Homeकोंकण - ठाणेआजरा येथे मनोज जरांगे (पाटील ) यांच्या आंदोलनाला पाठिंबा.- लाक्षणिक उपोषण..🛑 सुळेरान...

आजरा येथे मनोज जरांगे (पाटील ) यांच्या आंदोलनाला पाठिंबा.- लाक्षणिक उपोषण..🛑 सुळेरान गट नंबर १६९ मधील शेतकऱ्यांचे जमीन ताबा.- आंदोलनातील राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी केल्या मान्य.‌🛑आजरा नगरपंचायत प्रशासनाचा आंधळा कारभार कशासाठी.- कधी होणार सुधारणा..

🛑आजरा येथे मनोज जरांगे (पाटील ) यांच्या आंदोलनाला पाठिंबा.- लाक्षणिक उपोषण..
🛑 सुळेरान गट नंबर १६९ मधील शेतकऱ्यांचे जमीन ताबा.- आंदोलनातील राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी केल्या मान्य.‌
🛑आजरा नगरपंचायत प्रशासनाचा आंधळा कारभार कशासाठी.- कधी होणार सुधारणा..

आजरा.- प्रतिनिधी

Oplus_131072

आजरा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत चालू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ व आजरा तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्या त्यात प्रामुख्याने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातील, जाळपोळी व्यतिरिक्तचे दाखल गुन्हे व सगेसोयरे व अन्य मागण्या बाबत निर्णय होत नाही. तोपर्यंत जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले दरम्यान जरांगे पाटील यांना सरकारने आश्वासन सरकारने दिले होते. ते गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही अत्यंत वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार इतक्या वेगाने हे सर्व प्रयत्न करत आहे. त्यामुळे जरांगे यांनीही उपोषण स्थगित केले असल्याने. मराठा समाजाच्या इतर मागण्यांबाबतही राज्य सरकारने सकारात्मक भूमिकाच घेतली आहे. संवेदनशीलपणे निर्णय घेत असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्यांनी सांगितले एकदिवसीय लक्षणीय उपोषण आम्ही मागे घेत आहोत परंतु श्री जरंग पाटील यांनी सरकारला दिलेला एक महिन्याचा अल्टिमेट यामध्ये सर्व मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही मराठा समाज पुन्हा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोतच असे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनात यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, बंडोपंत चव्हाण, राजेंद्र सावंत भैरवी सावंत, संभाजी इंजल, शंकरराव शिंदे, शिवाजी पाटील, दत्तात्रय मोहिते, सूर्यकांत अजगेकर, प्रकाश देसाई, मानसिंग देसाई, भीमराव जोशीलकर, ईश्वर गिलबिले, सी. डी सरदेसाई, संदीप भोसले, विक्रम इंजल, गणपतराव डोंगरे, शिवाजीराव इंजन, जोतिबा फुले, वेदांत वाळके सह अखिल भारतीय मराठा महासंघ पदाधिकारी व आजरा तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने या लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते.‌
तहसीलदार समीर माने यांनी आंदोलकांची भेट घेतली.

🛑 सुळेरान गट नंबर १६९ मधील शेतकऱ्यांचे जमीन ताबा.- आंदोलनातील राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी केल्या मान्य.‌

आजरा.- प्रतिनिधी.

राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर – बांदा या महामार्गात सुळेरान ता.‌ आजरा येथील बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे येथील शेतकऱ्यांच्या मागण्या राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी पूर्ण करतो असे सांगितले आहे यामध्ये.
गट नंबर शेतीचा निवाडा अंतिम टप्यात आला असून,अपेक्षित कागदपत्रांची पूर्तता करून शेतकऱ्यांचे बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास अडचण नाही. रस्त्याचे काम करीत असताना जमिनीची झालेली नासधूस सपाटीकरण करून देतो. दगड गोटे पडलेल्या ठिकाणची साफसफाई करून देतो.त्याचप्रमाणे गट नं. १६९ मध्ये शेतकऱ्यांची जी शिल्लक कामे करून देण्याची हमी, धनगरमोला येथे सिमेंट गटर सद्या जेवढे शक्य आहे तेवढे बांधून देतो व उर्वरित सिमेंट गट्टर ची एस्टीमेंट करून केंद्र सरकार कडे मंजुरीसाठी पाठवितो. तदपर्यंत,जेथे अर्दन गटरची गरज आहे. तिथे,प्रत्येक घरपती पाईप गळून काम करून देतो. त्याचप्रमाणे,घाटकरवाडी येथे ही गटर करण्यात येथील, धनगरमोला नवीन गावठाण येथे बस थांबे नवीन करून देतो., ज्या – ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर मातीकामासाठी व इतर कामासाठी केला त्यांच्या शेताची स्वच्छत्ता व सपाटीकरण करून देतो, धनगर मोळा येथे बधलेल्या पुलाखालून जनावरांचा मूळ रस्ता करून देतो, धनगर मोल येथील एलेक्टफिकेशनची कामे व खाजगी जागेतील पोलचा मोबदला देण्याची मान्य केले.
त्याचप्रमाणे अन्य काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्याची सोडवणूक करून देतो. सदरची कामे येत्या दोन दिवसात सुरू केली जातील अशा आशयाचे पत्र देण्यात आले. आम्ही केलेल्या मागण्यांच्या अनुषगाने पत्रात मुद्दे असल्याने,आम्ही आमच्या जमिनीचा ताबा आंदोलन यशस्वी करून आंदोलनं मागे घेतले.
या आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व प्रकाश मोरुस्कर, आजरा साखरचे संचालक गोविंद पाटील, चंद्रकांत जाधव, उत्तम माडभगत, योगेश जाधव, श्रावण शेटगे, प्रेमानंद खरूडे, हालेश बारदेस्कर, बालकु बारदेस्कर, मिनिन परेरा, यशवंत जाधव, मारुती ना. शेट्गे, निवृत्ती आडकुरकर, धनाजी पाटील, निवृत्ती यादव, शुभांगी पाटील, अशोक अडकुरकर, संदीप बहादुर, शरद सुतार, दीपक यादव व दीपक पाटकर यांनी सहभाग घेतला.

