Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा तालुक्याला टोलमुक्त करा. - आजरा उबाठा शिवसेनेने घेतली पालकमंत्री यांची भेट...

आजरा तालुक्याला टोलमुक्त करा. – आजरा उबाठा शिवसेनेने घेतली पालकमंत्री यांची भेट ( सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक ) तर🛑आजरा टोल संदर्भात आम.‌ प्रकाश आबिटकर यांनी तहसील कार्यालयात बोलवली बैठक.

🛑आजरा तालुक्याला टोलमुक्त करा. – पालकमंत्री यांची भेट
( सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक ) तर
🛑आजरा टोल संदर्भात आम.‌ प्रकाश आबिटकर यांनी तहसील कार्यालयात बोलवली बैठक.

आजरा.- प्रतिनिधी.

राष्ट्रीय महामार्ग टोल वसूलीतून आजरा तालुक्याला मुक्त करावे या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे गट) यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. सोमवारी दि. २४ रोजी जिल्हाधिकारी दालनात नाम.मुश्रीफ यांनी बैठक आयोजित केली आहे. संकेश्वर / बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. या महामार्गावर आजरा शहराजवळ एम.आय.डी.सी. जवळ टोल नाक्याचे काम चालू आहे. या टोल नाक्यामुळे आजरा तालुक्यातील आजरा ते किटवडे या गावातील नागरिकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. आजरा शहरात शासकीय कार्यालय, वैद्यकिय सेवा, शाळा, महाविद्यालये असलेने ग्रामस्थांना यावे लागते याशिवाय आजरा कारखाना गवसे येथे असलेने हंगामात ऊसाच्या वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसणार आहे. गेले दोन महिने शिवसेना व अनेक पक्ष संघटना व आजरा तालुक्यातील नागरिकांनी या टोलला तीव्र विरोध दर्शविला आहे. जनभावना लक्षात घेऊन आपण पालकमंत्री या नात्याने आजरा तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व आजरा तालुक्यातील नागरिक यांची संयुक्त बैठक लावून या सर्व नागरिकांना टोलमुक्त करावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, तालुका प्रमुख युवराज पोवार, अमीत गुख, महेश पाटील, राजकुमार भोगण, हरिश्चंद्र व्हरकटे उपस्थित होते.

🛑आजरा टोल संदर्भात आम.‌ प्रकाश आबिटकर यांनी तहसील कार्यालयात बोलवली बैठक.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा टोल माफी व संकेश्वर ते बांदा रस्त्याच्या कामकाजाबाबत गुरुवार दि २० / ६ / २०२४ रोजी सकाळी १२ १५ वाजता तहसील कार्यालय येथे बैठक
आमदार प्रकाश आबिटकर यांनी बोलावली बैठक शिवसेना व आन्याय निवारण समिती ने आमदारांची भेट घेऊन केली होती बैठकीची मागणी
सदर बैठकीला महसूल नॅशनल हायवे व टोल प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी रहणार उपस्थित
आजरा तालुक्यातील लोक प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे प्रतिनिधी टोल विरोधी कृती समिती बरोबरच सर्व गावचे सरपंच आणि ज्यांच्या जमिनी गेलेत आश्या सर्व शेतकरी व .मान्य वारांनी तहसील कार्यालय येथे .उपस्थित रहावे आसे आवाहन शिवसेना ( शिंदे गट. ) ता. प्रमुख संजय पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.