Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजर्‍यातून शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.- गिरीश फोंडे..🛑अतिक्रमण...

आजर्‍यातून शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.- गिरीश फोंडे..🛑अतिक्रमण हटवणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना.- चितळे पैकी धनगर वाड्याच्या ग्रामस्थांनी केला विरोध. – कर्मचाऱ्यांना आले अपयश.

🛑आजर्‍यातून शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.- गिरीश फोंडे..
🛑अतिक्रमण हटवणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना.- चितळे पैकी धनगर वाड्याच्या ग्रामस्थांनी केला विरोध. – कर्मचाऱ्यांना आले अपयश.

आजरा.- प्रतिनिधी.

इलेक्ट्रॉरल बॉन्ड मध्ये राजकीय पक्षांना कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी दिलेल्या देणग्यांची परतफेड म्हणून शक्तीपीठ महामार्ग ची योजना तयार झाली आहे. सत्ताधारी पक्षांनी आपल्या राजकारणासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला आहे. कंत्राटदार, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व मंत्री यांच्या संगनमताने हिस्सेदारी ठरवून शेतकऱ्यांच्या वर हा महामार्ग लादला आहे या विरोधात १८ जून रोजी राजश्री शाहू महाराजांच्या विचारांची कोल्हापुरातील जनता हजारोंच्या संख्येने मोर्चा काढणार आहे. यामध्ये आजरा तालुक्यातील गावांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे प्रतिपादन संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले आहे. शेळप येथील भैरवनाथ मंदिर मध्ये शक्तीपीठ महामार्ग बाधित गावांच्या तालुका मेळाव्यात ते बोलत होते. तालुका समन्वयक सुधाकर पाटील म्हणाले आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना आपली जमीन ही इंचभर ही या महामार्गासाठी द्यायची नाही. प्रसंगी निकराचा लढा करण्याची तयारी या तालुक्यातील शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊ. के डी पाटील म्हणाले. हजारो एकर शेती नष्ट करून पर्यावरणाची कत्तल करून शेतकऱ्यांची थडगी बांधणारा हा महामार्ग आहे. या विरोधात संघटितपणे लढलेच पाहिजे.असे म्हणाले. यावेळी बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी सरपंच अर्जुन बागडी होते. यावेळी बाळासाहेब पाटील, सुरेश पाटील, लहू वाकार, सर्जेराव पाटील, अंकुश कांबळे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग पाटील, दशरथ कांबळे , विष्णू पाटील यांच्यासह शेळप , घाटकरवाडी, सुळेरान, आंबर्डै, लिंगवाडी किटवडे या गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑अतिक्रमण हटवणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना.- चितळे पैकी धनगर वाड्याच्या ग्रामस्थांनी केला विरोध. – कर्मचाऱ्यांना आले अपयश.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील चितळे पैकी धनगरवाडा या ठिकाणी वनविभागाच्या वतीने गट नंबर ११६ या गट नंबर मध्ये पिढ्या जमीन कसून खात असताना दि १६ रोजी सकाळी वनविभाग कर्मचारी स्नेहा जाधव यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षकांच्या वनरक्षक मजूर यांच्या नेतृत्वाखाली रविवार सुट्टी असताना देखील चेतोबा या ठिकाणी ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने आलेल्या वनविभाग कर्मचाऱ्यांना चितळे पैकी धनगरवाडा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने येऊन विरोध दर्शवला त्यामुळे आज वनविभाग कर्मचारी रिकामी हाताने मागे फिरलं अनेक पिढ्यापासून धनगर वाड्यावर ती कुटुंब उपजीविकेचे साधन म्हणून खेतोबा या ठिकाणी शेती करून जगत आलेला आहे. उपजीविकेचे साधन म्हणून अनेक वर्षापासून पहात नाचना ही पीक घेतली जात आहेत पारंपारिक वननिवासी व नाक कायदा अधिनियम २००८ या नियमानुसार उपविभागीय अधिकारी गारगोटी यांच्याकडे दिनांक १०/६ २०२४ रोजी चितळे व्यक्तिगत दावे दाखल करण्यात आलेले आहेत. असे असताना वनविभाग दादागिरी करून तिथे असणारे सर्वे बास क्षेत्राची खाचरे उध्वस्त करण्याचे काम करत आहे. याला विरोध म्हणून आज सकाळी ११ वा. चितळे धनगर वाड्या मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष मुलाबाळांसह जाऊन काम थांबवण्यात आलेले आहे. यानंतर पुन्हा वनविभागाचे कर्मचारी आल्यास मोठ्या प्रमाणात वन विभागासमोर आंदोलन करू असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.