Homeकोंकण - ठाणेविधानसभेसाठी महाविकास आघाडीची मोठी घोषणा.- लवकरच जागावाटप जाहीर करणार🟥उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी...

विधानसभेसाठी महाविकास आघाडीची मोठी घोषणा.- लवकरच जागावाटप जाहीर करणार🟥उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी नवी ताकद!.- मुस्लिम बांधवांनी मोहल्यातून लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य!!

🟥विधानसभेसाठी महाविकास आघाडीची मोठी घोषणा.- लवकरच जागावाटप जाहीर करणार
🟥उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी नवी ताकद!.- मुस्लिम बांधवांनी मोहल्यातून लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य!!

मुंबई :- प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष एकत्रित लढणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी शनिवारी मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत ज्या ताकदीने निवडणुकांना सामोरे गेलो, त्याहून अधिक ताकदीने विधानसभा निवडणुकांना सामोरे जाऊ असा विश्वास यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला.
🔴दरम्यान, विधानसभेसाठी लवकरच जागावाटप जाहीर करण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेला लोकसभेत जो आशीर्वाद दिला तो विधानसभेतही मिळेल, त्यामुळे महाराष्ट्रात निश्चित सत्ताबद्दल होईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन शनिवारी मुंबईत करण्यात आले होते. त्यावेळी वरील घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते.
🟥यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात, तेव्हा माध्यमांसमोर येण्याआधी आमची प्राथमिक बैठक होते. येणारी विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटना आणि छोटे पक्ष मिळून लढणार आहोत, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. तर भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नरेटिव्ह सेट करण्याबाबत टीका करण्यात येत होती. या टीकेलाही उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले. यांना मत दिले तर हे तुमची संपत्ती जास्त मुले होणाऱ्यांना वाटतील, मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातील नळ कापून नेतील, वीज कापतील हे काय खरं नरेटीव्ह होते का, तुमची म्हैस चोरुन नेतील हे काय खरे नरेटिव्ह होते का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. नकली सेना, नकली संतान, प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घरे देईन, उद्योगधंदे येतील, हे खरं नरेटीव्ह होते का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

🟥उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी नवी ताकद!.- मुस्लिम बांधवांनी मोहल्यातून लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य!!

चिपळूण – प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झाला तरीही चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राऊत यांना सुमारे १९ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघांत मुस्लिम समाजाचे प्राबल्य आहे. भाजपवर नाराज असलेला हा समाज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे वळला आहे. मुस्लिम मोहल्ल्यातून ठाकरे गटाचे राऊत यांना सर्वाधिक मतदान झाल्याचे निवडणूक निकालानंतर आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

🟥शिवसेनेचा पारंपरिक नसलेला नवा मतदार ठाकरे गटाला मिळाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. चिपळुणात महाविकास आघाडीचाच दणका पाहायला मिळाला.

🔴रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे निवडून आले तरीही चिपळूण विधानसभा मतदारसंघात ठाकरेंसाठी मुस्लिम समाजाचे मतदार कैवारी ठरले आहेत. कारण, या वेळची लोकसभा निवडणूक ठाकरे शिवसेनेसाठी महत्त्वाची होती. पक्षफुटीनंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच यंदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम समाजाच्या रूपाने नवा मतदार मिळाला आहे. त्यामुळे चिपळूण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राऊत यांना मताधिक्य मिळाल्याची चर्चा सुरू आहे.

🟥निवडणूक निकालानंतर मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शिवसेना एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळे मुस्लिम समाज शिवसेनेपासून दोन हात लांबच पाहायला मिळायचा. आता शिवसेना दोन गटांत विभागली असून, ठाकरेंच्या शिवसेनेत हे समीकरण काहीसे बदलल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेला चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील मुस्लिम मतदारांनी भरभरून पाठिंबा दिल्याचे यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले.

🔴मतदान केंद्र – विनायक राऊत – नारायण राणे.

मालदोली ३६९ – ३२, मजरे काशी १९२ – ३६

कळंबस्ते ४१२ – ४८, उक्ताड ४९५ – ३०२

पेठमाप १ ५८० – ११३, पेठमाप २ २४३ – २१

पेठमाप ३ ५७१ – १९, गोवळकोट १ ३४३ – ७०, गोवळकोट २ ४३८ – १३०, गोवळकोट ३ ५९१ – १३, मुरादपूर ४०० – २२, देसाई मोहल्ला ५७३ – ६७, पागमोहल्ला ४२८ – १४८, भाटकर मोहल्ला ४८७ – १२२, बहादूरशेख १ ४०६ – २२७, बहादूरशेख २ ३१० – १७८, काविळतळी मोहल्ला ४९५ – २३४, कालुस्ते १ ३८७ – ७

कालुस्ते २ १९५ – ३३

कोंढे १ ३५४ – ३८

कोंढे ३५५ – ९८

मिरजोळी ३८२ – ८८

खेर्डी मोहल्ला ५०९ – ११२

पिंपळी बु. ६२३ – १५४

कान्हे २७६ – ७५

कुंभार्ली मोहल्ला ३६६ – १५५

अलोरे मोहल्ला ४१९ – १३४

सावर्डे मोहल्ला १ ४१८ – २६१

सावर्डे मोहल्ला २ ४८८ – १३७

पोफळी सय्यदवाडी ५२० – ६९

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.