Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआता सुट्टी नाही.- टोल हद्दपार सर्वपक्षीय मोर्चा .( सोमवार २४ रोजी टोल...

आता सुट्टी नाही.- टोल हद्दपार सर्वपक्षीय मोर्चा .( सोमवार २४ रोजी टोल विरोधी संघर्ष समितीचा सर्व पक्षीय मोर्चा धडकणार.)

आता सुट्टी नाही.- टोल हद्दपार सर्वपक्षीय मोर्चा .
( सोमवार २४ रोजी टोल विरोधी संघर्ष समितीचा सर्व पक्षीय मोर्चा धडकणार.)

आजरा.- प्रतिनिधी.

संकेश्वर – बांदा महामार्गावर आजरा शहराजवळ होत असलेला टोल नाका बंद करावा यासाठी तालुक्यातील जनतेच्यावतीने संकेश्वर-बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली दि.२४ सोमवार रोजी मोर्चा धडकणार असल्याचे आज दि. १४ रोजी झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाला आहे. मागील दि १० रोजी चा मोर्चाचे नियोजन होते परंतु
आजरा तहसीलदार समीर माने यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आर. बी. शिंदे, अनिल पाटील व टोलविरोधी कृती समितीचे सदस्य यांच्याशी बैठक घडवून आणली होती. तहसीलदार व आजरा पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची चर्चा व केलेल्या मागण्या याबाबत चर्चा झाली तर टोल विरोधी संघर्ष समितीने नव्याने होत असलेली बस स्थानक ही चुकीच्या पद्धतीची आहेत. व चुकीच्या ठिकाणी होत आहेत. ती योग्य ठिकाणी व्हावी. बाधित शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या नियमाने होत असलेली रक्कम द्यावी. एक ठिकाणी एक भाव दुसऱ्या ठिकाणी दुसरा भाव असा दुजा भाव केला जाऊ नये., उर्वरित कामे लवकर पूर्ण करावी., शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडलेली दगडमाती काढून घ्यावी. व आजरा येथे होत असलेला टोल नाका हद्दपार करावा. टोलनाक्याबाबत अंतिम निर्णय देईपर्यंत टोल नाक्याचे काम थांबवावे सदर टोलनाक्याचे काम नाही. थांबवल्यास १० तारखेला आंदोलन होणार असा अंतिम निर्णय घेण्यात आला. परंतु याबाबत अद्याप समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे सोमवार दि. २४ रोजी मोर्चा घेण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला असल्याचे टोलविरोधी कृती समितीने सांगितले आहे.‌
या बैठकीला क्राॅ.संपत देसाई, प्रभाकर कोरवी, परशुराम बामणे, पांडूरंग सावरतकर, राजू विभूते रणजीतसिह देसाई, काशीनाथ मोरे, रविंद्र भाटले, शिवाजी इंगळे, डॉ. त्रिरत्ने ,विलास नाईक, बंडोबा मोरे, तानाजी देसाई, ज्योतिबा केसरकर, सलीम लतीफ
, जोतीबा आजगेकर सह टोलविरोधी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट.

संकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आपल्या मताचे ठाम, समाधानकारक उत्तर, आमच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने. लवकरच मोर्चा यशस्वी करण्यासाठी.. तालुक्यातील वाहनधारकांना व नागरिकांना भूमिका पटवून देऊन जनजागृती करत मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार असल्याचे कॉम्रेड संपत देसाई यांनी सांगितले..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.