Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र आजरा तालुक्यातील – एक ग्रामसेवक निलंबित तर ४ जणांची विभागीय चौकशी! –...

आजरा तालुक्यातील – एक ग्रामसेवक निलंबित तर ४ जणांची विभागीय चौकशी! – गर्जना संघटनेची पत्रकार परिषदेत माहिती.🛑आजरा महाविद्यालयाचे MHT-CET मध्ये उत्तुंग यश..

Oplus_131072

🛑आजरा तालुक्यातील – एक ग्रामसेवक निलंबित तर ४ जणांची विभागीय चौकशी! – गर्जना संघटनेची पत्रकार परिषदेत माहिती.
🛑आजरा महाविद्यालयाचे MHT-CET मध्ये उत्तुंग यश..

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील एक ग्रामसेवक निलंबित तर ४ जणांची विभागीय चौकशी! याबाबत प्रकाश बेलवाडे, अध्यक्ष गर्जना संघटना यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी बोलताना श्री बेलवाडे म्हणाले
अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः कागल विधानसभेतील आजरा तालुक्यातील शासकीय कार्यालयात फक्त विशिष्ट मार्गानेच निरोप आल्यास कामे करण्याची अन्यथा वर्षानुवर्षे न्यायाला ताटकळत ठेवण्याची पद्धत आणि संस्कृती सुरु झाली आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये जनतेप्रती असंवेदनशीलता आणि भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. यामध्ये गरीब निष्पाप जनतेचे हाल होतात. म्हणून गर्जना संघटनेने दि २० सप्टेंबर, २०२३ पासून आजरा पंचायत समिती मध्ये आंदोलन करून अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा योग्य कार्यक्रम करण्याचा निर्धार केला आहे.
मौजे. वडकशिवाले गावामध्ये ग्रामपंचायतीने बोगस ग्रामसभा नोंदवल्या, गावातील २ गुंठे जमीन खाजगी संस्थेने बळकावल्याच्या प्रकारांत ती परत घेण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश असून सुद्धा कार्यवाही केलेली नाही, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर अतिक्रमण प्रकरणी शासनाची दिशाभूल केल्याने गावातील ग्रा.पं सदस्यांचा भष्ट आणि मनमानी कारभार त्याला साथ देणारा भष्ट ग्रामसेवक श्री दीपक परीट याला जिल्हा प्रशासनाने निलंबित करून विभागीय चौकशी लावली आहे. तसेच गटविकास अधिकाऱ्यांना सेवाकाळात कधीही दैनंदिनी न दिल्याने दिलेले भते यांची वसुली करण्याचे आदेश आले आहेत. तसेच १९९१ मध्ये बेकायदेशीर रित्या गावची जमीन श्रीकृष्ण दूध डेरीला देऊन प्रकरण लपविण्यासाठी संपूर्ण प्रोसिडिंग बुकच गायब केल्याने तत्कालीन ग्रामसेवक श्री .पाटील यांचेवर विभागीय चौकशी लागली आहे. तसेच संबंधित डेरी आणि तत्कालीन नोंदणी सह-निबंधक-आजरा यांनी संगनमत करून अभिलेखातील दस्त बदलला असून दूध संस्थेमध्ये सुद्धा बक्षिसपत्र जमिनीसाठी खरेदी खर्च दाखवून भ्रष्टाचार करून सहकाराच्या तत्वांना काळिमा फासला आहे. तालुक्यातील अंगणवाडी सेविका-मदतनीस भरतीच्या फाइल्स गायब होणे याचीही चौकशी सुरु आहे.
