Homeकोंकण - ठाणेनितीश - नायडूंशिवायही एनडीएचे सरकार स्थापन होणार का?…- सरकार स्थापनेसाठी असे समीकरण...

नितीश – नायडूंशिवायही एनडीएचे सरकार स्थापन होणार का?…- सरकार स्थापनेसाठी असे समीकरण घडवून आणणार?…🟥बीडचे नवनिर्वाचीत खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात तर काहीजण जखमी -बजरंग सोनवणे सुखरूप.🟥देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार.- नरेंद्र मोदींकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचे संकेत.

🟥नितीश – नायडूंशिवायही एनडीएचे सरकार स्थापन होणार का?…- सरकार स्थापनेसाठी असे समीकरण घडवून आणणार?…
🟥बीडचे नवनिर्वाचीत खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात तर काहीजण जखमी –
बजरंग सोनवणे सुखरूप.
🟥देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार.- नरेंद्र मोदींकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचे संकेत.

नवी दिल्ली वृत्तसंस्था.

🟣राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. राजकारणात कधी काय होणार ते सांगता येत नाही. लोकसभेत अब की बार ४०० पार चा नारा देणारी भाजपा मात्र बहुमताचा आकडाही पार करू नाही शकली.एनडीए मध्ये सामील असलेले चंद्राबाबू आणि नितिशकुमार हे कधी ही पलटी मारू शकतात अशी भीती भाजपाला असल्यानं सरकारं स्थापन करणे सोपे नसल्याच चित्र सध्या दिसत आहे. एनडीए सध्या 295 च्या आकड्यावर आहे. तर विरोधी पक्षांच्या भारत आघाडीला 242 जागा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.तर एनडीए आघाडीला सत्तास्थापनेसाठी 30 जागांची गरज आहे. त्या जागा नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांच्याकडून घेवू शकतात अशी भिती भाजप ला आहे.

🔴अशा स्थितीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना किंगमेकर म्हटले जात आहे. या दोन्ही नेत्यांनी टेबल फिरवल्यास एनडीएचे नशीब उलटू शकते, असे बोलले जात आहे. दोन्ही नेत्यांकडे 30 जागांचा आकडा असल्याचे बोलले जात आहे. ज्याच्या आधारे ते एनडीएपासून वेगळे होऊ शकतात आणि इंडिया अलायन्समध्ये सामील होऊ शकतात आणि बहुमताचा 272 चा आकडा पार करू शकतात. पण या दोन नेत्यांच्या जाण्याने एनडीएमध्ये खरोखर काही फरक पडू शकतो का? या दोघांशिवायही एनडीए सरकार कसे बनवू शकते ते जाणून घेऊया?

🟥अनेक छोट्या पक्षांनी विजयाची नोंद केली.

वर म्हटल्याप्रमाणे राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. ज्या पक्षाला ते कालपर्यंत विरोध करत होते, त्याच पक्षात सामील होतात. अशा परिस्थितीत कोणताही पक्ष एनडीएपासून वेगळा होऊन भारत आघाडीत सामील झाला, तर उद्या दुसरा पक्षही एनडीएमध्ये सामील होऊ शकतो, हे नाकारता येणार नाही. या लोकसभा निवडणुकीत नितीश-नायडू यांच्या पक्षाशिवाय अनेक पक्षांनीही विजयाची नोंद केली आहे.

🟥32 जागा गोळा करणे आवश्यक आहे.

प्रमुख पक्षांमध्ये समाजवादी पक्षाने 37, टीएमसीने 29 आणि द्रमुकने 22 जागा जिंकल्या आहेत. या पक्षांची बाजू बदलण्याची फारशी आशा नाही, पण नितीश-नायडू यांच्या पलटवारानंतर भाजपसाठी संजीवनी ठरणारे अनेक छोटे पक्ष आहेत. भाजपकडे 240 जागांचा आकडा आहे. अशा परिस्थितीत बहुमतासाठी केवळ 32 जागा गोळा कराव्या लागतील. मात्र, यातील अनेक जागा एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांकडून भरल्या जात आहेत.

