देवर्डे हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.
( सरपंच कल्पना चाळके यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण.)
आजरा.- प्रतिनिधी.

देवर्डे श्री रवळनाथ हायस्कूल मधील मार्च २०२४ दहावीच्या विद्यार्थ्यांचा तसेच एन. एम. एम. एस प्रज्ञाशोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षा सरपंच कल्पना चाळके होत्या. प्रास्ताविक देवेंद्र शिखरे यांनी केले मुख्याध्यापक सुभाष सावंत, निवृत्ती कांबळे, सुभाष कांबळे, सुनील सुतार याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी मुख्याध्यापक विनायक आमनगीविद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र पाटील, अशोक जाधव, दत्तात्रय एल्गार शिरसंगी, युवराज देसाई, संजय देसाई, मारुती चाळके, सुनील दिवेकर, अजिंक्य तानवडे, कृष्णा ढोकरे, महादेव दिवेकर, पांडुरंग गुरव, राजाराम गुरव, महेश नावलगी, रामचंद्र गुरव, प्रकाश देसाई आजरा बाबासाहेब तानवडे, तुकाराम गावडे, प्रभाकर बागडी यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र पाटील आभार चंद्रकांत घुरे यांनी मानले.
देवर्डे हायस्कूल येथे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी.

देवर्डे हायस्कूल येथे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती येथील श्री रवळनाथ हायस्कूलमध्ये शाहू जयंती वृक्ष लावुन साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत घुरे यांनी प्रतिमा पूजन केले यावेळी शौर्या चाळके दिव्या चाळके वैष्णवी बागडी माजी विद्यार्थी भूमी देशमुख यांनी भाषणे केली राजेंद्र पाटील महेश नावलगी या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच याप्रसंगी वृक्षारोपण परिसर स्वच्छता करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक सुभाष सावंत देवेंद्र शिखरे या शिक्षकासह विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.