टोल नाक्याचे काम तात्काळ थांबवावे.- अन्यथा १० रोजी टोल हद्दपार सर्वपक्षीय मोर्चा .
( टोल विरोधी कृती समितीची आजरा तहसीलदार कार्यालयात बैठक.)
आजरा.- प्रतिनिधी.

संकेश्वर – बांदा महामार्गावर आजरा शहराजवळ होत असलेला टोल नाका बंद करावा यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय जनतेच्यावतीने संकेश्वर-बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली दि. १० जुन २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपासून आपल्या तहसील कार्यालयावर टोल विरोधात निघणारा मोर्चा. तसेच टोल बाबत याबाबत अधिक माहिती मिळावी असे निवेदनात नमूद केले होते. त्या अनुषंगाने आजरा तहसीलदार समीर माने यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आर. बी. शिंदे, अनिल पाटील व टोलविरोधी कृती समितीचे सदस्य यांच्याशी बैठक घडवून आणली. तहसीलदार व आजरा पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची चर्चा व केलेल्या मागण्या याबाबत चर्चा झाली तर टोल विरोधी संघर्ष समितीने नव्याने होत असलेली बस स्थानक ही चुकीच्या पद्धतीची आहेत. व चुकीच्या ठिकाणी होत आहेत. ती योग्य ठिकाणी व्हावी. बाधित शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या नियमाने होत असलेली रक्कम द्यावी. एक ठिकाणी एक भाव दुसऱ्या ठिकाणी दुसरा भाव असा दुजा भाव केला जाऊ नये., उर्वरित कामे लवकर पूर्ण करावी., शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडलेली दगडमाती काढून घ्यावी. व आजरा येथे होत असलेला टोल नाका हद्दपार करावा. टोलनाक्याबाबत अंतिम निर्णय देईपर्यंत टोल नाक्याचे काम थांबवावे सदर टोलनाक्याचे काम नाही. थांबवल्यास १० तारखेला आंदोलन होणारच असा अंतिम निर्णय घेण्यात आला. या बैठकीला नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, क्राॅ.संपत देसाई, प्रभाकर कोरवी, परशुराम बामणे, युवराज पोवार, संजय पाटील, प्रकाश मोरस्कर, दयानंद भोपळे, अभिजीत रोगडे, पांडूरंग सावरतकर, राजू विभूने
अल्बर्ट डिसोझा, गौरव देशपांडे, जोतीबा आजगेकर सह टोलविरोधी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट…..
{ या चर्चेत तहसीलदार समीर माने, आजरा सपोनि नागेश यमगर, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, कॉम्रेड संपत देसाई, प्रभाकर कोरवी, परशुराम बामणे, युवराज पोवार, प्रकाश मोरस्कर, संजय पाटील, दयानंद भोपळे, गौरव देशपांडे, सह टोल विरोधी संघर्ष समितीचे सदस्यांनी सहभाग घेतला.१० तारखेच्या आंदोलनापूर्वी काम थांबवून पुढील बैठकीत योग्य तो निर्णय द्यावा. व तालुक्यातील नागरिकांना टोल मुक्त करावं. यामध्ये टोल नाक्याचे चालू असलेले काम नाही थांबवल्यास दि. १० रोजी आंदोलनाला सामोरे जावे असा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे. तूर्तास टोल नाक्याचे काम थांबवण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या कडन तहसीलदार समीर माने यांच्यासमोर बैठकीत सांगण्यात आले आहे..}