🔴केवळ एनडीए पक्षच त्यांना बहुमताच्या जवळ घेऊन जातील

उदाहरणार्थ, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 7 जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत एनडीएचा आकडा २४७ होतो. याशिवाय एनडीएमध्ये समाविष्ट लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) 5 जागा, जनता दल सेक्युलर (जेडीएस) ने 2 जागा, राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) ने 2 आणि जनसेना पक्षाने 2 जागा जिंकल्या आहेत. अशा प्रकारे या पक्षांसह एनडीएचा आकडा 258 होईल.

🅾️अपक्षांनी 7 जागा जिंकल्या आहेत

याशिवाय एनडीए मध्ये समाविष्ट युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) ने एक जागा, हिंदुस्थानी अवाम मोर्चा एक जागा आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा एक जागा जिंकली आहे. यासह इतर मित्रपक्षांना 4 जागा आहेत. अशा प्रकारे एनडीए स्वतः २६५ चा आकडा पूर्ण करत आहे. आता नितीश-नायडू वेगळे झाले तर सरकार स्थापनेसाठी एनडीएला फक्त 7 जागा लागतील. जी ती लहान पक्ष, 7 अपक्ष किंवा तिच्या जुन्या मित्रपक्षांच्या माध्यमातून पूर्ण करू शकते. नितीश-नायडू यांच्या पलटवारामुळे भाजपला काही तणावाचा सामना करावा लागू शकतो, पण फारसा फरक पडणार नाही, असे म्हणता येईल.

🔴बहुतांश शक्यता एनडीएच्या बाजूने आहेत

विशेष म्हणजे भाजप बहुमताचा आकडा पार करू शकला नसला तरी या निवडणुकीतही तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अशा स्थितीत त्यांना सरकार स्थापनेसाठी आधी निमंत्रित केले जाईल. बहुतांश शक्यता एनडीएच्या बाजूने असल्या, तरी नितीश आणि नायडूंना आलटून पालटण्याचा धोका पत्करायचा नाही. एनडीएमध्ये राहून मोठ्या पदाची मागणी करणे हाच त्यांच्यासाठी फायदेशीर करार आहे. एनडीए सरकार स्थापन करताना नितीश आणि नायडू एकत्र असतात की नाही हे पाहणे ओत्सुकतेचे ठरणार आहे.

🟥बीडचे नवनिर्वाचीत खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात तर काहीजण जखमी –
बजरंग सोनवणे सुखरूप.

बीड:-प्रतिनिधी

बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला. ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या कारला पाठीमागून धडकली. या अपघातात काहीजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धुळे-सोलापूर महामार्गावर ही घटना घडली.

🔴सुदैवाने या अपघातात बजरंग सोनवणे यांना कुठलीही दुखापत झाली नाही. ते सुखरुप असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यामुळे कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला.या पराभवानंतर बजरंग सोनवणे मंगळवारी रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जालना येथे गेले होते. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच पदाधिकारी होते. तेथून परतत असताना ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या कारला येऊन धडकली. सुदैवाने या घटनेत बजरंग सोनवने यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, काही कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मी तुमच्या आशीर्वादाने सुखरुप असून कोणतेही चिंता करण्याचं कारण नाही, असं सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

🟥देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार.- नरेंद्र मोदींकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचे संकेत

नवी दिल्ली – वृत्तसंस्था

आमचे विरोधक एकत्र येत इतक्या जागा जिंकू शकल्या नाहीत ज्या भाजपाने एकट्याने जिंकल्या आहेत. मी देशातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांना सांगतो, नागरिकांना सांगतो, तुमची मेहनत ही मोदींना निरंतर काम करण्याची प्रेरणा देते. आपण सगळे मिळून पुढे जाऊ, देशाला पुढे घेऊन जाऊ. तिसऱ्या कार्यकाळात देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार आहे. ही मोदींची गॅरंटी आहे असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

