आता चर्चा टोलनाक्यावरच.- २४ रोजी- संघर्ष समितीचा मोर्चा धडकणार टोलनाक्यावर.
( आजरा तहसीलदार यांना मोर्चाचे निवेदन. )
आजरा.- प्रतिनिधी.

संकेश्वर-बांदा महामार्गावर आजरा शहराजवळ होत असलेला टोलनाका बंद करावा यासाठी आजरा तालुक्यातील जनतेच्या वतीने संकेश्वर-बांदा महामार्गावर टोलमुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. २४ जुन २०२४ रोजी असल्याचे निवेदन टोलविरोधी संघर्ष समितीने आजरा तहसीलदार यांना दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सोमवार रोजी निघणारा मोर्चा संकेश्वर-बांदा महामार्गावर आजरा शहरालगत टोल उभारणीचे काम सुरु आहे. या टोल नाक्याला आजरा शहर आणि तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे. याबाबत वरील संदर्भ क्र. १ ने आम्ही आपणास निवेदन देऊन दि. १० जुन २०२४ रोजी आपल्या कार्यालयावर मोर्चा घेऊन येत आले असे कळविले होते. या निवेदनानंतर आपण महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून बैठक बोलावून आमच्याशी संवाद साधणेचा प्रयत्न केलात. आपण बोलविलेल्या बैठकीला आम्ही टोलमुक्ती संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते चर्चेसाठी आपल्या कार्यालयात हजर होतो. यावेळी महामार्गाचे उपअभियंता व शाखा अभियंता उपस्थित होते. या चर्चेत घेतलेले निर्णय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून पाळले जातील अशी खात्री आपल्या कार्यालयाने दिल्याने दिनांक १० जुन २०२४ रोजी करण्यात येणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.
आंदोलन स्थगित झाल्यानंतर महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत झालेले निर्णय न पाळता उलट टोलनाका उभारणीचे काम जोमाने सुरु केले. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सदर टोलनाक्यावरुन आजरा तालुक्यातील सर्व वाहनाना कायमची सुट मिळावी अशी मागणी संघर्ष समितीने केली होती. यावर वरिष्ठांची चर्चा करुन दि. १२ जुन २०२४ पर्यंत आम्हाला निर्णय कळविला जाईल असे सांगणेत आले. आजरा तालुक्यातील वाहनांना संपूर्ण टोलमाफी व्हावी. आणि याबाबत निर्णय होईपर्यंत टोल उभारणीचे काम थांबविले जाईल असे ठरले होते. पण ते प्रत्यक्षात पाळले गेले नाही. तालुक्यातील वाहनांना संपूर्ण टोलमाफीचा निर्णय कळविलाच नाही उलट टोल उभारणीचे काम मात्र वेगाने सुरु राहील. याबरोबरच हा जो महामार्ग आहे. त्याच्या मुळ आराखड्यात बदल केला आहे असा आरोप कार्यकत्यांकडून झाल्यानंतर मुळ आराखडा टोलमुक्ती संघर्ष समितीला उपलब्ध करून देणेचे ठरले होते. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. रस्त्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. सदर मोबदल्याबाबत प्राधिकरण अधिकाऱ्यांनी आपल्याकडे पैसे उपलब्ध झाले असून एक दोन दिवसात सदरचे पैसे त्यांचे खातेवर जमा होतील असे सांगितले होते. त्याची देखील अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शुक्रवार दि. १४ जुन २०२४ रोजी आजरा तालुक्यातील संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची व्यापक बैठक होऊन टोलमुक्तीसाठी निर्णाय लढा उभारणेचा निर्धार या बैठकीत करणेत आला. त्याची सुरवात म्हणून सोमवार दि. २४ जुन २०२४ रोजी मिनर्वा हॉटेल, आजरा येथून टोलनाका उभारणेच्या स्थळावर मोर्चा काढणेचा निर्णय घेणेत आला आहे. त्यामुळे याबाबत आता काही चर्चा होईल ती टोलनाक्यावरच होईल असा निर्णय झाला. या प्रश्नाशी संबंधीत जबाबदार अधिकाऱ्यांना आपल्याकडून याबाबत सूचना दिल्या जाव्यात. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर कॉम्रेड संपत देसाई, परशुराम बामणे, प्रभाकर कोरवी, अलबर्ट डिसोझा, पांडुरंग सावरतकर, बंडोपंत चव्हाण, विलास नाईक, काशिनाथ मोरे, गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, तानाजी देसाई, वाय.बी. चव्हाण, धनाजी राणे, रविंद्र भाटले, रणजित सरदेसाई, जोतिबा चाळके, प्रकाश मोरुसकर, आबा तानवडे सह संयोजक टोलमुक्ती संघर्ष समिती, आजरा तालुक्यातील सदस्य यांच्यासह आहेत.