Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रलोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार समारंभ उत्साहात संपन्न. ( लोक संघर्ष...

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार समारंभ उत्साहात संपन्न. ( लोक संघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांना पुरस्कार प्रधान.)

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार समारंभ उत्साहात संपन्न. ( लोक संघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांना पुरस्कार प्रधान.)

आजरा.- प्रतिनिधी.

लोकशाहीर द ना गव्हाणकर स्मुर्ती पुरस्कार प्रदान समारंभ ८ जून रोजी गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे डॉ भारत पाटणकर यांच्या हस्ते. लोकसंघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांना हा पुरस्कार प्रधान करण्यात आला. पुरस्कार समितीचे अध्यक्ष जयंतराव शिंपी अध्यक्षस्थानी होते. स्वागत मुकुंदराव देसाई यांनी केले. प्रास्ताविक करताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले पुरस्काराचे हे सातवे वर्ष असले तरी कोरोनाच्या काळात दोन वर्षे पुरस्कार न दिल्याने हा पाचवा पुरस्कार आहे. यापूर्वी हा पुरस्कार प्राच्यविध्यापंडीत डॉ आ. ह साळुंखे, प्रसिध्द आदिवासी कवी आणि सामाजिक कार्यकर्ते वाहरू सोनावणे, कॉम्रेड कृष्णा मेणसे, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना दिला गेला आहे. साहित्य, कला, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात लोकशाहीर द ना गव्हाणकर यांचा वारसा पुढे नेणाऱ्या कलावंत, विचारवंत, कार्यकर्त्याला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार गुजरात महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात सातपुड्याच्या डोंगररांगातील आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांना देण्यात येत आहे. असे श्री देसाई म्हणाले. या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी. सामाजिक कार्यात आदिवासींच्या न्याय हक्काचा लढा देत असताना अन्याय विरोधात चाललेल्या लढ्याविषयी बोलताना प्रतिभा शिंदे म्हणाल्या. लढ्याचे दोन प्रकार होते. एक नर्मदा आंदोलन व दुसरा आदिवासींचा लढा. प्रकृतीचा लढा सर्वजण लढतात पण माणसांचा लढा असेल तर बळीचा हक्क नाही. या लढ्यामध्ये जगण्याचा संघर्ष होता. पण जमिनीचा संघर्ष ज्या जमिनीवर राहातो त्या जमिनीचा हक्क मिळावा. परंतु जे माझ आहे ते मिळावं व माझं नाही ते मला नको असं म्हणणारा आदिवासी समाज आहे. एकत्रित लढण्याची ताकद आदिवासी समाजात आहे. आदिवासीचा मुख्य प्रवाहात येण्याचा संघर्ष वेगळा आहे. भाषा व चालीरीतीचा संघर्ष प्रकृती जिवंत राहण्याची लढणारी लढाऊ जनता म्हणजे आदिवासी अजूनही न्याय हक्कासाठी जनतेला लढावे लागते जातीय व धार्मिक राजकारण थांबले पाहिजे देशांमध्ये आदिवासींचा संघर्ष टिकला पाहिजे. अलीकडे लोकप्रतिनिधींनी विविध कार्यक्रमासाठी हजर राहणे हा लोकांचा अट्टाहास असतो व चळवळ करणाऱ्यांनी आमच्या न्यायासाठी लढावं अशी भूमिका असते खरं तर लोकप्रतिनिधी हे न्याय देण्यासाठी असतात. यासाठी सामाजिक कार्यकर्ता हा सामाजिक राहतो व संसदीय राजकारणात त्याला महत्त्व नसतं. यासाठी रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे अन्यथा जातीवादी शक्ती डोकं वर काढेल म्हणूनच सामाजिक कार्याबरोबर राजकीय लढाई देखील मजबूत केली पाहिजे. तरच सर्वसामान्य माणसांना न्याय मिळेल असे बोलताना सौ. शिंदे म्हणाल्या
यावेळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले. द. ना. गव्हाणकर हे जनतेचे शाहिर होते.‌ असे शाहीर निर्माण झाले पाहिजे. यासाठी शाहीर निर्माण करणारी चळवळ, कष्टकरी जनतेची चळवळ निर्माण झाली पाहिजे, राजकारण बदलण्यासाठी सामाजिक नेते तयार होण्याची गरज आहे लोकांच्या हिताची चळवळ गेली कुठे सरकार हलवणारी चळवळ होण्याच्या तयारीत आजही आहे. परंतु चळवळीबाबत कोणता सिनेमा होत नाही. निवडणुका येऊ पण समाज बदलतो की नाही हा प्रश्न गव्हांकरांच्या शहिरामधून बाहेर येतो. शाहीर गव्हांकरांच्या नावाने पुरस्कार हे योग्य व्यक्तीला दिले जातात. तसा २०२४ चा दिला जाणारा पुरस्कार प्रतिभा शिंदे. म्हणजे लढवया सामाजिक नेत्यात आहेत. त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. असे डॉ.‌ पाटणकर बोलताना म्हणाले

Oplus_131072


यावेळी समितीचे अध्यक्ष श्री. शिंपी, उपाध्यक्ष मोहनराव देसाई
कार्याध्यक्ष संपत देसाई, सुनील पाटील सचिव, मुकुंददादा देसाई जेष्ठ सदस्य, माजी नगराध्यक्ष गडहिंग्लज स्वाती कोरी, कारखाना संचालक सुधीर देसाई, एम के देसाई, लोकशाहीर द. ना. गव्हाणकर, तसेच विद्याधर गुरवे, अमर चव्हाण, स्मृती पुरस्कार व स्मारक समिती, आजरा मायकल फर्नांडिस, रविंद्र भाटले, संजय घाटगे, मीना शिरगुप्पे, दिगंबर सावंत, नवनाथ शिंदे, युवराज पोवार, संजय सावंत, संजीवनी सावंत, संग्राम सावंत,सह समितीचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. गौरी भोसले यांनी केले. आभार संजय घाटगे यांनी मांनले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.