🟥भाजपाच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी मोदी मंगळवारी रात्री उशिरा भाजपाच्या मुख्य कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, मी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे अभिनंदन करतो. प्रत्येकाच्या सक्रीय सहभागाशिवाय ही निवडणूक प्रक्रिया शक्य नाही. या जनादेशाचे अनेक पैलू आहेत. १९६२ नंतर पहिल्यांदाच एखादं सरकार त्यांचा २ कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांदा पुन्हा आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी विधानसभेचे निकाल लागले तिथे एनडीएला स्पष्ट विजय मिळाला. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्किम या राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. डिपॉझिट वाचवणंही त्यांना कठीण झालं असा टोला मोदींनी लगावला. तसेच तुमच्या या प्रेमासाठी मी सर्वांचा ऋणी आहे. आज पुन्हा एनडीएची सलग तिसऱ्यांदा सरकार बनणं निश्चित आहे. आम्ही जनतेचे आभारी आहोत. देशवासियांनी भाजपावर,एनडीएवर पूर्ण विश्वास दाखवला. आजचा विजय देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. सबका साथ, सबका विश्वास या मंत्राचा विजय आहे. १४० कोटी जनतेचा विश्वासाचा विजय आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.तसेच ओडिशात लोकसभा निवडणुकीत भाजपानं चांगली कामगिरी केली. तिथे भाजपाचं सरकार बनणार आहे. तिथे पहिल्यांदा भाजपाचा मुख्यमंत्री बनणार आहे. भाजपानं केरळातही जागा मिळवली. केरळच्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिलंय. अनेक पिढ्या तिथल्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. अनेक पिढी ज्या क्षणाची वाट पाहिली आज ते यश मिळालं आहे. तेलंगणात आपली संख्या दुप्पट झाली. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल अशा अनेक राज्यात आपल्या पक्षाने क्लीन स्वीप मिळवलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

🅾️दरम्यान, आंध्र प्रदेशात चंदाबाबू नायडू आणि बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली. १० वर्षापूर्वी देशात बदल हवा होता म्हणून जनतेनं आपल्याला कौल दिला. त्यावेळी देशात नैराश्य होतं. अशावेळी देशानं आपल्याला जबाबदारी दिली होती. आपण पूर्ण प्रामाणिकपणे काम केले, २०१९ ला याच प्रयत्नांवर विश्वास ठेवत देशाने पुन्हा दुसऱ्यांदा बहुमत दिले. २०२४ ला पुन्हा जो आशीर्वाद एनडीएला मिळाला आहे. त्याबद्दल जनतेसमोर मी विनम्रतेने नतमस्तक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

🟥आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक

आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक करणारा आहे. माझी आई गेल्यानंतर ही माझी पहिलीच निवडणूक होती. परंतु देशातील कोट्यवधी माता भगिनींनी आईची कमी मला भासवून दिले नाही. या आपलेपणाला मी शब्दात मांडू शकत नाही. देशातील माता भगिनींनी मला नवीन प्रेरणा दिली. मागील १० वर्षात देशाने खूप मोठे निर्णय घेतले. राष्ट्र प्रथमची भावना आम्हाला असामान्य काम करण्याची प्रेरणा देते. जगातील सर्वात मोठ्या जनकल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. १२ कोटी जनतेला नल से जल दिलं. ४ कोटी गरिबांना पक्की घरे दिली. ८० कोटी जनतेला मोफत रेशन दिले. याच भावनेतून जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवलं. आम्ही राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. कोरोनाचं संकट आलं तेव्हा देशहित आणि जनहिताचे निर्णय आम्ही घेतले. आज भारत जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. राष्ट्र प्रथमची भावना भारताला आत्मनिर्भर बनवणार आहे. विकसित भारताचा संकल्प आमचा आहे. १० वर्षानंतर सलग तिसऱ्यांदा जनतेचा आशीर्वाद आपल्याला ताकद देतोय. संकल्पाला नवीन ऊर्जा देते असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

🔴निवडणूक आयोगाचे मानले आभार

मी देशाच्या निवडणूक आयोगाचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठी निवडणूक कुशलतेने संपन्न केली. ११ लाख मतदान केंद्र, १.५ कोटी निवडणूक कर्मचारी, ५५ लाख ईव्हीएम मशिन, इतक्या उन्हाळ्यातही निवडणूक आयोगाने त्यांची जबाबदारी सांभाळली. भारताची निवडणूक प्रक्रिया, पूर्ण सिस्टम आणि निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कामावर भारतीयांना गर्व आहे असं म्हणत मोदींनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.