Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रनाशिकमध्ये चक्कर येऊन सहावीतील मुलीचा शाळेतच मृत्यू.

नाशिकमध्ये चक्कर येऊन सहावीतील मुलीचा शाळेतच मृत्यू.

🟥नाशिकमध्ये चक्कर येऊन सहावीतील मुलीचा शाळेतच मृत्यू.

नाशिक :- प्रतिनिधी.

चक्कर आल्यामुळे एका विद्यार्थिनीचा शाळेच्या वर्गातच मृत्यू झाला आहे. नाशिकच्या सीडको परिसरातील खासगी शाळेतील ही घटना आहे. ही विद्यार्थिनी सहावीत शिकत होती. पण चक्कर येऊन बेंचवरून खाली पडल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाला आहे.
🟥शाळेतच अचानक मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलीचा मृत्यू कसा झाला. याबाबत कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. ६ वीत शिकणाऱ्या या मुलीचं नाव दिव्या त्रिपाठी (वय-११) असं आहे. वर्गातच अचानक मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला आहे.
🅾️ही विद्यार्थीनी सहावीत शिकत होती. सोमवारी सकाळी ८ वाजता तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शाळेत बेंचवर बसलेली असताना तिला अचानक चक्कर आली आणि ती बेंचवरुन खाली पडली. त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दिव्या ही उंटवाडी येथील जगताप नगर परिसरात राहते. शाळेचे शिक्षक चैताली चंद्रात्रे आणि वडील प्रतेश त्रिपाठी यांनी तिला उपचारासाठी नाशिकमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.