Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा महाविद्यालयात नवागतांचे स्वागत.( 'चांगला माणूस बनविण्याचे व्यासपीठ म्हणजेच आजरा महाविद्यालय'- सिने...

आजरा महाविद्यालयात नवागतांचे स्वागत.( ‘चांगला माणूस बनविण्याचे व्यासपीठ म्हणजेच आजरा महाविद्यालय’- सिने अभिनेते आत्माराम पाटील .)🛑आजऱ्यात होणार संविधान परिषद” परिषद मध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा.- संग्राम सावंत. ( ३० जुन रविवार)

🛑आजरा महाविद्यालयात नवागतांचे स्वागत.
( ‘चांगला माणूस बनविण्याचे व्यासपीठ म्हणजेच आजरा महाविद्यालय’- सिने अभिनेते आत्माराम पाटील .)
🛑आजऱ्यात होणार संविधान परिषद” परिषद मध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा.- संग्राम सावंत. ( ३० जुन रविवार)

आजरा दि. २५ -प्रतिनिधी.

आजरा महाविद्यालय आजरा मध्ये इयत्ता अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान मधील नवागतांचा स्वागत सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेते आत्माराम पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभाग प्रमुख डॉ आनंद बल्लाळ होते.
या कार्यक्रमात ‘जगण्यासाठी हसा व हसण्यासाठी जगा’ या कार्यक्रमाचे हजारापेक्षा अधिक प्रयोग करणारे लोकप्रिय अभिनेते श्री आत्माराम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ‘तुमच्यामधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय हे अत्यंत चांगले व्यासपीठ आहे या व्यासपीठावरून एक चांगला माणूस बनण्यासाठी ज्ञान संपादन करा. आजरा महाविद्यालयासारख्या नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश केला हे तुमच भाग्यच आहे. येथील सर्व प्राध्यापक ज्ञानदान करण्यासाठी कटिबद्ध आहेत. ज्ञानदानाबरोबरच सर्व कौशल्यांचा विकास व व्यक्तिमत्त्वाचा विकास नक्कीच या ज्ञानपीठातून होईल यात काही शंका नाही. यशाची नवी शिखरे गाठत असताना आपल्याला पाठीमागे वळून पाहणे गरजेचे असते. आपल्या यशामागील आई-वडील, शिक्षक व गुरुजन यांना कदापिही विसरू नका’ असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘महाविद्यालय हे ज्ञानाचे भांडार आहे तुम्हाला जे हवे आहे ते अमर्यादपणे आत्मसात करा. स्वकर्तुत्वावर तुम्ही यशाची शिखरे पादाक्रांत करा. महाविद्यालयातील सर्व सोयी सुविधांचा लाभ घ्या’ असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले
इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालय आणि शिक्षकांचे महत्त्व पटवून दिले. तसेच इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीच्या सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील उपस्थित होते. तर प्रा.विनायक चव्हाण प्रा.मल्लिकार्जुन शिंत्रे प्रा.अल्बर्ट फर्नांडिस प्रा.वैशाली म. देसाई प्रा.शोभा केंद्रे, प्रा.संजीवनी कांबळे , प्रा.पल्लवी नार्वेकर, प्रा. पुनम पाटील, प्रा. वैशाली पा. देसाई ,आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत प्रा.विठ्ठल हाक्के तर प्रास्ताविक प्रा. सौ. सुवर्णा धामणेकर यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्रा.अनिल निर्मळे यांनी तर आभार वैशाली देसाई यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.रत्नदीप पवार यांनी केले.

