व्यंकटराव हायस्कूलच्या १९९० च्या इयत्ता दहावी बॅचकडून “विद्यार्थी पेयजल योजनेसाठी “भरीव आर्थिक मदत.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल ही १९३२ पासून आजरा तालुक्यातील खेडोपाड्यातील, वाडी वस्तीतील, बहुजन समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिकवून त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी अविरत ज्ञानार्जन करणारी प्रशाला आहे.. या ज्ञान मंदिरातून प्रतिवर्षी २०० हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. घार हिंडे आकाशी चित्त तिचे मात्र पिलापाशी… या उक्तीप्रमाणे व्यंकटराव प्रशालेचा विद्यार्थी शिकून मोठा होऊन देशा प्रदेशात जरी गेला तरी त्यांनी आपल्या प्रशालेशी असणारी आपली नाळ कधीच तुटू दिली नाही. याचीच प्रचिती विविध प्रसंगातून पहावयास मिळते, विद्यार्थी प्रति वर्षी गेट-टुगेदर च्या निमित्ताने कित्येक वर्षानंतर का असेना प्रशालेमध्ये एकत्र येतात. जुन्या आठवणींना उजाळा देतात. शाळेची उत्तरोत्तर होणारी शैक्षणिक गुणवत्तापूर्ण प्रगती आणि बालवाडी ते पदवीपर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली आणण्याचं कार्य अध्यक्ष जयवंतराव शिंपी व संचालक मंडळ यांनी केल्याचे पाहून त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो.. त्या विद्यार्थ्यांनाही वाटतं आपणही आपल्या या मातृशाळेसाठी आपल्या परीने मदत करणे गरजेचे आहे आणि प्रतिवर्षी प्रशालेच्या लहान मोठ्या गरजा ते भागतही आहेत. यावर्षी एस.एस.सी .मार्च १९९० सालच्या बॅचमधील गोकुळ हसवे ,(चांदेवाडी) यांना नवीन इमारती समोरील मैदानात शाळेने विद्यार्थ्यांना मुबलक पाणी मिळत नसल्याने बोर मारत असल्याचे दिसले.. त्यांनी मनोमनी निर्णय घेतला की आपल्या या १९९० च्या बॅचकडून या बोरसाठी व हे पाणी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचवण्यासाठी लागणारा खर्च आपल्या परीने करायचा. ही संकल्पना त्यांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वर्ग मित्रांना कळवली.. आपल्या शाळेसाठी आणि आपल्याच गावा घरातल्या विद्यार्थ्यांना स्वच्छ निर्मळ पाणी देण्याच्या उदात्त भावनेतून देणगीचा ओघ सुरू झाला.. आणि बघता बघता १ लाख २५ हजार रुपये जमा झाले. ही रक्कम या नवीन पेजल योजनेसाठी देण्याचा ” देणगी प्रदान कार्यक्रम “नुकताच विद्यादेवता सरस्वतीच्या मूर्तीसमोर झाला. १९९० चे या बॅचचे शिक्षक ए.के. पावले सर यांचे शुभ हस्ते संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांना ही जमा रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी या बॅचमधील उपस्थित विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. प्रशालेचे माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रशालेची दिवसेंदिवस होणारी प्रगती सांगितली. कलाशिक्षक व माजी मुख्याध्यापक बी. टी. सुतार सर यांनी ही विद्यार्थ्यांच्या या दातृत्वाचे कौतुक केले. ए.के.पावले सर यांनी या बॅचमधील विद्यार्थ्यांच्याशी संपर्क ठेवत जास्तीत जास्त निधी कसा जमा करता येईल यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. कारण आपले अनेक विद्यार्थी देशात परदेशात उच्च पदावर कार्यरत असून त्या विद्यार्थ्यांनाही जगाच्या तुलनेत आपली ही प्रशाला मोठी व्हावी, आणखीन नावा रूपाला यावी असे वाटते. त्यामुळे त्यांच्याकडूनही मिळणाऱ्या मदतीतून शाळेचा भौतिक विकास साधता येईल . उदाहरणार्थ इयत्ता अकरावी ते बीएस्सी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक ‘सायन्स लॅब’ होणे गरजेचे आहे. असे सांगितले. माजी विद्यार्थी उत्तम कोकीतकर सर यांनीही अतिशय सुंदर व काव्यमय शब्दात व्यंकटराव शाळेबद्दल शब्दातून आपले ऋण व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात श्री. शिंपी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित व या बॅचमधील दानशूर विद्यार्थ्यांचे कौतुक व आभार मानले. व सांगितले की या तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांची मुले मुली आपल्या व्यंकटराव प्रशालेच्या एकाच छताखाली इयत्ता पहिली ते आर्ट्स, कॉमर्स व सायन्स यातील एका शाखेतून पदवी घेऊन बाहेर पडावीत यासाठी हे सर्व विभाग सुरू केले आहेत तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक (अभ्यास केंद्र) कार्यरत आहे व त्यासाठी ही जवळ जवळ दोन ते अडीच कोटी खर्च करत इमारत बांधण्याचे काम आजही सुरू आहे. यासाठी बाह्य सजावट व अंतर्गत सजावट (सुविधा) यासाठीही आर्थिक मदत गरजेचीच आहे.. आजपर्यंतच्या आपल्या उद्योग व्यवसाय व नोकरीमध्ये स्थिर असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे करणे आज गरजेचे वाटत आहे. यावर्षीपासून सैन्य दलात व पोलीस भरतीसाठी आवश्यक मार्गदर्शन वर्गही सुरू करण्याचा मानस आहे असे सांगितले या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव एस पी कांबळे, सचिन शिंपी, प्राचार्य, आर जी कुंभार, जी बी ढेकळे, बी एच जाधव, एस जे गिलबिले, व्ही आर खोराटे, आदी शिक्षक व व विद्यार्थी गोकुळ हसबे, लक्ष्मण कविटकर , सुनील पाटील ,रवींद्र नवलकर, दीपक हरमळकर , कृष्णा वरेकर , विनायक कांबळे, अभिजीत देसाई, राजू पवार, उत्तम कोकीतकर रियाज बागवान उपस्थित होते. या ” विद्यार्थी पेयजल योजनेसाठी ” आर्थिक मदत करणारे या 1990 चे दानवीर कर्ण प्रवीण शिर्के, तुकाराम राणे, संजय गुडुळकर ,उत्तम कोकितकर, रवींद्र कोंडुसकर , शिवराज पाटील, सुरेश डोंगरे ,कविटकर सर, दीपक हरमळकर ,राजू पवार, रियाज बागवान ,रवी नावलकर, राजाराम हरमळकर, सुनील पाटील( दाभिल) संस्थेचे संचालक अभिषेक शिंपी यांनी आभार व्यक्त केले व सूत्रसंचालन पी व्ही पाटील यांनी केले