दिशादर्शक फलकावर गडहिंग्लज च नाव समाविष्ठ करा.- अन्यथा फलक उखडून टाकू. ( उपविभागीय अधिकारी
गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांना मनसेचा इशारा.)
आजरा.- प्रतिनिधी.
बांधा संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ चे काम पूर्णत्वाकडे जात आहे. काही अंतिम टप्प्यातील कामे सुरू असून ठीक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे संकेश्वर नजीक असलेल्या हिटणी गावाजवळ उभारण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर गडहिंग्लज शहराचे नाव वगळण्यात आल्याचे दिसते. संकेश्वर पासून पंधरा किलोमीटरवर असणाऱ्या गडहिंग्लज शहरात मुख्य बाजारपेठ आहे. या शहराच्या मुख्य बाजारपेठेतून हा महामार्ग जात असून सुद्धा त्या ठिकाणच्या नावाचा उल्लेख फलकावर नसल्याचे आढळते.जाणीवपूर्वक शहराचे नाव वागल्यामुळे नागरिकांच्यातून संतप्त भावना उमटत आहेत. परिणामी बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांना गडहिंग्लज शहराचे नाव दिसत नसल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. या ठिकाणच्या दिशादर्शक फलकावर गडहिंग्लज शहराचे नाव संमधीत रस्ता अस्थापना अधिकारी यांना सांगून ताबडतोब समाविष्ट करावे अशी मागणी आम्ही या निवेदनातून आपणाकडे करत आहे तसे न झाल्यास मनसेच्या वतीने सदर दिशादर्शक फलक उखडून टाकण्यात येईल होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील. असे निवेदन मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले व पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.