शाळेची छत दुरुस्तीची गरज. – विद्यार्थ्यांची हाक.- आजरा मडिलगे प्राथमिक शाळेच्या खोल्याची छताची दुरावस्था.
आजरा.- संभाजी जाधव.
आजरा तालुक्यातील मडिलगे येथील प्राथमिक शाळेच्या काही खोलीची दुरावस्था झाली आहे.
या शाळेमध्ये शासनाच्या पाच खोल्या आहेत. यापैकी पाचही खोल्या नादुरुस्त आहेत. परंतु २०२३ साली शासन खर्चाने यातील एक खोली लोखंडी छताने दुरुस्त केली आहे. शिल्लक चार यादेखील खोल्या डागडुजीला आल्या आहेत. परंतु लोकसभागातून बांधण्यात आलेल्या चार खोल्याचे छत तात्काळ दुरुस्त करणे गरजेचे आहे. सद्या पावसाळा सुरू आहे. आजरा तालुक्यात प्रचंड पाऊस असतो यामुळे विद्यार्थी यांच्यावर कधी छत कोसळेल अशी नसली तरीही फार वर्षांपूर्वी जीर्ण झालेले छत आहे. येथील विद्यार्थ्यांना “शाळेचे छत” दुरुस्त करावे व परिस्थिती अशीच राहिल्यास पावसाळ्यात छत्री घेऊन विद्यार्थ्यांना बसण्याची वेळ येईल. या शाळेचे छप्पर दुरुस्ती कोणी करुन देईल का.? या प्रतिक्षेत विद्यार्थी आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शाळेच्या खोल्या दुरुस्ती होतील यासाठी प्रयत्न चालू असल्याचे समजते. परंतु व्यवस्थापन समिती अनेक वेळा तात्पुरती डागडुजी फुटलेल्या खापऱ्या बदलण्याचे काम स्वतः करत असते. माकडांचा उपद्रव जास्त असल्यामुळे नेहमीच गळतवणी काढावी लागते. परंतु सातत्याने पाठपुरवठा करून देखील जि. प. शिक्षण विभागाला गार्भीय नसेल तर शेवटी गावच्या सहभागातून दाखवून दिले पाहिजे होत. आम्ही ग्रामस्थ सक्षम आहोत आमची शाळा सांभाळण्यासाठी यासाठी दानशूर ग्रामस्थांनी शाळा दुरूस्ती करण्यासाठी पुढे आले पाहिजे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून आजही काही गावातील शाळा या चांगल्या व स्वच्छ सुंदर ग्रामस्थांच्या सहकार्यातून अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न झाला आहे. सद्यस्थितीत याच शाळेतून शिकून गेलेले सुशिक्षित पालक आपली मुलं उच्चशिक्षित व्हावी. चांगले शिक्षण मिळावे. यासाठी तालुक्याला शिक्षणासाठी पाठवत आहेत. तसा आपला मुलांना कोठे शिक्षण द्यावे. हा त्या पाल्यांचा विषय आहे. तरीही या शाळेचा पट जवळपास २०० आहे. गावातील विद्यार्थी मुळात जिल्ह्यात व राज्यात नावलौकिक असलेली मडिलगेची श्री शंकरलिंग विद्या मंदिर प्राथमिक शाळा आहे. या शाळेचा पट कमी होत आहे. यापुढेही आणखी कमी होऊ नये म्हणून तशी जबाबदारी ही शासनाची, सोबत ग्रामस्थांची आहेच. पण या शाळेतील विद्यार्थी राज्य पातळीवर व जिल्हा पातळीवर अनेक वेगवेगळ्या उपक्रमातून समूहगीत तसेच अन्य कला क्रीडा संस्कृतीक, शैक्षणिक यामध्ये पुढे येत आहेत. परंतु अशा ग्रामीण भागातील शाळेकडे जि. प. शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्यास जिल्हा परिषद शाळा ओस पडायला वेळ लागणार नाही. शिक्षण चांगले असून पटसंख्या कमी होण्याचे कारण हे जि. प. शिक्षण विभागाचा नियोजनाचा अभाव आहे. अशी चर्चा या विभागातील नागरिकांची आहे. यापूर्वी या शाळेतील शिक्षक व समितीने पंचायत समिती, जिल्हा परिषद विभागातील लोकप्रतिनिधी यांना सदर शाळा दुरुस्ती बाबतचे प्रस्ताव दिले असावे. प्रतेक्षात काही लोकप्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष दर्शनी पाहणी केली आहे. परंतु या शाळेकडे अद्यापही लोकप्रतिनिधी व शासनाचे दुर्लक्ष आहे. हा सावळा गोंधळ थाबुन लवकरात – लवकर या शाळेची दुरुस्ती व्हावी. तसेच स्थानिक नेते मंडळी लोकप्रतिनिधी यांचे या शाळेकडे दुर्लक्षच होत आहे. असा संदेश बाहेर जाऊ नये तत्पूर्वी. किमान सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन ही शाळा सामाजिक बांधिलकी जपून लोकसहभागातून दुरुस्ती व्हावी. अशी अपेक्षा आहे.
चौकट.
श्री शंकरलिंग विद्या मंदिर मडिलगे ता. आजरा . जि. कोल्हापूर शाळा बौद्धिक व कला क्रीडा संस्कृतीक स्पर्धेमधून बाहेर जाणार नसली तरीही. याबाबतची जबाबदारी देखील ग्रामस्थांची आहे. आपल्या गावची शाळा आहे. स्वच्छ व सुंदर जिल्ह्यात, राज्यात आणखीन चांगल्या क्रमांकावर यावी यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो हा लोकसहभाग या गावांमध्ये आहेच. परंतु इतक्या प्रमाणात उठाव व सहभाग झालेस अशक्य असे काहीच नाही. यासाठी गरज आहे. लोक सहभागातून आपली शाळा स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी दानशूरांनी पुढे येण्याची..तस
कागल विधानसभा मतदारसंघात येणारे हे गाव कार्यसम्राट पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी दत्तक घेतले आहे. शाळा समितीने असा प्रस्ताव ना. पालकमंत्री यांच्याकडे दिल्यास. त्यांच्यासाठी हा फार मोठा विषय नाहीच. यासाठी तसा प्रस्ताव ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीने दिल्यास तात्काळ हा छताचा प्रश्न मार्गी लागेल..