🛑आजऱ्यात होणार संविधान परिषद” परिषद मध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा.- संग्राम सावंत. ( ३० जुन रविवार)

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131074

आजऱ्यात संविधान परिषद” होणार असून या परिषदेत
मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन संग्राम सावंत यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. २५ जुन रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री सावंत म्हणाले.
रविवार दि. ३० जून रोजी भारतीय संविधानाला प्रमाण मानून भारतीय मुस्लिम समाजाच्या न्याय हक्क व अधिकारासाठी तसेच ” भारतीय मुस्लिम समाजाबद्दल असलेले भ्रम आणि वास्तव” यांची ठोसपणे मांडणी करण्यासाठी “संविधान परिषद” आम्ही आयोजित केलेली आहे. भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्याकांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न भारतीय राज्यघटनेत जागोजागी आपल्याला दिसतो. भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्यांकासाठी खास तरतूदी करून ठेवल्या आहेत. भारतीय नागरिकांना असलेले सर्व अधिकार भारतातील मुस्लिम व इतर अल्पसंख्याकांना आहेतच. भारतीय राज्यघटनेने समाजवादी भारत बनविण्याचे आश्वासन दिले. समाजवाद म्हणजे समता प्रस्थापित करण्याचे आश्वासन, सर्वांना विकासाची संधी देणे, सर्वांना सुरक्षितता देणे अशा अनेक गोष्टी राज्यघटनेत आहेत. मात्र घटनेच्या या तरतूदींची अंमलबजावणी कोणी कशी केली, किंवा केली नाही यासंबंधी बरेच काही म्हणता येते. परंतु स्वातंत्र्यानंतर घटनाकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करताना मुस्लिम व इतर अल्पसंख्यांकाना देशाच्या मुख्यप्रवाहात सामील करून घेण्यासाठी पुरेशा तरतूदी करून ठेवल्या आहेत आणि स्पष्टपणे पुरेसे मार्गदर्शन करून ठेवले आहे.याची जागृती करण्यासाठी ही परिषद आयोजित केलेली आहे. मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या पातळीवर महाराष्ट्र राज्यभर ही मोहीम आम्ही खालील मुद्द्याला घेऊन राबवणार आहोत. जमिनी मिळविण्याचा प्रश्न, कर्जे मिळविण्याचा प्रश्न, कारागिरांचे खास प्रशिक्षण मिळविण्याचा प्रश्न, अल्पसंख्यांक समाजाच्या खास संस्था उभारण्याचा व टिकविण्याचा प्रश्न, एकूण शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रश्न, मुस्लिम ओबीसी यांच्या नोंदी राज्य व केंद्रीय मागासवर्गीय कमिशनकडे करण्याचा प्रश्न, महाराष्ट्रातील मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न, मदरशांना शाळेचा दर्जा देऊन मदरशातील विद्यार्थ्यांना मुख्यप्रवाहातील शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रश्न, मदरशांचे आधुनिककरण व सक्षमीकरण करण्याचा प्रश्न, वक्फ बोडांच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा प्रश्न, मशिदीतील इमाम व मौजन यांना नियमित वेतन देण्याबाबतचा प्रश्न, मॉब लिंचिंग सारख्या हिंसाचार विरोधी कडक कायदा करण्याबाबतचा प्रश्न, मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा प्रश्न, अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण मिळण्याचा प्रश्न, जिल्हानिहाय ऊर्दू माध्यमिक महाविद्यालय सुरू करण्याचा प्रश्न, अल्पसंख्यांक आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचा प्रश्न, अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा प्रश्न, मुस्लिम बहुल वस्त्यांच्या सुधारणे करीता मुस्लिम वस्ती सुधार योजना सुरू करण्याचा प्रश्न, शासकीय सेवा व नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रश्न, बेरोजगारांना सहज व सुलभ कर्ज देण्याचा प्रश्न, अशा अनेक प्रश्नांबाबत भारतीय राज्यघटनेने अल्पसंख्याक समाजाला संरक्षण आणि आधार दिलेला आहे. मात्र प्रस्थापित व्यवस्थेने दयाबुध्दीने आणि वरकरणी आस्था दाखवून जणू उपकार केल्यासारखे थोडेफार प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केलेले आहेत. मात्र ते परिपूर्णतेकडे गेलेले नाहीत, हे प्रश्न हास्यास्पद ठरत आहेत. यातून एकूण मुस्लिमांची मुक्ती होणार नाही. परंतू एकूण व्यवस्था बदलाच्या दृष्टीने रामाजाची वाटचाल व्हावी. या एकजूटीने “एकमेय लोक” या क्रांतीबा जोतीराव फुले यांच्या भूमिकेने पुढे आम्ही जाणार आहोत. यामध्ये फक्त मुस्लिम समाजाबरोबर इतर समाज या सगळ्या प्रक्रियेत सामील होणार आहे. लोकशाही हा केवळ राज्यघटनेच्या उद्देशिकेतील शब्द नाही. तो आपल्या जगण्याचा भाग झालेला आहे. आपले लोकशाही हेच ध्येय बनले पाहिजे. लोकशाहीपेक्षा तसूभरही आपण वेगळे पाऊल टाकता कामा नये.त्यामुळेच हुकूमशाहीची व एकाधिकारशाहीची वाट मोकळी होऊन फॅसिझमचे धोके या देशात वाढलेले आहेत. त्यामुळे भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी संविधान सन्मान परिषदेच्या माध्यमातून करणार आहे. मुस्लिम समाजाचा सामाजिक, आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी जे प्रयत्न झाले. ते ही अपुरे आणि भेदभाव निर्माण करणारे आहेत. स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ ७७ वर्षे झाली तरीही तीच अवस्था आहे. आजची ही स्थिती लक्षात घेता. अवस्था बिकट झालेली आहे. ही बिकट झालेली ही अवस्था भारतीय राज्यघटनेच्या स्पष्ट आदेशाप्रमाणे सर्व मागासलेल्या वर्गांचे मागासलेपण दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मुस्लिमांचे व मुस्लिमांच्यातील मागासलेल्या वर्गांचे मागासलेपण दूर करण्याची जाबाबदारी सरकारची आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढून मुस्लिम समाजातील विशेष मागास घटकांसाठी ५% शैक्षणिक आरक्षण दिलेले आहे. सदरील आरक्षण उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. परंतू महाराष्ट्र शासनाने हे आरक्षण लागू केलेले नाही. अशा अनेक प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासन डोळेझाक करत आहे. त्यामुळे आम्ही भारतीय संविधानाला प्रमाण मानून भारतीय मुस्लिम समाजाच्या न्याय हक्क व अधिकारासाठी तसेच “भारतीय मुस्लिम समाजाबद्दल असलेले भ्रम आणि वास्तव” यांची ठोसपणे मांडणी करण्यासाठी “संविधान परिषद” आयोजित केलेली आहे. या न्याय्यहक्क अधिकार लढा-संविधान परिषदेला मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. भारत पाटणकर (ज्येष्ठ विचारवंत व राष्ट्रीय अध्यक्ष श्रमिक मुक्ती दल या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.तसेच बीजभाषण करणार आहेत.
रियाजभाई शमनजी (चेअरमन, शमनजी ग्रुप अँड इन्स्टिट्यूट);डॉ.नवनाथ शिंदे (ज्येष्ठ विचारवंत); बाळेश नाईक(नेते, जनता दल);अब्दुलवाहिद सोनेखान (माजी सैनिक भारत सरकार) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. इंजि. फारूख गवंडी (सामाजिक कार्यकर्ते, मिरज);महेश परुळेकर (नेते-कष्टकरी व वंचितांचे, सावंतवाडी); प्रा. अशफाक मकानदार (सामाजिक कार्यकर्ते, गडहिंग्लज)प्रमुख मांडणी करणार आहेत. संग्राम सावंत (राज्याध्यक्ष, मुक्ती संघर्ष समिती) हे परिषदेची भूमिका मांडणार आहेत. यावेळी आलम नाईकवाडे रशीद पठाण अबूसय्यद माणगावकर, सलीम लतीफ, अमित खेडेकर, टॉपिक माणगावकर बबलू शेख, करीम कांडगावकर, कुदरत लतिफ, सह मुस्लिम बांधव उपस्थित होते. समीर खेडेकर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.