अति वेगाने… राष्ट्रीय महामार्गाचा आस्वाद घेत इनोवा गाडीचा आजऱ्यात अपघात.- सुदैवाने दुखापत नाही.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील साळगाव तिट्टा नजीक नव्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने असलेल्या इनोव्हा गाडीचा अपघात झाला आहे.
भरधाव वेगाने आलेली ईनोवा गाडी एका गॅरेज मध्ये घुसली.
गाडीमध्ये लहान मुलांसह परिवार होता परंतु कोणालाही दुखापत झाली नाही. नव्या महामार्गावर गाडी सावकाश चालवावी आपल्या परिवाराची काळजी घ्यावी
