मडिलगेतील प्राथमिक शाळेत
नवागतांचे स्वागत – प्रवेश मेळावा उत्साहात संपन्न.
( इयत्ता १ ली विद्यार्थ्यांचे मिरवणुकीने स्वागत.)
आजरा.- प्रतिनिधी.
मडिलगे ता. आजरा येथील श्री. शंकरलिंग विदयामंदिर मडिलगे या शाळेत नवागतांचे स्वागत, प्रवेश मेळावा, पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नूतन इ .१ लीच्या दाखलपात्र मुलांची सचिन कातकर यांच्या सजवलेल्या ट्रॅक्टर मधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मुलांचे औक्षण करून मान्यवरांचे हस्ते पुष्प, पुस्तके देऊन गौरविण्यात आले. इंग्रजी माध्यमातून व इतर वर्गात प्रवेश घेतलेल्या नविन पाच मुलांचे स्वागतही करण्यात आले . माजी सेवानिवृत मुख्याध्यापक श्री.आजगेकर सर व नूतन मुख्याध्यापक श्रीधर मांगले सर यांचा सत्कार शाळा . व्य. समितीचे अध्यक्ष जालंदर येसणे यांनी केला . या कार्यक्रमासाठी सरपंच बापू निऊंगरे व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, आनंदा येसणे, पांडुरंग सुतार व सर्व सदस्य, पालकांमधून संतोष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे नेटके आयोजन विद्या मंदिर मडिलगेचा शिक्षकवृंद व अंगणवाडी सेविका यांनी केले. या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी सोनावणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आहारात स्वयंपाकी ठेकेदार यांनी मुलांना गोड शिरा देऊन सर्वांचेच तोंड गोड केले. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस, विद्या मंदिर मडिलगे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका, आजी माजी विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री मांगले यांनी सर्वांचे आभार मानले.
