Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रयमेकोंड येथे `कर्नाटकी बेंदूर' उत्साहात साजरा…🛑आजरा मडिलगेत कर्नाटकी बेंदूर पारंपारिक वाद्याच्या गजरात...

यमेकोंड येथे `कर्नाटकी बेंदूर’ उत्साहात साजरा…🛑आजरा मडिलगेत कर्नाटकी बेंदूर पारंपारिक वाद्याच्या गजरात उत्साहात साजरा.

🛑यमेकोंड येथे `कर्नाटकी बेंदूर’ उत्साहात साजरा…
🛑आजरा मडिलगेत कर्नाटकी बेंदूर पारंपारिक वाद्याच्या गजरात उत्साहात साजरा.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

यमेकोंड ता. आजरा येथे कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबाद प्रमाणे यमेकोंड गावचे शेतकरी दिपक होडगे, उत्तम होडगे, विलास राजाराम, दत्तात्रय आडसोळ, महादेव कुंभार, धोंडीबा हरेर, नामदेव कुंभार, महादेव हरेर, विनायक तिबिले, शामराव कसलकर, अशोक कसलकर, धोंडीबा कांबळे, पांडुरंग पंडित, उत्तम तिबिले व कु. सुयश दिपक होडगे यांनी आपल्या बैलजोड्या विद्या मंदिर यमेकोंड शाळेच्या आवारात नेऊन सजवल्या. बैलमालकांसह सर्व ग्रामस्थांनी बैलजोड्यांची पूजा केली व करीच्या बैलांच्या मानाचा नारळ दत्तात्रय आडसोळ यांच्या हस्ते वाढवण्यात आला. त्यानंतर सर्व बैलजोड्यांची वाजत – गाजत, भव्य-दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये विद्या मंदिर यमेकोंड शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक होडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

🛑आजरा मडिलगेत कर्नाटकी बेंदूर पारंपारिक वाद्याच्या गजरात उत्साहात साजरा.

आजरा.- प्रतिनिधी.‌

Oplus_131074

आजरा तालुक्यातील मडिलगे येथे कर्नाटकी बेंदूर पारंपारिक वाद्याच्या गजरात उत्साहात साजरा करण्यात आला.
हल्ली आधुनिक अवजारे येत असल्यामुळे बैल जोडी चे महत्व कमी होत चालले आहे. तरीही या गावात अजूनही बैलांनी व बैलगाडीने शेतातील कामे चालू असतात. ट्रॅक्टर जरी आधुनिक साधन असले तरी हौशी बैल जोडी मालक आजही पाहायला मिळतात. बैल जोडी बाळगणे सद्यस्थितीला परवडणारे नसले तरी. बैल बाळगण्याचे हौस व बैलानेच आपल्या शेतीची मशागत करण्याची आवड व सवयी लागल्यामुळे आजही शेतकरी बैल जोडी नसेल तर त्याला जमत नाही व गमतही
यामुळे असे हौशी बैल मालक आज आपली बैलजोडी सकाळपासूनच त्यांना स्वच्छ आंघोळ घालून. त्यांची रंगरंगोटी व सजावट करत मिरवणुकीची जय्यत तयारी करून पारंपारिक वाद्य व लेझीम पथक हलगी ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. या मिरवणुकीत बापू येसने, बाळु पोवार, पांडुरंग घाटगे, सदाशिव पोवार, बाळु जाधव, सह गावातील अनेक बैल जोड्या या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.‌ दोन तास चाललेल्या या मिरवणुकीत ग्रामदैवत भावेश्वरी देवी, श्री. शंकर लिंग सर्व गावातील मंदिरांचे दर्शन घेत मिरवणुकीची सांगता केली.. मिरवणूक पाहण्यासाठी गावातील महिला व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गावातील महिलांनी सदर बैलांचे पूजन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.