Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमहायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे व महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्यात होणार...

महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे व महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्यात होणार लढत..🛑.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा आढावा.- शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करा.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.

🟥महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे व महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्यात होणार लढत..
🛑मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा आढावा.- शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करा.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.

( उद्या बुधवारी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज.- तर सिंधुदुर्गात ३४ मतदार केंद्रावर १८ हजार ५५१ मतदार बजावणार उद्या बुधवारी मतदानाचा हक्क…)

सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणुक मंगळवार दिनांक २६ जून रोजी होत असून या निवडणुकीत महायुतीकडून निरंजन डावखरे व महाविकास आघाडीकडून रमेश किर या दोन उमेदवारांसह एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ मतदान केंद्रावर १८ हजार ५५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी मतदानाची वेळ ठेवण्यात आली असून निवडणुकीकरिता १८२ निवडणूक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.ही मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे दिली आहे.
🟣कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी, खरी लढत विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांच्यातच लढत होणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून दोन्ही उमेदवारांकडून प्रचार यंत्रणा जोरदार राबविली जात आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हय़ातील पदवीधर मतदार मतदान करणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १८ हजार ५५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
🅾️सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वीच्या निवडणूकीत ५ हजारच मतदार होते. मात्र यावेळी मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने मतदान केंद्रेही बाढविण्यात आली असून एकूण ३४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.तसेच ही निवडणूक पारपाडण्यासाठी १८२ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदाराना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे
.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा आढावा.- शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करा.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.


मुंबई, दि. २५.प्रतिनिधी.

राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या.
🟣सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरीपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधा, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
🅾️मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, शेतकरी देशाचा कणा आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य शासन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगतानाच बांबु लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे असे तालुके, जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांननी यावेळी दिल्या.
🛑बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ते केले. कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रियस्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. हवामेन विभागाने जुलै महिन्यात ला निना मुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत आपत्कालिन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.
🟥खरिपाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे खते व अन्य कृषी निविष्ठांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केलेले आहे. मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार शेतकऱ्यांनी व्हाट्स अपद्वारे ९८२२४४६६५५ या क्रमांकावर करावी असे आवाहन कृषीमंत्री श्री.मुंडे यांनी प्रास्ताविक करताना केले.
💥यंदा खरीपाचे लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र १४२.३८ लाख हेक्टर राहणार असून यामध्ये कापूस पिकाखाली ४०.२० लाख हेक्टर, सोयाबीन पिकाखाली ५०.८६ लाख हेक्टर, भात पिकाखाली १५.३०लाख हेक्टर, मका पिकाखाली ९.८० लाख हेक्टर, कडधान्य पिकाखाली १७.७३ लाख हेक्टर क्षेत्र येणार आहे. राज्यात २४.९१ लाख क्वि. बियाणे उपलब्ध असून १.५० लाख मे. टन युरिया व २५ हजार मे. टन डीएपी खतांचा संरक्षित साठा करण्यात आल्याची माहिती प्रधान सचिव श्रीमती राधा यांनी दिली .

महाराष्ट्र राज्य विधानपरिषद निवडणूक
मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ.

🔴मतदान बुधवार दि. २६ जून २०२४ वेळ सकाळी ०७.०० ते सायं. ०६.००

🅾️सुशिक्षित आणि जबाबदार चला बजावू मताधिकार

🟥मतदान केंद्रावर जाताना आपले वैध मतदार ओळखपत्र (EPIC) किंवा खालीलपैकी कोणताही एक दस्तऐवज आपले ओळखपत्र म्हणून सादर करावे.

) आधार कार्ड
२) वाहन चालक परवाना
३) पॅन कार्ड
४) भारतीय पासपोर्ट
५) राज्य/केंद्र शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य खाजगी उद्योग समूहांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र
६) लोकसभा/राज्यसभा/विधानसभा/विधानपरिषद सदस्यांना वितरित ओळखपत्र
७) शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना संबंधित संस्थांकडून वितरित ओळखपत्र
८) पदवी/पदविकेचे विद्यापीठाने निर्गमित केलेले मूळ प्रमाणपत्र
९) सक्षम प्राधिकरणाकडून वितरित दिव्यांग प्रमाणपत्र
१०) दिव्यांग विशेष ओळखपत्र

🟥मतदानाच्या आधी https://gterollregistration.mahait.org/GTRoll/Search या दुव्याला भेट द्या..आणि मतदारसंघ, जिल्हा, आपले नाव – मधले नाव – आडनाव हे तपशील भरून मतदार यादीतील आपले नाव आणि मतदान केंद्राची माहिती तपासा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.