आचारसंहितेपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे .
अनावरण व्हावे.- अन्याय निवारण समितीची मागणी.
आजरा.- प्रतिनिधी.
आचारसंहितेपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे .
अनावरण व्हावे अशी मागणी अन्याय निवारण समितीने अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कमिटी. यांना निवेदनाने केली आहे. निवेदनात म्हटले आहे.
मागील पाच वर्षापासून लोकवर्गणी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून वेळोवेळी मिळालेला निधी, विविध संस्थांनी केलेले योगदान, शहरवासीयांनी उभारलेला निधी यामधून आजरा येथे छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरु आहे. हे काम अतिशय संथ गतीने चालु आहे. वास्तविक या कामाचे काही दिवसापूर्वीच उद्घाटन होणे गरजेचे होते. परंतु तसे काही घडलेले नाही. प्रत्यक्षात याठिकाणी महाराजांचा पुतळा आणुन जागेवर बसवण्यात आला असून तो फार काळ झाकलेल्या अवस्थेत ठेवणे हे तमाम शिवप्रेमींच्या दृष्टीने अपमानास्पद आहे. याबाबत आम्ही आपणाला सूचित करतो की, विधानसभेची निवडणूक आचारसंहिता सुरु होण्यापूर्वी या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात यावे अशी तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे. याबाबत आपण गांभिर्याने दखल न घेतल्यास आजरा अन्याय निवारण समिती व स्थानिक वर्गणीदार यांच्या पुढाकाराने शिवतिर्थावर सुशोभिकरणासाठी रुपये पन्नास लाख रुपयांचा घसघशीत निधी उपलब्ध करून देणाऱ्या आमदार प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते सदर पुतळ्याचे उद्घाटन केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर. परशुराम बामणे अध्यक्ष पांडुरंग सावरतकर सेक्रेटरी, सुधीर कुंभार सचिव, विजय थोरवत उपाध्यक्ष, सदस्य, संदिप पारळे, गौरव देशपांडे,, वाय.बी. चव्हाण, राजु विभुते
परेश पोतदार, संजय जोशी, दिनकर जाधव, संतोष शेवाळे सह समिती सदस्य यांच्या सह्या आहेत.