🛑आजरा नगरपंचायत प्रशासनाचा आंधळा कारभार कशासाठी.- कधी होणार सुधारणा..

आजरा.- संभाजी जाधव.

मागील अनेक महिन्यापासून आजरा नगरपंचायत च्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी लेखी व तोंडी येत आहेत. आजरा नगरपंचायत वाढीव घर फाळा पाणीपट्टी कर वाढ नोटीस पाठवल्यानंतर आजरावासीयांनी प्रचंड मोठा मोर्चा आजरा नगरपंचायत वर काढला. यानंतर नागरिकांच्या मागणीनुसार नियमबाह्य वाढीव कर रद्द करण्यात आला.
त्यानंतर अन्याय निवारण समिती स्थापन झाली व वेळोवेळी या समितीने ज्या ज्या विभागात काही अडचणी असतील त्याबाबत लेखी तोंडी तसेच चर्चा बैठका नगरपंचायत प्रशासनाची केल्या पण यामध्ये काही सुधारणा होताना दिसत नाही.
दरम्यानच्या काळात नवीन पाईपलाईनच्या कामामुळे पाण्याची टंचाई होऊन बसली. व या टंचाईला देखील सामाजिक कार्यकर्ते पुढे येत टँकरने पाणीपुरवठा केला असे अनेक प्रश्न अडचणीचे व प्रलंबित असताना व आजरा नगरपंचायत मध्ये नेमकं असं का होत आहे. याचा जाब विचारण्यासाठी काही लोकप्रतिनिधी वगळता. अन्य मागील लोकप्रतिनिधींना आपल्या प्रभागातील जनतेची होत असलेली हेडसाळ थांबावी याबाबत काही देणे घेणे नसल्याबाबत निदर्शनात येते काही प्रभागात ३-४ महीने झाले आजरा नगरपंचायत ने नळ पाईपलाइन साठी रस्ता खोदून ठेवले आहेत. पण कामे अजून अर्धवट आहेत (फक्त चर खोदून ठेवले) तर काही ठिकाणी गल्लीमधे अंतर्गत डांबरी रोड, गटर नाही. माती-खडी चा रस्ता असल्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले आहे.
शिवाय गल्लीतील सर्व पथदिवे अनेक महिने बंद पडले आहेत.
एकूनच रहिवासी लोकांना खूप त्रास व मनस्ताप होत आहे.
नगरपंचायत ला अनेक वेळा लेखी तक्रार देउनसुद्धा काही तोडगा नाही केवळ पोकळ आश्वासने मिळाली. सध्या पावसाळा चालू झाला आहे अजून जोराचा पाऊस नाही निष्काळजीपणे दिसत असून डोळे बंद करून आश्वासनाची खिरापत वाटत फिरत असलेल्या प्रशासनाने मोठा पावसाळा सुरु होण्यापूर्वी चिखलमय अजरा होण्यापूर्वी वेळच काम पूर्ण करावी व नागरिकांच्या समस्या काय आहेत याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी असताना देखील लोकप्रतिनिधींच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले जात होते आता तर प्रशासन आहे मग प्रशासनाचे काय ऐकणार लोकप्रतिनिधी असताना लोकप्रतिनिधी म्हणणे ऐकण्याचे टाळ टाळ होत होती.
यामागे कर्मचाऱ्यांचे वेळ काढून धोरण आहे. की प्रशासनाचा आंधळा कारभार आहे. हा एक व आजरा शहरातील नागरिकांच्या समोर जबाबदार अधिकारी यांनी मांडला पाहिजेत. किंवा तुम्हाला काम करण्यास कोणती अडचण येते याबाबत चर्चा केली पाहिजेत यातून नागरिकच काहीतरी मार्ग काढू शकतील. पण या वेगवेगळ्या तक्रारीबाबत वेळोवेळी वेगवेगळ्या मागण्या करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा मीटिंग आंदोलनात आजरा शहरवासी सहभागी झाल्यास प्रशासनाला ताकतीने जाब विचारता येईल.
पण नक्कीच आजरा नगरपंचायत चा कारभार हा नागरिकांच्या दृष्टीने समाधानकारक नाहीच…. नक्कीच सत्य आहे पण सत्य कडू असत…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.