Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रस्वच्छ - सुंदर गारगोटीचा दुर्गंधी कचरा - गावाच्या बाहेर रस्त्यावर.( भुदरगड पंचायत...

स्वच्छ – सुंदर गारगोटीचा दुर्गंधी कचरा – गावाच्या बाहेर रस्त्यावर.( भुदरगड पंचायत समिती आरोग्य विभागाचे दुर्लक्ष. )

स्वच्छ – सुंदर गारगोटीचा दुर्गंधी कचरा – गावाच्या बाहेर रस्त्यावर.
( भुदरगड पंचायत समिती आरोग्य विभागाचे दुर्लक्ष. )

गारगोटी.- प्रतिनिधी.

गारगोटी गाव तसं अलीकडे दिसायला सुंदरच होत चालले आहे. पण अशा या स्वच्छतेमुळे मुळात राजकारणात रखडलेली नगरपंचायत कशी होईल.
पण गावचा दुर्गंधी कचरा गावच्या बाहेर वेशीच्या पलीकडे रस्त्यावर टाकून मात्र गारगोटी ग्रामपंचायत निवांत आहे. येना जाणाऱ्या प्रवाशांना इतक्या दुर्गंधीतून प्रवास करावा लागतो की त्या ठिकाणी थांबणे म्हणजे चक्कर येऊन पडणे अशा प्रकारची सदर कचऱ्याची रस्त्यावरून जाताना दुर्गंधी येत आहे. गावातील जमा केलेला कचरा तसेच इतर हॉटेल्स यांचा कचरा टाकल्याने भटकी कुत्री देखील रस्त्यावरच कचरा विस्कटून टाकत आहेत. इतकी मोठी ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतीमधील लोकप्रतिनिधी सदस्य, सरपंच आरोग्य विभाग किंवा पंचायत समिती भुदरगड यांना देखील याबाबत काही गांभीर्य असल्याचे दिसत नाही. यातील लोकप्रतिनिधींनी किंवा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दहा मिनिट थांबावे म्हणजे त्यांना सदर टाकलेला कचरा किती दुर्गंधी व आरोग्याला घातक आहे. कचऱ्याची विल्हेवाट कुठे लावायची हा ग्रामपंचायतचा स्वच्छता विभागाचा भाग आहे. पण गारगोटी गावातील किमान सामाजिक कार्यकर्ते यांनी याबाबत आवाज उठवणे गरजेचे होते. परंतु मुळात या दुर्गंधीचा गारगोटी गावातील नागरिकांना मुळात कोणताही त्रास होत नसल्याने. व या मार्गावरून ये जा करणारे नागरिक हे काही सर्वजणच नियमित जाणारे नसतात. परंतु नियमित जाणारे देखील प्रवासी नागरिक कुठे तक्रार करणार.. जर प्रशासनालाच व लोकप्रतिनिधीना समजत नसेल कचरा कुठे टाकायचा. परंतु निश्चितपणे या मार्गावर ये – जा करणारे नागरिक हे ग्रामपंचायत गारगोटी यांना जबाबदार धरतात.
तसा गारगोटी गावापासून हणबरवाडी पालीकडे येणाऱ्या रोडवर ठिकठिकाणी देखील असा कचरा रस्त्यावर टाकलेला असतोच

चौकट.

या कचऱ्याच्या दुर्गंधी पासून व कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी यासाठी राधानगरी भुदरगड आजरा विधानसभेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे.. मुळात या विभागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती माजी सदस्य यांनी देखील याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. गारगोटी गावची घाण रस्त्यावरती टाकून इतरांना त्रास कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत लवकरच काही नागरिक ग्रामपंचायत विरोधात रस्त्याच्या कडेला टाकल्या कचऱ्याची विल्हेवाट नाही लावल्यास अनेक वर्षापासून नेहमीच रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समजते.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.