Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्र२० जूनला आजरा येथे छत्रपती शाहू महाराजांचा आभार दौरा.गंगामाई वाचनालयात जनतेशी संवाद…

२० जूनला आजरा येथे छत्रपती शाहू महाराजांचा आभार दौरा.गंगामाई वाचनालयात जनतेशी संवाद…

२० जूनला आजरा येथे छत्रपती शाहू महाराजांचा आभार दौरा.
गंगामाई वाचनालयात जनतेशी संवाद…

आजरा – प्रतिनिधी.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे विजयी उमेदवार खासदार छत्रपती शाहू महाराज व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील हे जनतेशी संवाद साधण्यासाठी गुरुवार दि २० जून रोजी आजरा येथे येणार आहेत. यावेळी ते आजरा तालुक्यतील जनतेच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. या भेटीच्या तयारीसाठी आजरा येथे महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांची नियोजनाची बैठक झाली. तरी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यानी दुपारी ३.०० वाजता गंगामाई वाचनालयात उपस्थित रहावे असे आवाहन इंडिया आघाडीचे समन्वयक रवींद्र भाटले यांनी केले. यावेळी मुकुंददादा देसाई उमेश आपटे, संपत देसाई, संभाजी पाटील, अभिषेक शिंपी, नौशाद बुडेखान, रशिद पठाण, संजयभाऊ सावंत, महेश करबंळी रणजीत देसाई, विक्रम देसाई, संकेत सावंत, कृष्णा सावंत,
विलास पाटील, विश्र्वास जाधव, इकबाल शेख सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.