Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रहरपवडे ता. आजरा - गावातील ग्रामदैवत रासूबाई देवीचे मंदिर अखेर केले खुले.

हरपवडे ता. आजरा – गावातील ग्रामदैवत रासूबाई देवीचे मंदिर अखेर केले खुले.

हरपवडे ता. आजरा – गावातील ग्रामदैवत रासूबाई देवीचे मंदिर अखेर केले खुले.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_0

हरपवडे ता. आजरा येथील ग्रामदैवत रासूबाई देवीचे मंदिर अखेर भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. मागील सहा सात महिन्यापासून देवस्थान समिती व पुजारी यांच्यामध्ये अंतर्गत वादात मंदिर बंद करण्यात आले होते. जिल्हाधिकारी व देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या आदेशाने मंदिर भक्तासाठी खुले करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे सहा.सचिव श्री. दिंडी, श्री. मिटके, सर्कल कुरणे, तलाठी श्री पाटील, पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार पांडुरंग यलकर, रवळनाथ स्थानिक सल्लागार उपसमिती आजरा चे अध्यक्ष आनंदा कुभार व रवळनाथचे पुजारी संदिप गुरव व हरपवडे गावचे पोलीस पाटील सौ.निलोफरताई मुल्ला, सरपंच सागर पाटील व हरपवडे गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मंदिर खुले करण्यात आले. रासुबाई भक्तानी समाधान व्यक्त केले. रवळनाथ स्थानिक सल्लागार उपसमिती,आजरा
यांच्याकडे देखभालीसाठी देण्यात आले आहे.

चौकट.

कार्यालयीन आदेश

मो. हरपवडे ता. आजरा जिल्हा कोल्हापूर येथील
रासुबाई देवस्थान हे महाराष्ट्र शासनाने या कार्यालयाकडे स्थावर व जंमग मालमत्तेसह व्यवस्थेसाठी सुपूर्द केले असून, त्याचा अधि. क्रं.१७७२ असनू रजि न.३२४२ असा आहे. उक्त देवस्थानांची स्थानिक व्यवस्था पाहणे करिता या कार्यालयाकडून नियुक्त केलेल्या उपसमितीची मुदत संपलेनंतर, उपर्सामती पदाधिकारी, कांही ग्रामस्थ व गुरव समाज यांचेमध्ये वाद निर्माण होऊन मंदिरास कुलपे लावून देवालय बंद केले असलेचे चौकशी अंती निदर्शनास आले. सदरचा वाद मिटविणेबाबत देवस्थान व्यवस्थापन समिती कडून वेळोवेळी प्रयत्न करणेत आला परंतु उपसमिती, कांही ग्रामस्थ व गुरव समाज हे आप आपले मतावर ठाम असलेने वाद मिटवता आला नाही. त्यामुळे मंदिर जरी उघडले तरी पूजा-अर्चा वरुन वाद होण्याची शक्यता असलेने पूजा अर्चासाठी पर्यायो व्यवस्था निर्माण करणे योग्य होईल असे मत झाले.
वरील प्रमाणे गावातील वादामुळे मंदिर गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेने देवीची पुजा अर्चा बंद आहे. उपर्सामती, ग्रामस्थ व गुरव समाज हे आप आपले मतावर ठाम असलेने पूजा अर्चावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दैनिदिन पुजा अचांसाठी पोलिस पाटील मौ. हरपवडे यांचे नियंत्रणाखाली मौ. आजरा येथील देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीने उक्त देवस्थानची पुढील आदेशापर्यंत योग्य ती पुजेची व्यवस्था करणेस मंजुरी देणेत आली आहे.
सवव उक्तकामी देवस्थान व्यवस्थापन समिती कडील सहा. सचिव यांना आवश्यक ते महसूल यंत्रणेचे सहकार्य घेऊन मंदिराला लावलेली कुलपे काढून भाविकासाठी श्री. रासुबाई मंदिर खुले करणेस या पत्राव्दारे प्राधिकृत करणेत आलेले आहे. तरी सहा. सचिव यांनी सदर देवस्थानकडील व दैनंदिन पूजा अर्चा चालु राहणेसाठी मो. आजरा येथील श्री. रवळनाथ देवस्थान कडील स्थानिक सल्लागार उपसमितीला पुढील आदेशापर्यंत पुजेची व्यवस्था करणेकामी सुचना करणेत याव्यात व त्याबाबचा अहवाल सादर करावा. असे कार्यालयीन आदेशात म्हटले आहे.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.