मौ बेलेवाडी येथील तत्कालीन ग्रामपंचायतीने भ्रष्ट मार्गाने एका गरीबाची संपत्ती मनमानी करून बेकायदेशीर पद्धतीने दफ्तरी नोंद करण्यात दोषी ग्रामसेवक श्री संभाजी गुरव याचेवर विभागीय चौकशी लावली आहे.
पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी ग्रा.पं. श्री के टी सीताप यांनी भोंगळ कारभार चालवला असून प्रशासनामध्ये शिस्त आणि पारदर्शकता राबविण्याऐवजी दिशाभूल करून प्रकरणे दाबल्यामुळे त्यांची बदली चंदगड येथे झालेली आहे.
तसेच तालुक्यातील वन विभागाने सुद्धा झाडांचे जतन संवर्धन करण्याऐवजी बेसुमार अनावश्यक कत्तली करून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या तालुक्याला ओसाड करायला सुरुवात केली आहे. धामणे गावातील ग्रामपंचायतीने बेकायदेशीर ठराव करून सुमारे ३०० वर्षांहून प्राचीन झाड विनाकारण तोडले आणि भ्रष्ट मार्गाने हास्यास्पद प्रक्रिया राबवून वन खात्याने प्रकरण दाबले. संकेश्वर बांदा महामार्गावर परवानगीपेक्षा अधिक हजारो झाडे तोडून ठराविक ठेकेदारांच्या, अधिकाऱ्यांच्या फाय‌द्याचे गौडबंगाल केले आहे. पडझड प्रकरणी लिलाव, धारणा किंमत यामध्ये पारदर्शकता अजिबात नाही. याबद्दल गर्जना संघटनेच्या शिष्टमंडळाने विभागीय मुख्य वन संरक्षकांना निवेदन सादर केल्याने सदर संपूर्ण प्रकरणांदी काईल पुन्हात आली आहे.
धामणे व विटे गावातील पेय जल योजना मधील भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार, बेलेवाडी-धामणे-होन्याळी गावातील आणि उत्तूर जिल्हा परिषद क्षेत्रातील २५९५ योजनेतून झालेल्या कामातील वारेमाप भ्रष्टाचार, त्यावर बांधकाम विभागाची पळवाट, उत्तूर-जखेवाडी रस्त्यातील अर्धवट काम, असे अनेक प्रकरणे एकाच सत्ताकेंद्राकडे बोट दाखवतात.
सहकार विभागात सुद्धा अन्य गटाच्या सेवा सोसायट्या होताना खेकडी वृत्ती, केडीसी मधील ठराविक संचालकांच्या चेल्यांची मनमानी, अधिकाऱ्यांनी अपात्र असताना देखील घेतलेली कर्जमाफी हि कुंपणाने शेत खाण्याचे उदाहरण आहे. वडकशिवाले येथील सेवा सोसायटी सचिव श्री रविंद्र पाटील यांचेवर जिल्हा केडर ने कारवाई केली असून त्याचे संस्थेमध्ये झालेल्या कर्जमाफीमध्ये आजरा तालुक्यातील तत्कालीन बँक निरीक्षक व विभाग अधिकारी श्री दिवटे यांनी अपात्र असताना देखील स्वतःला, कुटुंबियांना संपूर्ण कर्जमाफी घेतली आहे, त्यामुळे त्यांची वसुली लागली आहे. त्यामुळे सहकार विभागाने फक्त एकाचीच वसुली न लावता केडीसी बँकेच्या सर्व शाखा आणि अधिकाऱ्यांची संदिग्द भूमिका, शासनाला फसवून कर्जमाफी घेणे याची सखोल चौकशी करून ऑडीत करून कारवाई करावी आणि आजही जिल्ह्यातील हजारो शेतकरी त्यांच्या हक्काच्या कर्जमाफीसाठी वणवण करीत आहेत अश्यांना न्याय ‌द्यावा अशी मागणी गर्जना संघटना करीत आहे.


माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतच कामगार खात्याच्या महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक कायदा, १९८१ ची पायमल्ली होत आहे. त्याचा पाठपुरावा जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त सुद्धा करीत आहेत. पण कामगार खात्याच्या फायद्याच्या योजना ओरबाडायच्या आणि नियम मात्र सोयीस्कर रित्या दुर्लक्षित करायचे हि वृत्ती आपल्याला संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कामगारांना न मिळणाऱ्या किमान वेतन काय‌द्याच्या पायमल्लीवरून सुद्धा जाणवते.


वझरे गावच्या प्रभारी मुख्याध्यापकांमुळे महागोंड हायस्कूल ला नामुष्कीची वेळ आली आहे. स्वतः भ्रष्ट कारभारामुळे कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या तथाकथित संचालक श्री रावसाहेब देसाई यांनी सोयीस्कर भूमिका घेतल्याने शाळेतील २ शिपायांना नोकरी घालवावी लागली, पेपरबाजी केल्याने शाळेचे वैभव डबघाईला येऊन यंदा शाळा फक्त २ शिक्षकांवर चालवण्याची वेळ आज आली आहे. अश्या भ्रष्ट शिक्षकांमुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होत असून शाळा व्यवस्थापन समिती-वझरे आणि गर्जना संघटना यांनी रावसाहेब देसाईच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणीवरून लवकरच चौकशी अधिकारी नेमले जातील.
त्यामुळे जिल्हा आणि तालुका प्रशासन मधील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडताना कोणत्याही दबावात न राहता प्रामाणिकपणाने विहित कालावधीमध्ये जनतेची कामे करावीत असे आवाहन गर्जना चे प्रमुख प्रकाश बेलवाडे यांनी केले आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी श्री . दाइंगडे यांच्या कारभारामुळे आज ४ कर्मचाऱ्यांचे बळी गेले आहेत, त्यांच्याही चौकशीची मागणी मान्य झालेली आहे. याचा विचार सर्व विभागांच्या प्रमुखांनी नक्की करावा. तसेच जे अधिकारी-कर्मचारी त्यांचे कर्तव्य पार पाडताना ठराविक गटाच्या बाजूने न्याय देण्याचा प्रयत्न करतील किंवा जाणीवपूर्वक दिरंगाई करतील अश्या अधिकाऱ्यांची यादी तयार करणे सतत सुरु असून विशेषतः मियाबाज अधिकाऱ्यांचा योग्य कार्यक्रम करण्याचे “आमचं ठरलंय” हे अधोरेखित करताना, प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना धीर देण्याचा निर्धार गर्जनाने केला आहे. या पत्रकार परिषदेत बाळू धामणकर, सचिन इंदुलकर, नाथ देसाई,सह गर्जना प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. गर्जना कार्यालय सचिव विनायक चिटणीस यांनी आभार मानले.

चौकट. – तातात्कालीन बँक अधिकारी सुनील दिवटे यांची आरोप वरील प्रतिक्रिया.- मी कर्जमाफीचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल हे ज्यांनी आरोप केले त्यांनी सिद्ध केल्यास मी कोणती शिक्षा भोगायला तयार आहे परंतु आरोप करणाऱ्यांनी सदर आरोप खोटे ठरल्यास कोणती शिक्षा भोगणार हे स्पष्ट करावे. तसेच दूध संस्थांमध्ये केलेले आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत यामध्ये कोणतेही तथ्य नाही यामधील देखील आरोप सिद्ध झाल्यास आम्ही चेअरमन सर्व संचालक शिक्षा भोगायल तयार आहे असे आरोपावर बोलताना श्री दिवटे म्हणाले

🛑आजरा महाविद्यालयाचे MHT-CET मध्ये उत्तुंग यश..

आजरा.- प्रतिनिधी.‌

आजरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी MHT-CET मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे यामध्ये. सन 2023.24 मध्ये घेतलेल्या MHT-CET परीक्षेत आजरा महाविद्यालय, आजराने
उत्तुंग यश मिळवले आहे. या परीक्षेत तांबेकर संकेत प्रकाश याने 98.33 परसेंटाईलज
मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तसेच देशपांडे तुषार रघुनंदन याने 95.47 मिळवून द्वितीय व कवठणकर करण गजानन याने 95.03 मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच निर्मळे नारायण दादा 94.38, जाधव अंकीता शिवाजी 93.38, टोपले गिरीष अजित 93.24, धडाम रिया हरी 92.66, कालेकर समृधी बाळासाहेब 91047, आजगेकर अर्पिता अरुण 90.68, निर्मळे सार्थक सचिन 89.45, लमतुरे अफान इरफान 89.16 या
विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट यश मिळविले आहे. आजरा महाविद्यालयात गेली दोन वर्षे MHT-CET साठी स्वतंत्र मार्गदर्शन केले जाते. अल्पावधीतच आजरा महाविद्यालयाने हे उत्तुंग यश मिळविले आहे. त्यामुळे सर्व थरांतून महाविद्यालयाचे अभिनंदन होत आहे.
MHT-CET साठी श्रीमतीर राजमाने आर.एस., श्रीमती कुलकर्णी एस.एस., श्रीमती. कुंभार जे.एम., श्रीमती. सावंत एस.एस. सुरुंगले ए.ए. गावडे बी.व्ही., गिलविले एस. एस., श्रीमती. कांबळे ए.ए., श्री. गाईंगडे एस.व्ही., मस्कर आर.टी. या तज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले. वायकसकर बी.एम. यांच्या सहकार्याने MHT-CET च्या धर्तीवर कॉलेजमध्ये online mock Test आयोजित केल्या होत्या. त्यांचा फायदा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे झाला.
साठी समन्वयक म्हणून श्रीमती. सावंत एस.एस. व गावडें बी.व्ही यांनी उत्कृष्ट कामगिरी बकजावली. सदर उपक्रमाास महाविद्यालयाचे अधिक्षक योगेश पाटील, प्राचार्य, डॉ. सादळे ए.एन. व उपप्राचार्य श्री. संकपाळ डी.पी. यांचे मागदर्शन लाभले. तसेच जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे व सर्व संचालक मंडळाचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.