लोकप्रतिनिधी तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने मी जनतेसाठी प्रामाणिपणे आणि शाश्वत काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेन, अशा शब्दात नव नियुक्त मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
🔴मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा अल्प परिचय
सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या टी.एच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ २०१८ मधील टेकमी फेलो आहेत. त्यांनी २०१९ मध्ये सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्रोस विभागातील समस्या याविषयावर मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत फेलोशिप देखील पूर्ण केली आहे. टेकमी फेलो म्हणून, महाराष्ट्राच्या विमा-आधारित आरोग्य सेवा या विषयावर अभ्यास करतांना केलेल्या संशोधनातून त्यांचा शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाला आहे. अलीकडेच त्याचे सार्वजनिक आरोग्याचा दृष्टीकोन असलेले ‘कुंभ नाशिक-त्र्यंबकेश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील झाले आहे.त्यांनी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्यस्तरावर सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक सुधारणांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंटच्या अभ्यासातही त्यांचा सहभाग होता. ज्यामध्ये महिला व बाल विकास आणि शालेय शिक्षण या प्रमुख विभागांच्या कामकाजाचा सारांश त्यात मांडण्यात आला होता. त्या मुंबई विद्यापीठ आणि SNDTWU, मुंबईच्या सल्लागार समितीवरही कार्यरत आहेत. तसेच सांघिक स्तरावर त्यांनी महिला व बाल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांमध्ये कंबोडिया व कोसोवोमध्ये UN च्या दोन मानवतावादी मोहिमांमध्ये काम केले आहे. राज्य शासनात विविध पदांची जबाबदारी सांभाळत असतांना त्यांनी शाश्वत आणि पारदर्शक कामकाजावर नेहमीच भर दिला आहे.
🛑लढण्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्यांच्या पातळीवरचा लढा शांततेच्या मार्गाने आणून पाडणार – डॉ.भारत पाटणकर
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथे भारतीय मुस्लिम समाजाच्या न्याय हक्क व अधिकारासाठी तसेच भारतीय मुस्लिम समाजाबद्दल असलेले भ्रम आणि वास्तव” याबाबतीत “संविधान परिषद” मौलाना आझाद संविधान गट संविधान सन्मान परिषद आणि मुक्ती संघर्ष समिती यांच्या वतीने घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन डॉ.भारत पाटणकर, डॉ.नवनाथ शिंदे (ज्येष्ठ विचारवंत); बाळेश नाईक(नेते, जनता दल) अब्दुलवाहिद सोनेखान (माजी सैनिक भारत सरकार), प्रमोद पाटील व संग्राम सावंत यांच्या हस्ते मशाल पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.भूमिका मांडताना संग्राम सावंत राज्याध्यक्ष मुक्ती संघर्ष समिती म्हणाले, हिंदू मुस्लिम एकत्र येऊन करणार आम्ही संविधानिक मार्गाने जाणार आहोत. मुस्लिम समाजाच्या याबाबतीत ठोस पावले शासनाने व प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली पाहिजेत.यासाठी संघटित होऊन.लढा नेटाने उभा भारतीय संविधानाला घेऊन करणार आहोत.यासाठी परिषद घेत आहोत. या परिषदेचे बीजभाषण भाषण करताना डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले की आपण कष्टकरी वर्गासाठी घेतलेली संविधान परिषद ही ग्रामीण भागात होत असताना एक मोलाची गोष्ट आहे. राबणाऱ्या-कष्टकरी जनतेच्या, न्याय्य अधिकार-हक्कासाठी व लोकशाहीत स्वातंत्र्य जिवंत राहण्यासाठीची चळवळ नेटाने हिंदू मुस्लिम एकत्र येऊन करणार आम्ही करणार आहोत.
रशीद पठाण, अहमदसाब मुराद,जुबेर चॉंद, अबुसईद माणगावकर, निसार लाडजी, समीर चॉंद, सलिम लतिफ, इम्रान चॉंद,समीर खडकवाले, झाकीर नाईक, अलताफ मदार, साबीर वाटंगी, मुस्तफा मुजावर, मुबारक नुलकर, जावेद मुजावर, डॉ.उल्हास त्रिरत्ने, कॉम्रेड काशिनाथ मोरे, मजीद मुल्ला, जुबेर माणगावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. वंचिताचे नेते महेश परूळेकर प्रमुख मांडणी करताना म्हणाले, की संविधान तळातल्या तळच्या माणसाचा विचार करते संविधान हे जात धर्म पंथ असा भेद न मानता समतेची आणि न्यायाची भूमिका भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्याकांच्या भ्रम आणि वास्तव दूर करण्यासाठी सत्याचा पुढाकार घेऊन आपल्याला भारतीय राज्यघटनेला घेऊन चालावे लागेल. मुस्लिम समाज भ्रम आणि वास्तव याबाबतची मांडणी करताना फारूख गवंडी सामाजिक कार्यकर्ते म्हणाले, भ्रम आणि वास्तव्याचा विचार विवेक वादाच्या कसोटीला घेऊन करावा लागेल भारतीय समाजामध्ये असे भ्रम पै उपलब्ध तयार करून जन माणसांचं मन आणि मेंदू बिघडवला जात आहे यासाठी आपण सर्वांनी भारतीय संविधानाला घेऊन या सगळ्या गोष्टींना लढा देण्यासाठी एकत्र आले पाहिजे. परिषदेच्या शेवटी संविधानाला प्रमाण मानून वेगवेगळे ठराव करण्यात आले. स्वागत हे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित सच्चर समिती आणि मागासलेले मुस्लिम हे पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर खेडेकर यांनी केले.प्रास्ताविक मौजुद मानगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अब्दुलकरीम कांडगावकर यांनी व्यक्त केले. परिषदेला मुस्लिम समाजासह कष्टकरी राबणाऱ्या स्त्री-पुरुष नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.